विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 22

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 22
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------7

इंग्रजांचा रेसिडंट शिंद्यांच्या दरबारीं प्रविष्ट झाला; व इंग्रजांची कांहीं फौज शिंद्यांच्या मदतीकरितां त्यांच्या सरहद्दीवर येऊन दाखल झाली. सुर्जीअंजनगांवचा तह झाल्यानंतर पुनः इंग्रजांचा व शिंद्यांचा कांहीं दिवस बिघाड झाला. दौलतरावांनी यशवंतराव होळकर व रघुजी भोंसले ह्यांस सामील होऊन पुनः इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फल होऊन अखेर त्यांस मेजर मालकम ह्यांच्या बरोबर ता. २२ नोव्हेंबर इ. स. १८०५ रोजी तह करणे प्राप्त झाले. ह्या तहामध्ये विशेषेकरून पूर्वीच्या तहांतील अटी मान्य करून क्वचित् फेरफार केले होते. पूर्वीच्या तहांत ग्वाल्हेर व गोहद प्रांत दौलतराव शिंद्यांस न देता, त्याबद्दल १५ लक्ष रुपयांची नेमणूक देण्याचा ठराव होता; परंतु ह्या तहनाम्याने ते प्रांत शिंद्यांच्या आग्रहास्तव त्यांस परत दिले. ह्या प्रांताबद्दल इंग्रज मुत्सद्दयांचा पुष्कळ वादविवाद होऊन, अखेर इंग्रजांचा नावलौकिक रक्षण करण्याकरिता ते त्यांस परत द्यावे असे ठरले. १ ह्या वेळचे सर जॉन मालकम, जनरल वेलस्ली वगैरे मुत्सद्दी इंग्रजांच्या नांवाबद्दल कशी काळजी बाळगीत असत, हे ह्यावरून शिकण्यासारखे आहे. ग्वाल्हेर व गोहद प्रांत शिंद्यांस देण्याबद्दल ज्या वेळीं भवति न भवति झाली, ३९ ह्या तहामध्ये मालकम साहेबांनी आणखी एक महत्त्वाचे कलम घातले होते. ते बायजाबाई संबंधाचे होय. बायजाबाई ह्यांचे दौलतराव शिंद्यांशी लग्न झाल्यानंतर, त्या नेहमी त्यांच्या लष्कराबरोबर त्यांचे सन्निध ५.८22--- असत; व त्यांच्या सर्व राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश असे. त्या त्यांच्या 25 स्वारीशिकारीबरोबर स्वतः जात असत. घोड्यावर बसणे, बंदूक मारणे, भाला फेकणे वगैरे शिपाईगिरीच्या गोष्टींमध्ये त्या तरबेज असत. त्यामुळे त्यांचे नांव इंग्रज सेनापति जनरल वेलस्ली व मेजर मालकम ह्यांस पूर्ण माहित झाले होते.संबंधित इमेज

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...