*आमदाबादकर पवार घराण्यातील मातोश्री मैन्नाबाईसाहेब व सरदार रायाजीराव पवार यांच्या भव्य व उत्कृष्ट समाधी **
post and photosambhar by :संतोष झिपरे
मैनाबाईसाहेब पवार यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या पुढे कान्होपात्रा समाधी जवळपास तरटी व मोठ्या मंडपाची उभारणी व चंद्रभागेत नौका घाट उभारणी केली आहे!
मैनाबाईसाहेब पवार यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या पुढे कान्होपात्रा समाधी जवळपास तरटी व मोठ्या मंडपाची उभारणी व चंद्रभागेत नौका घाट उभारणी केली आहे!
या मैनाबाईसाहेब पवार या सरदार सटवाजीराव साठे जहागीरदार पाफळणे इंदूर यांच्या धाकट्या कन्या! मंदिर परिसरात शिलालेख उपलब्ध आहे!
द्या नेत्रदीपक कला शैलीचा बांधकाम केला आहे **
*श्रीमंत साबुसिंग पवार यांचे पुत्र कृष्णाजी पवार . त्यांना तीन पुत्र बुबाजी , रायाजी व केरोजी . बुबाजींना दोन पुत्र ; काळोजी व संभाजी . संभाजींना तीन पुत्र ; उदाजीराव , आनंदराव व जगदेवराव . आनंदराव हे धारचे पाहिले महाराज , त्यांना दोन पुत्र यशवंतराव (पानिपतकर) व रायाजीराव . रायाजीराव पवारांचे वंशज आमदाबादकर म्हणून ओळखले जातात .*
*उदाजीराव व आनंदराव या दोघा बंधुत फारच कमी अंतर असून ते एकत्र राहत असत . उदाजीरावांप्रमाणे आनंदराव ही फार पराक्रमी होते . शिवाय जोडीला मुत्सद्दोगिरी व मनमिळऊपणा देखील त्यांच्या अंगी होता . आनंदरावांची आयुमर्यादा अल्प होती तरी या थोड्या अवधीत त्यांनी त्या वेळच्या सारदारांमध्ये वरीष्ठ पद मिळविले होते . दोघा बंधूंची सरदारी एक असून दोघे कामगिरीवर एकत्र जात असत . दाभोईच्या लढाई नंतर उदाजीरावांनी मलठण व आनंदरावांनी धार (कवठे) गादी स्थापन करून महाराज म्हणून कारभार सांभाळला .*
*पुढे यशवंतराव व रायाजीराव ही फार पराक्रमी होते . वडील व काकान प्रमाणे हे दोघे बंधू ही एकत्र होते . यशवंतराव हे धारचे महाराज होते तर रायाजीराव यांना आमदाबाद, डग, गंगराड , ताल , मंडावल हे माहाल सरंजाम म्हणून मिळाले . यशवंतराव पानिपतमध्ये धारातीर्थी पडले .*
*आमदाबादकर पवार हे धार संस्थानात उच्च सारदारांपैकी होते . विश्वासराव किताब व विश्वासराई सरंजाम सर्व पवार बंधूंमध्ये वाटला गेला, त्यात आमदाबादकरांना ही हिस्सा होता*
*आमदाबाद येथे सरदार रायाजीराव पवारा व त्यांच्या मातोश्री याचा घोडनदीच्या तीरावर या दोन्ही समाधी उभा आहे . नदीवर सरदार पवारांच्या दोन छत्र्या (समाध्या) अजूनही उत्तम स्थितीत पाहवयास मिळतात **.
पाच फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेल्या या छत्र्या या घराण्यातील अतिशय कर्तृत्ववान अशी सरदार रायाजीराव पवार व तुमच्या मातोश्री अखंड सौभाग्य लक्षमी मैन्नाबाईसाहेब याचा समाधी आहे **
पाच फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेल्या या छत्र्या या घराण्यातील अतिशय कर्तृत्ववान अशी सरदार रायाजीराव पवार व तुमच्या मातोश्री अखंड सौभाग्य लक्षमी मैन्नाबाईसाहेब याचा समाधी आहे **
** *समाधीचा बांधकाम शैली - मराठे, मुघल ,व राजपूत पध्दतीने एकत्र बांधकामे केला असून दोन्ही समाधी खुपच सुंदर दिसत तसेच मातोश्री मैन्नाबाईसाहेब याचा समाधी ४०फुट उंच आहे तर रायाजीराव पवार याचा समाधी४५ फुट उंच आहे
यावरून समाधीचा भव्यता फोटो मध्य पहा लक्षात येईल
संतोष झिपरे
सर
यावरून समाधीचा भव्यता फोटो मध्य पहा लक्षात येईल
संतोष झिपरे
सर
*शिलालेख पंढरपूर मंदिर*
*॥श्री गणेशाय नमः॥*
*शके १७७१ सौम्यनाम संवत्सर* *मार्गशीर्ष.( ..........)गुरुवार ते दिवसि येशवंतराव पवार (श्रीमंत सरदार यशवंतराव राजेपवार धार) यांचे पुत्र आनंदराव पवार यांची स्त्री मैनाबाई ......!*
*मानाजीराव साटे(साठे)पीपळेकर (पिंपळे असावे) यांचे पुत्र धोंडोजीराव यांचे पुत्र सटवाजीराव साठे (श्रीमंत सरदार सटवाजीराव साठे जहागीरदार पाफळणे(पफलाना इंदूर) आणि यांची कन्या मैनाबाई )यांचि स्त्री सईबाई साटे(साठे) यांचि स्त्री सचिकला*
*आनंदराव पवार यांचे पुत्र रामचंद्रराव पवार*
*यांचि माता मैनाबाई पवार संस्थान किले धारकर* *यांनि श्रेत्र श्री पंढरपूर भीमातीर निवासे श्री पांडुरंग यांचे प्रसादा संनिध श्री पांडुरंग प्रीत्यर्थ (प्रित्यर्थ )सभामंडप श्री लक्ष्मीबाई जवळ दक्षण (दक्षिण )बाजू मंडपला घडीव तरटीचे साज संनिध ओवऱ्या तीन व सभामंडप खण तीन व दर्वाजा (दरवाजा )दगडी बांधला*
*व चंद्रभागेत(भीमा) नौका चालविण्या करिता नदीव (नदीवर घाट) केली हे (ते)पांडूरंगास अर्पण असे !*
*हे काम रामचंद्र मैराळ यांचे हातून झाले असे संमत (संवत) (१८०६) हे काम लक्षुमिचे पूर्वेस कानुपात्राचे देवा समाअरपीत केले असे !(संत कान्होपात्रा समाधी जवळ)*
*श्रीरस्तु श्री पांडुरंगार्पण मस्तु॥*

*माझ्या बुद्धीने हे वाचन केले चुकले असेल तर दुरूस्ती असावी!*
*श्री संतराज साठे*🙏
यावेळी सदर समाधी स्थळावर भेट देऊन दर्शन घेताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे व शिवप्रेमी केशव मस्के***
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
यावेळी सदर समाधी स्थळावर भेट देऊन दर्शन घेताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे व शिवप्रेमी केशव मस्के***
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
No comments:
Post a Comment