विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 17 July 2019

वाघाळकर पवार घराण्यातील समाध्या 🙏🚩🙏

*वाघाळकर पवार घराण्यातील समाध्या *
  post and photosammbhar : संतोष झिपरे




























*श्रीमंत साबुसिंग पवारांचे पुत्र कृष्णाजी पवार यांना तीन पुत्र होते . त्यांची नावे१) बुबाजी , २)रायाजी व३) केरोजी होती . त्यापैकी रायाजी पवार हे व त्याचे वंशज वाघाळकर पवार म्हणून ओळखू जाऊ लागले . छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक प्रांती मोहीम करण्यास गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर रायाजी पवार हे आपले बंधू बुबाजी व केरोजी यांच्यासमवेत कामगितरीवर होते .*
*पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी रायाजी पवार यांना पराक्रमी पुरुष जाणून मुलुखाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचे बंधू बुबाजी व केरोजी यांना सामील राहण्यास आज्ञा केली . त्याप्रमाणे रायाजी पवार मातब्बर फौज बाळगून छत्रपती राजाराम महाराज यांचे सन्निद्ध फौजेनिशी राहिले आणि आपल्या दोन्ही बंधूस तापी तिरापर्यंत अंमल बसविण्याच्या कामी मदत केली .*
*पुढे त्यांचे पुत्र मालोजीराव पवार प्रसिद्धीस आले . मराठ्यांच्या चौथाई वसुलीस मोगल अंमलदारांच्या विरोधाला तोंड देण्यासाठी मालोजीराव पवार हे एक प्रमुख फौजबंध सरदार होते . छत्रपती शाहू महाराजांनी यांच्या कर्तबगारी लक्षात घेऊन सेनाबारासहस्त्री हा किताब दिला होता .*
*चौथाई सरदेशमुखी व स्वराज्याची सनद मोगल बादशहाकडून प्राप्त करून घेण्यासाठी मराठ्यांचे दिल्लीस १७१८ मध्ये प्रयाण झाले , तेव्हा मालोजीराव पवार यांनी तुकोजीराव पवार , कृष्णाजीराव पवार व केरोजीराव पवार यांच्या समवेत जाऊन पराक्रम गाजवला .पुढे मराठे व निजाम यांचे १७२८ मध्ये युद्ध झाले . छत्रपती शाहू महाराजांनी मालोजीराव पवार यांना निजमाशी युद्ध करण्यास आज्ञा केली . मालोजीराव पवार यांनी तुकोजीराव पवार यांच्या बरोबर निजामाच्या फौजेचा मोड करण्यात पराक्रम गाजवला . माळवा प्रांतातील मोगल अधिकारी दयाबहादूर याच्या बरोबर झालेल्या युद्धात मालोजीराव पवारांनी हत्तीवर चढून आंबरीत बसलेल्या दयाबहादूरला भाल्याने मारले .*
*पुढे हे वाघाळकर घराणे कायम छत्रपतींना एकनिष्ठ राहिले . विश्वासराव किताब व विश्वासराई सरंजाम सर्व पवार बंधूंमध्ये वाटला गेला, त्यात वाघाळकरांना ही हिस्सा होता एकुण समाध्या चार आहेत पैकी १)सरदार जगजीवनराम पवार २)सरदार मालोजीराव पवार ३)सरदार आबाजीराव पवार ४) सरदार खंडेराव पवार१) सरदार जगजीवनराम पवार समाधी विषय -- सदर समाधी हे पुष्करणी बारव शेजारी आहे हे समाधी वाघाळकर पवार घराण्यातील अतिशय सुरेख व मोठा आहे यावरून शरभ आहे तसेच कमळ चिन्हांकित दल आहे त, विशेषतः या एकाच समाधीवर महादेवाच्या गळ्यातील नाग फणा काढून तसेच विविध प्रकारच्या कृतीत दिसेन येता वरून जगजीवनराव पवार हे नागभक्त होते असे वाटते तसेच समाधीवर मोर, फूल व दारवाज नक्षी आहे तसेच जगजीवनराम याचा समाधी वर गडंभेरूड आहे हे विशेष हे सर्वात मोठा समाधी आहे.. सरदार मालोजीराव पवार, सरदार आबाजीराव पवार , सरदार खंडेराव पवार यांच्यासमाधी वर वरीलपैकी बहुतेक चिन्हे व नक्षी कमी अधिक प्रमाणात आढळून येईल खंडेराव पवार यांच्या समाधीचा उंच २० फुट आहे तर इतर तीन समाध्या चा उंच २५ फूट आहे या आमच्या सोबत शिवप्रेमी केशव मस्के सोबत होते वाघाळकर पवार घराण्यातील या वीरांना त्रिवार मुजरा सदर समाधी स्थळावर आता जाणाऱ्या प्रवेशद्धारात चलरीचे झाडे आले आहे त म्हणून जगजीवनराव सोडून इतर तीन समाध्या मध्य प्रवेश करते आले नाही याचा दुःख वाटत सदर परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केला जातील असे राजे शहाजी व राजमाता जिजाऊ साहेब चरणी प्रार्थना करत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे९०४९७६०८८८-- ..*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...