विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 17 July 2019

#कुळश्रेष्ठ_साबूसिंग_पवार


इ.स. १६४६ साली , वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले . स्वराज्यातील पहिला किल्ला म्हणून या किल्ल्याचे महत्व इतिहासात फार मोलाचे आहे .
त्या समयी श्रीमंती साबूसिंग पवार यांच्या वयाची जवळजवळ साठी (६०) आली होती . साबूसिंग पवार हे शिवाजी महाराजांच्या वडिलांचे , अर्थात, शहाजीराजेंच्या चांगल्या परिचयाचे होते. म्हणूनच की काय , स्वराज्य स्थापनेच्या वेळी आपल्या सोबत विश्वासू व अनुभवी लोकं असावीत , या विचाराने शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या वहिल्या स्वारीत साबूसिंग पवारांना शामिल करून घेतले असावे .
विविध पुस्तकांनमध्ये या स्वारीत सहभागी असल्याचा साबूसिंग पवारांचा उल्लेख सापडतो . या पुस्तकांतील उल्लेखांचे खाली काही संदर्भ दिले आहेत .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...