#मिर्झाराजे_जयसिंह
मिर्झाराजे जयसिंह म्हटले म्हणजे आपल्याला स्मरतो, तो पुरंदरचा तह आणि शिवरायांचे आग्रा प्रकरण. दूरदर्शी, कुशल राजकारणी, धूर्त कूटनितीज्ञ, बुद्धिमत्ताधुरंधर, पराक्रमी अशा गुणांनी युक्त जयसिंह जयपुरच्या आमेर किंवा अंबरच्या कछवाह राजघराण्यातील. त्यांची आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या मुळपुरुषापासून संक्षिप्त वंशवृत्त.
श्रीरामचंद्रांचा पुत्र कुश ह्याला हा वंश आपला मुळ पुरुष मानतो. त्याच्याच नावावरुन हे कछवाह किंवा कुशवाह हे उपनाव लावतात.
पुढे, ह्याच वंशातील राजा नलने संवत ३५१ (इ.स. २९५) मध्ये कौशलराज्य सोडून पश्चिमेस नरवर किंवा निषध नावाची नवी राजधानी स्थापन केली. राजा नलानंतर काही पिढ्यांनी आमेरच्या सिहासनावर राजा सोढासिहा बसला. याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला बाहेर काढून सोढासिंहाच्या भावाने राज्य बळकावले. राज्यातून काढून टाकल्यानंतर सोढासिहाचा पुत्र दुहलराय व त्याची आई म्हणजे सोढासिहाची पत्नी हे उभय भटकत, हालपेष्टा सहन करत मोहगाव(जयपुरपासून अडीच कोसांवर) येथे आले व येथेच राहु लागले. काही काळानंतर दुहलरायाने मोहगाव चातुर्याने बळकावले. पुढे त्याने राज्यविस्तारही केला.
दुहलरायानंतर त्याचा पुत्र काकिल त्याचा उत्तराधिकारी झाला. तद्नंतर हणदेव-कुंतल-पजोनजी (प्रद्युम्न)-नलैसीजी (मलैसीजी)-बिजलदेव-तेजदेव-वनवीर-उद्धरण-चंद्रसेन-पृथ्वीराज इथपर्यंत ह्या राजांनी राज्यविस्तार करुन आपल्या राज्यास समृद्ध बनविण्याचा प्रयत्न केला. तरीही हे राज्य फारसे समृद्धिस पोहचलेले नव्हते. अंबरच्या गादिवर पृथ्वीराज नंतर भारमल पदासीन झाला (इ.स. १५२८ च्या सुमारास). ह्याच काळात दिल्लीचे शेवटचे हिंदू सम्राट महाराज पृथ्वीराज चौहाण यांची सत्ता संपुष्टात आली आणि मुघल साम्राज्याचे भारतात बीजारोपण झाले. बाबराने हिंदूस्थानात राज्यविस्ताराची मोहिम राबवली. आणि ह्याच मोहिमेत स्वतंत्र बांण्याच्या दुहलरायने स्थापन केलेल्या ह्या लघुराज्याच्या राजा-भारमल-मुघल सत्तेपुढे नतमस्तक झाला. आणि येथपासून ह्या राज्याच्या स्वातंत्र्यतेला बाधा आली. हे राज्य मुघलांचे मांडलिक झाले. ह्यानंतर हुमायुच्या काळात भारमल मुघलांचा पंचहजारी मनसबदार झाला.
'आपणास येथे चिरकाळ राज्य भोगायचे असेल तर येथील स्थानिक राजांना संतुष्ट ठेवणे आवश्यक आहे', हे मुघल सम्राट अकबराने ताडले. आणि म्हणूनच अकबराने भारमलचा पुत्र भगवंतदास ह्याला द्रव्य लालसा दाखवून आपला मित्र केले. हा आमेरचे नाममात्र अधीश्वरत्व दाखवत मुघलांची पंचहजारी मनसब उपभोगत होता. ह्याच्या बहिणीची अकबराने मागणी घातली. ती मान्य झाली आणि भगवंतदासची बहिण म्हणजेच जोधाबाई हिचे मुघल बादशहा अकबर याच्याशी मोठ्या थाटात लग्न झाले. व सर्वप्रथम यांचे रक्तसंबंध निर्माण झाले.
