विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय " भाग 2

" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय " 

भाग 2

◆ सेनापती येसाजी कंकांची स्वामिनिष्ठता : -
कुतुबशहाने , छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले , महाराज आम्हांस तुमच्या सेनेमध्ये खूप प्रमाणात
घोडे दिसतात , पण एकही हत्ती दिसत नाही , तेव्हा महाराज सहजरीत्या म्हणून गेले , आमच्या फौझेमध्ये ,
आम्हांस हत्ती ठेवायाची जरवत नाही ; कारण आमचा
प्रत्येक मावळा हा हत्तीच्याहून अधिक ताकदवर आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच , हे बोलणं कुतुबशहाने खूपच मनावर घेतलं , आणि राजांस सिद्ध करण्यास सांगितले . महाराजांनी कुतुबशहाच्या प्रस्तावास सहमती
दर्शविली व कुतुबशहास म्हणाले , उद्या तुम्ही हत्तीशाळेत
आखाडयाचा इंतजाम करून ठेवा आणि आमचा जो
मावळा तुम्हास हत्तीसोबत लढवायचा असेल त्याला
, खुद्द आपण निवडावे . ठरल्याप्रमाणे हत्तीशाळेत
आखाडयाचा इंतजाम कुतुबशहाने केला , हा विशेष
खेळ पाहण्यासाठी रयतेला सुध्दा बोलावण्यात आले .
काही वेळात , कुतुबशहा आला ; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आले . सांगितल्याप्रमाणे , कुतुबशहाने
निवड केली , राजांच्याच शेजारी उभे असलेले , येसाजी
कंक यांची ! कुतुबशहाने महाराजांस विचारले , क्या ये
लढेगा ? राजांनी येसाजी कंकांस आखाडयास उतरविले ,
आणि येसाजींचा हत्तीसोबत सामना सुरू झाला . पायदळ प्रमुख असल्याने येसाजींना सर्व प्राण्यांची माहिती होती .हत्ती या प्राण्याचा धावण्याचा वेग कमी असतो , त्याचाचफायदा घेऊन येसाजी हत्तीच्या मागे गेले व हत्तीची शेपुट खेचली ( हत्तीची एक कमजोरी होती , हत्तीची शेपूट ओढल्यावर हत्तीला लाथ मारता येत नाही . ) पुढे शेपूट खेचल्यामुळे हत्ती गरागरा फिरायला लागला , येसाजीही त्याबरोबर फिरायला लागला आणि दमून हत्ती बसला व सोंड वर केली , येसाजींनी हीच संधी साधली आणि सापकन सोंडेवर तलवारीचा वार केला , आखाडयात सर्व जण अगदी सुन्न झाले . हत्ती मरण पावला व येसाजींचा विजय झाला .
" शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ " , हे येसाजींनी सिद्ध केले .
कुतुबशहाने येसाजींना , शाही मंडपाजवल बोलाविण्यात आले , कुतुबशहाने आपल्या गळ्यातील
रत्नजडित मोत्याचा कंठा आणि ५ हजार असरफिया
बक्षीस दिले ; परंतु त्यावर येसाजी कुतुबशहास म्हटले ,
" याची काहीही गरज मला नाही , माझं कौतुक करायला
माझे राजे समर्थ आहेत , हा पराक्रम मी राजांच्या चरणी
समर्पित करतो " , एवढं बोलून येसाजी पाच पावलं मागे
जातो . पुढे कुतुबशहाने राजांना एक प्रस्ताव दिला , महाराज असा महापराक्रमी व स्वामिनिष्ठ माणूस आम्हांस द्या , त्याबदल्यात आम्ही तुम्हांस हजारो हत्ती भेट देतो . छत्रपती शिवाजी महाराजांनी , कुतुबशहाच्या या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला व त्याला म्हटले , तुम्ही माझ्याकडून हजारो हत्ती मागा , आम्ही तुम्हांस नजराणा म्हणून बहाल करू , पण स्वराज्यातील आमचा कोणताही मावळा , आम्ही स्वराज्याच्या बाहेर देणार नाही .
यावरून येसाजींची महाराजांविषयी आपुलकी , पराक्रम
आणि स्वामिनिष्ठता सिध्द होते .

No comments:

Post a Comment

संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले

  संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले --------...