भाग १
छत्रपती शाहूंचे स्वराज्यातील स्थान बळकट करण्यात पिलाजीराव जाधवरावांचा मोठा वाटा होता. उत्तर भारतातील दयाबहादराचा पाडाव,पेशवा बाजीरावासोबत छत्रसाल राजास मदत, निजामाविरूध्द भोपाळची मोहिम,जंजिरा मोहिम,वसईची लढाई अशा अनेक मोहिमामध्ये पिलाजीराव जाधवरावांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.छत्रपती शाहू महाराजांचे सल्लागार तसेच थोरले बाजीराव पेशवे व त्यांचे बंधु चिमाजी अप्पांचे ते गुरू होते. उत्तरेत जहागीर मिळूनसुध्दा स्वतः सरंजामदार न होता ते दक्षिणेतच राहिले. त्यामुळे गायकवाड,शिंदे,होळकर,पवार आदीप्रमाणे ते सरंजामदार राजे बनले नाहीत.
याचबरोबर बादशाहचा कारभारी रावरंभाचा बंदोबस्त करून त्यांनी पुणे प्रांताची संरक्षण व्यवस्था चोख ठेवली. पिलाजीरावांना पुण्यापासून दूर ठेवण्यासाठी मोठी राजकारणे खेळून त्यांचा पुणे प्रांताचा अधिकार काढला गेला व पुणे पेशव्याकडे हस्तांतर केले गेले,तरीसुध्दा पिलाजी जाधवराव हे छत्रपती शाहू आणि पेशव्यांशी अखेरपर्यंत प्रामाणिक राहिले.
No comments:
Post a Comment