भगवंतदासाच्या नंतर आमेरच्या मांडलिक सिहासनावर मानसिंह बसला. ह्या वंशात दोन राजांची नावे इतिहासात फार गाजली. त्यातील एक म्हणजे मानसिंह! हा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक. शके १४७२,पौष कृ. त्रयोदशी,शनिवार दि. २१ डिसेंबर १५५० रोजी ह्याचा जन्म झाला. हा फार पराक्रमी निघाला. अकबर गुजरातच्या स्वारीत असतांना ह्या मानसिहाने शिकस्त करुन अकबराचे प्राण वाचवले होते. पुढे मानसिंहाने पराक्रम करुन काबुल व बंगाल हे प्रांत जिंकून घेतले. मानसिंह हा फार दिवस अकबराचा मुख्य सेनापती होता. चित्तोडगड काबीज करण्यात अकबरास ह्याची फार मदत झाली. अकबराने प्रथमच सातहजारी मनसब मानसिहास दिली. 'मिर्झा' म्हणजे राजपुत्र हा किताबही त्याने मानसिहास दिला. ह्यावरुनच आमेरचे राजे स्वतःस 'मिर्झाराजे' ही पदवी लावत. इ.स. १५८५ च्या सुमारास मानसिह हा जहागिरदार म्हणुन काबुलवरहि नियुक्त होता. मानसिह दक्षिणेच्या स्वारीत असतांना इ.स. १६१४ मध्ये मरण पावला. त्याचे प्रेत अंबरास आणून दहन करण्यात आले. त्याप्रसंगी त्याच्या १५०० बायकांपैकी ६० सती गेल्या. उपलब्ध महितिप्रमाणे त्यास दोन पुत्र होते. जगतसिंह व भावसिंह. पैकी जगतसिंहाला अकबराने 'रायजादा' ही पदवी दिली. त्याचा अल्पवयात मृत्यु झाला. त्यामुळे आमेरच्या सिहासनावर भावसिंह बसला. हां विशेष पराक्रमी नव्हता. भावसिंहानंतर जगतसिंहाचा पुत्र महासिंह गादिवर बसला. मानसिंहानंतरचे दोघी राजे हे भोगविलासी होते. त्यामुळे यांच्याकाळात विशेष घटना घडल्या नाहीत. महासिंहानंतर त्याचा मुलगा जयसिंह गादिवर बसला.
जयसिंहाचा जन्म शके १५३१ मध्ये आषाढ वद्य १, शुक्रवार, दि. १५ जुलै १६०९ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी (इ.स. १६१७ मध्ये) जयसिंह जहांगीराच्या सैन्यात दाखल झाला. हा आपला आजोबा मानसिंह ह्याच्याप्रमाणेच पराक्रमी होता. शहाजहानच्या काळात असे एकही वर्ष गेले नाही की, याची तलवार चालली नसेल. ह्याने मध्य आशियाच्या बाल्ख प्रांतापासून ते दक्षिणेत विजापूरपावेतो तर पश्चिमेत कंदहारपासून पूर्वेत मोंघीरपावेतो (मुंगेर) सर्वत्र आपल्या समशेरीचा धाक निर्माण केला होता.दूरदर्शी, कुशल राजकारणी, धूर्त कूटनितीज्ञ, बुद्धिमत्ताधुरंधर, पराक्रमी अश्या गुणांनी हा परीपूर्ण होता. जेव्हा शहाजहानच्या पुत्रांत यादवी माजली तेव्हा सुरवातीस हा दारा शुकोहच्या बाजूने होता. नंतर मात्र ह्याने पक्षबदल करुन तो औरंगजेबाच्या पक्षास मिळाला.
पुढे औरंगजेब सिहासनावर बसल्यानंतर त्याने आपल्या ४७व्या सौर वाढदिवसाच्या दिवशी 'सिवा को दफा' करण्याची मोहिम जयसिंहास दिली. इ.स. १६६५ मध्ये इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह होवून शिवाजी राजांना कैद झाली. शिवाजी राजांनी चातुर्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर मात्र जयसिंह औरंगजेबाच्या मर्जीतुन कायमचा उतरला. शिवराय आग्र्याहून निसटल्यानंतर लगेच औरंगजेबाची वक्रदृष्टी जयसिंहाचा जेष्ठ पुत्र रामसिंहावर पडली. त्याची जहागीर जप्त करण्यात आली. त्यास दरबारात यायची मनाई झाली. इकडे जयसिंह हा दक्षिणेच्या मोहिमेवर होता. शिवाजी राजांशी तह झाल्यानंतर त्याने विजापुरावर हल्ला केला. मात्र त्याला अपयश आले. जयसिंह आपल्या पुत्राला रामसिंहाला पत्र पाठवित होता. त्याचे समाधानकारक उत्तरही रामसिंह देत नव्हता. औरंगजेबाच्या मर्जीतुन जयसिंह उतरला होताच मात्र आता तो आपल्या मुलाच्या-रामसिंहाच्या- विश्वासातूनही उतरला. पराक्रमांनी जीवनाची सुरवात केलेल्या जयसिंहाच्या जीवनाची सांगता मात्र प्रचंड मानसिक तणावांनी होत होती.
