मराठ्यांच्या इतिहासात पाच संभाजीराजे
मराठ्यांच्या इतिहासात पाच संभाजीराजे महत्त्वाचे होऊन गेले, मालोजीराजे हे छत्रपती शिवरायांचे आजोबा, त्यांचे धाकटे बंधू विठोजीराजे यांचे त्यांना मोठे सहकार्य होते, विठोजीराजे यांचे किमान 8 पुत्र तर नोंदविले गेले आहेत, त्यात संभाजी(प्रथम) नामक जेष्ठ पुत्र होते, प्रसिद्ध खंडागळे हत्ती प्रकरणात दत्ताजी जाधवराव त्या हत्तीवर चालून गेल्यावर त्या हत्तीच्या रक्षणार्थ विठोजीपुत्र संभाजी प्रथम हे खेळोजी या बंधुसह चालून गेले, झालेल्या अतुलनीय युद्धात संभाजी प्रथम यांच्याद्वारे दत्ताजी राजे हा लुखजी राजेंचा पुत्र मारला गेला, हे समजल्यावर शहजीराजेंनाही मूर्च्छित करून लुखजींनी संभाजी प्रथम यास धारातीर्थी पाडले.
पुढं आपल्यास लक्षात येईल, आपल्या या चुलत बंधुवरून शाहजी महाराज यांनी त्यांचा युवराज थोरले पुत्र यांचं नाव संभाजी (द्वितीय) ठेवले. हे शिवछत्रपतींचे जेष्ठ बंधू व शाहजीराजे यांचे वारसदार म्हणून बालपणापासून कारभार पहात , तरुण शायिस्तेखान शाहाजी महाराजांवर चालून आले असता याच संभाजींनी युद्धभूमीवर साथ दिली, पुढे हे संभाजी राजे द्वितीय अवघ्या तिशीत कनकगिरीच्या युद्धात मारले गेले.
यांच्या मृत्यूनंतर जेष्ठ शिवपुत्र जन्मास आले, शिवरायांनीं आपल्या जेष्ठ पुत्राचेही नाव थोरल्या बंधुवरून संभाजी ठेवले, हे छत्रपती संभाजी (तृतीय) , यांनाही 32 व्या वर्षीच वीरत्व प्राप्त झाले व राजाराम महाराज कारभार पाहू लागले, संभाजी व राजाराम महाराज यांच्याविषयी नाही नाही ते पुण्यातून लिहलं जाते पण हे नाते असे होते की राजाराम महाराजांच्या पुत्रानेही कोल्हापूर गादी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात फार समर्थ पणे चालविली, त्यांच्याविषयी तर इतिहास मौन बाळगतो,पण या महाआक्रमक छत्रपतींचेही ,जे राजाराम पुत्र होते , नाव ही छत्रपती संभाजी (चतुर्थ) ! छत्रपती शाहूंप्रमाणेच हे देखील अज्ञात छत्रपती! त्या नंतर राजारामपुत्र संभाजी महाराजांच्या नातवाचे नावही संभाजी(पाचवे) होते. ते छत्रपती असताना राजवाड्यात त्यांचा खून झाला.
No comments:
Post a Comment