विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 27


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 27
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------3

जुना काळ व जुना इतिहास ज्या गोष्टी शिकवीत आहे, त्या गोष्टींची हिंदुस्थानच्या सुधारलेल्या वर्तमान स्थितींत उणीव असावी, ही मात्र खेदाची व आश्चर्याची गोष्ट होय. ह्यावरून, दौलतराव शिंद्यांच्या वेळचा धामधुमीचा काळ अधिक बरा असे ह्मणावे लागते. असो. दौलतराव शिंदे ह्यांच्या आजारीपणांत रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांनी संस्थानाच्या भावी व्यवस्थेबद्दल पुनः एकदा प्रश्न विचारला. त्या वेळी महाराजांनी असे उत्तर दिले की, “जर राजाची बायको शहाणी व समजूतदार असेल, तर त्याच्या पश्चात् त्याचा कारभार करण्यास तीच पात्र होय. त्या वेळीं रोसडेंट साहेबांनी पुनः विचारलें कीं, परंतु 2 "His boast was (and a most singular one it is, when we remember the low esteem in which women are held in all eastern countries ), that he never undertook an affair of importance without consulting her.” आपणांस दोन बायका आहेत, त्याचा विचार काय ?” महाराजांनी उत्तर दिले “होय. शिरस्त्याप्रमाणे माझ्या वडील पत्नीने माझ्या पश्चात् राज्याचा कारभार चालवावा हे खरे आहे. परंतु राज्यभार हातीं घेणाच्या बायकोच्या अंगीं शहाणपण, जगाचे ज्ञान, व्यवहारांतला अनुभव हे गुण असावे लागतात. ह्या सर्वांची तिच्या ठिकाणीं वानवा आहे. त्यामुळे ती राज्य करण्याचे काम अगदी अपात्र आहे. तिने फक्त राजवाड्यांत बसावे आणि दुवक्तां जेवावे. ह्यापेक्षां तिच्या अंगीं अधिक कांहीं नाहीं. अशा प्रकारें दौलतराव शिंदे ह्यांनी रेसिडेंट साहेबांशीं संभाषण करून आपल्या दोन्ही राण्यांविषयीं आपलें मत कळविले. त्यावरून मेजर स्टुअर्ट ह्यांची बायजाबाईंच्या योग्यतेबद्दल खात्री झाली; व आपल्या पश्चात् बायजाबाईनीं राज्यकारभार चालवावा अशी महाराजांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. मे० स्टुअर्ट ह्यांनी महाराजांजवळ आणखीही दोन चारवेळां ह्या प्रश्नाची वाटाघाट केली. परंतु ज्या ज्या वेळी हा प्रश्न निघाला, त्या त्या वेळीं महाराजांनीं, बायजाबाई शहाण्या व चतुर आहेत असे दर्शवून, “ह्या प्रश्नाचा ब्रिटिशसरकाराने वाटेल तो निकाल करावा; त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.” असेच सांगितले. . दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति दिवसेंदिवस फार बिघडत चालली. पौष महिन्यांत महाराजांनीं मेजर स्टुअर्ट व आग्रा येथील आपले युरोपियन मित्र ह्यांस संक्रांतीचा शेवटचा तिळगूळ पाठविला. बायजाबाईनीं संक्रांतीप्रीत्यर्थ बहुत दाने व देकार केला. ता० १३ जानेवारी रोजी त्यांनी हिंदुरावांस सांगून, काशीचे गंगापुत्र व मथुरेचे चोबे मिळून दोन हजार लोक बोलाविले. व प्रत्येकास एक शेर मिठाई, एक रुपया दक्षणा व लोटाभर तांदूळ देऊन सर्वांस संतुष्ट केले.त्याचप्रमाणे ब्राह्मणभोजने वगैरे घालून हिंदुचालीप्रमाणे सर्व दानधर्म, प्रायश्चित्ते व८2. गोप्रदाने केली. ह्या दानधर्माची कीर्ति त्या प्रांतीं बहुत झाली. ह्या-3 प्रमाणे बायजाबाईनी व हिंदुरावांनी महाराजांच्या जेवढ्या इच्छा होत्या - तेवढ्या सर्व उत्तमप्रकारे सिद्धीस नेल्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...