अखेर मोहिमेची सांगता करुन परत जाण्यासाठी जयसिंह निघाला. पण वातेतच शके १५८९, आषाढ वद्य ५, बुधवार, दि. १८ ऑगस्ट १६६७ रोजी बऱ्हाणपुरजवळ बेहर्डी या गावी त्याचा मृत्यु झाला. काही साधने ह्याच्यावर उदयराज मुंशी ह्या याच्या कारकुनामार्फत विषप्रयोग झाला, असेही सांगतात. तर काही, ह्याच्या धाकट्या मुलाने-कीरतसिंहाने औरंगजेबाच्या प्रलोभनामुळे विषप्रयोग केल्याचेही म्हणतात. बेहर्डी ह्याच गावी मोहना व तापी नदीच्या संगमावर त्याची समाधी आहे. समाधी राजपूत शैलीत बांधलेली असून ती ३२ खांबांवर उभी आहे. समाधीवर एक मोठे शिखर असून त्याच्या भोवती इतर ४ मोठे आणि ४ लहान शिखरही आहेत.
जयसिंहास दोन पुत्र होते व पाच कन्या होत्या. ५ कन्यांपैकी सुकिजावतीबाई व निजामबाई ह्या दोन. रामसिंह व कीरतसिंह हे दोन पुत्र.
जयसिंहाच्या मृत्यूनंतर बादशहाने आमेर खालसा केले. पण त्यास आसमच्या मोहिमेवर पाठविण्याच्या वेळी हा खालसा उठविण्यात आला व रामसिंह आमेरच्या गादिवर बसला. इ.स. १६६७ मध्ये रामसिंहाची आसमच्या मोहिमेवर नियुक्ति झाली. १६६७ ते १६७६ च्या दरम्यान ही मोहिम चालली. जयसिंहास सहाहजारी मनसबदारी होती. पण रामसिंह मात्र चारहजारी मनसबदार होता. पुढे औरंगजेबाने रामसिंहास कोहात येथे पाठवले व तेथेच इ.स. १६८८ मध्ये त्याचा मृत्यु झाला. त्यास किशनसिंह (कृष्णसिंह) नावाचा मुलगा होता. हा बाल्ख प्रांताचा सुभेदार होता. इ.स. १६८२ मध्ये त्याचा मृत्यु झाला. रामसिहानंतर त्याचा नातू विष्णुसिंह व त्यानंतर द्वितीय जयसिंह किंवा सवाई जयसिंह उत्तराधिकारी झाला.
इ.स. १६८८ मध्ये जन्मलेल्या सवाई जयसिंहाने आपल्या नावावरून जयपुर किंवा जयनगर नावाची राजधानी स्थापन केली. सवाई जयसिंह हा गणित व ज्योतिषशास्त्राचा भोक्ता होता. या विषयांचे त्याचे वाचन विपुल होते. मुघल बादशहा फरुखसियार ह्याने जयसिंहास 'राजराजेंद्र' ही पदवी दिली. पण ज्याप्रमाणे प्रथम जयसिंहाच्या (मिर्झाराजे जयसिंह) काळात अंबर किंवा आमेर राज्यास मान होता, तो ह्याच्या काळात नाहिसा झाला. मुघल दरबारात हा केवळ ३ हजारी मनसबदार होता. पुढे इ.स. १७४३ मध्ये ह्याचा मृत्यु झाला.
'हिंदूलोकांची अंतःकरणे, त्यास ममतेने वागवले असतां ते आपले गणगोत सुद्धा विसरून आपल्या उपकारकर्त्याला मनापासून भजणारे आहेत; स्वतःचे हिताहित न पाहता हर एक वर्षाचा त्याग करुन आपली कृतज्ञता ते व्यक्त करतील', ह्या सिद्धांताचे उत्तम उदाहरण म्हणजे हे घराणे! स्वतःजवळ विविध गुण असूनही ते इतरांसाठी वापरून अश्या घरण्यांनी स्वतःचे आणि परिणामी देशाचेही नुकसान केले आहे.
अस्तु. सवाई जयसिंहानंतर ईश्वरीसिंह–माधवसिंह प्रथम–पृथ्वीसिंह–प्रतापसिंह–जगतसिंह–जयसिंह तृतीय–(जयपुर राज्यात ब्रिटिश राजवट- इ.स. १८३३)–रामसिंह द्वितीय–माधवसिंह द्वितीय असा वंश चालू असता माधवसिंहानंतर जयपुरच्या गादिवर सवाई मानसिंह बसला. हा जयपुरचा शेवटचा राजा. कारण ह्यानंतर मार्च १९४९ मध्ये जयपुर राज्य स्वतंत्र भारताच्या राजस्थान राज्यात विलीन झाले. पण यापुढे वंशवृत्त द्यायचा झाला तर सवाई मानसिंहानंतर त्याचा पुत्र भवानीसिंह यांचे नाव येते. यांनी स्वतंत्र भारताच्या सेन्यदलात आपली सेवा दिली. इ.स. १९५१ मध्ये ते राष्ट्रपति अंगरक्षक म्हणुन नियुक्त झाले होते. १६६३ पर्यंत ते ह्या पदावर होते. पुढे १९६३ मध्ये ५० पेराशूट ब्रिगेड मध्ये ते नियुक्त झाले. १९६८ मध्ये सेनेच्या Special Force बटालियनचे ते कमांडिंग ऑफिसर (CO) झाले. १९७१ च्या भारत-पाक युद्धात व भारताच्या श्रीलंकेमधील मोहिमेत (ऑपरेशन पवन) मध्येही ते सहभागी होते.
सैन्यदलातून सेवा निवृत्त झाल्यानंतर ते ब्रूनेई ह्या देशात १९९४ ते १९९७ मध्ये भारताचे उच्चायुक्तही होते.
दि. २४ जून १९७० रोजी ते जयपुरच्या गादिवर बसले. १९६६ मध्ये सिरमुर साम्राज्यातील (सध्या हिमाचल प्रदेश) राजकुमारी पद्मिनी देवी ह्यांच्याशी भवानीसिंहांचा विवाह झाला. १९७१ मध्ये ह्या दांपत्याला दिव्या कुमारी ही मुलगी झाली. राजकीय कारकीर्द म्हणुन दिव्या कुमारी ह्यांनी २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
भवानीसिंहांना पुत्र संतति नव्हती. म्हणुन त्यांनी आपल्या मुलीच्या (दिव्या कुमारी) मुलाला दत्तक घेतले. त्यांचे नाव पद्मनाभसिंह. भवानीसिंह यांनी आणिबाणीच्या काळात काही काळासाठी तुरुंगवास भोगला आहे. १९८९ च्या लोकसभा निवडणुकित ते कोंग्रेस पक्षाकडून उमेदवार होते. पण त्यात त्यांचा पराभव झाला.
२०११ मध्ये त्यांचे काही अवयव निकामी झाल्याने त्यांचा १७ एप्रिल २०११ रोजी निधन झाले. तत्कालीन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ह्यांनी भवानीसिंहाच्या मृत्युनिमित्त ३ दिवसीय दुखवटा घोषित केला. अंत्यसंस्काराआधी त्यांचे प्रेत जयपुरच्या राजप्रसादात जनतेला दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
भवानीसिहांनंतर त्यांचे नाममात्र उत्तराधिकारी (जयपुरच्या गादिवर) त्यांचे दत्तक पुत्र पद्मनाभसिंह झाले. २ जुलै १९९८ रोजी जन्मलेले पद्मनाभसिंह हे पोलो खेळाडू आहेत. त्यांनी अजमेरच्या मायो कॉलेज व समसेट, इंग्लंड येथे शिक्षण घेतलेले असून ते सध्या न्यूयॉर्क येथे आहेत.
संदर्भ–
१)कर्नल टॉडलिखित जयपुर का इतिहास (हिंदी अनुवाद- बलदेवप्रसाद मिश्र)
२)जयपुर का इतिहास- हनुमान शर्मा
३)मुसलमानी रियासत-गो.स.सरदेसाई
४)शककर्ते शिवराय-विजयराव देशमुख
विकिपीडीया
©अनिकेत वाणी

No comments:
Post a Comment