विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 August 2019

शिवाजी महाराजांनी आठ विविध लग्न कोणाशी केले? त्यामागचा त्यांचा काही विशेष हेतू होता का?

शिवाजी महाराजांनी आठ विविध लग्न कोणाशी केले? त्यामागचा त्यांचा काही विशेष हेतू होता का?


📷
ओंकार ताम्हनकर (Omkar Tamhankar), इतिहास अभ्यासक

पुढील माहिती मी ऐतिहासिक संदर्भ, बखरी यांच्या आधारावरून देत आहे. उत्तराच्या शेवटी मी संदर्भांची नावे देईन.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकूण ८ लग्ने केली. त्यांचं शेवटचं लग्न सन १६५८ साली सोयराबाईशी झाले.(होय बरोबर वाचलंत. सोयराबाई महाराजांच्या शेवटच्या पत्नी होत्या.)
सर्वप्रथम महाराजांच्या आठही पत्नीची नावे देतो.
१. सईबाई
२. सोयराबाई
३. पुतळाबाई
४.सकवारबाई
५. लक्ष्मीबाई
६. सगुणाबाई
७. गुणवंताबाई
८. काशीबाई.
शिवाजी महाराजांचे पाहिले लग्न नक्की कोणाशी झाले याबाबत इतिहासात ठोस पुरावे मिळत नाहीत. परंतु ते नक्कीच सगुणाबाई आणि सईबाई यांच्यापैकी कोणी एकीशी झाले आहे.
कवींद्र नेवासकारांनी शिवाजी महाराजांच्याच आज्ञेवरून लिहिलेल्या ‘शिवभारत’ या ग्रंथात उल्लेख येतो की महाराज सुरवातीची १२ वर्षे कर्नाटकातच होते.(सभासद आणि चित्रगुप्त बखरीमध्ये असाच उल्लेख आहे.) व ते पुण्यात येताना स्त्रिया घेऊन आले. ‘स्त्रिया’ म्हणजे नक्कीच एकापेक्षा जास्त.
शिवाजी महाराजांचा सईबाईंशी विवाह १६४१ मध्ये झाला होता म्हणजे त्या ‘स्त्रियांपैकी’ सईबाई या एक. आणि शिवदिगविजय बखरीनुसार ‘सगुणाबाई’ या दुसऱ्या. (बाकी कोणत्याही साधनात सईबाईंच्या आधी सगुणाबाईंशी शिवाजी महाराजांचा विवाह झाला होता हा उल्लेख येत नाही म्हणून आपण महाराजांच्या पाहिल्या पत्नी या “सईबाई” होत्या असंच धरुया.
१. सईबाई
सईबाई या फलटण च्या मुधोजी निंबाळकर(पवार) यांच्या कनिष्ट कन्या. माहेरचे नाव राजसबाई. या लग्नाचा काही विशेष हेतू नसावा. निंबाळकर घराण्याशी भोसले घराण्याचे पूर्वी पासूनचे संबंध होते.
२. सगुणाबाई
सगुणाबाई या राजेशिर्के घरण्यातून होत्या. त्या वेळी शिरठाण हा प्रदेश शिर्क्यांकडे नव्हता. तो आदिलशाह कडे होता आणि मग शिर्क्यांकडे आला. या लग्नाचा असा फायदा झाला की महाराजांनी जेव्हा शिरठाणावर हल्ला केला त्यावेळी कुण्याही शिर्केंनी शिवरायांविरुद्ध तलवार उचलली नाही.
३. पुतळाबाई
महाराजांचा तिसरा विवाह इ.स.१६५३ साली पुणे मुक्कामी विठोजी मोहिते अमीरराव नेवासकर यांची कन्या पुतळाबाई यांच्याशी झाला. संभाजी मोहिते(तेच ते मामा ज्यांना महाराजांनी लाच घेतल्यामुळे घरी जाऊन पकडले आणि मग शहाजी महाराजांकडे कर्नाटकात पाठवून दिले, ते संभाजी मोहिते पुतळाबाईंचे सख्खे काका.)
४. लक्ष्मीबाई
शिवरायांचा चौथा विवाह इ.स. १६५६ रोजी जावळी मोहीमेच्या वेळी गुप्तपणे झाला. लक्ष्मीबाई या विचारवंत विचारे यांच्या कन्या होत. माहेरचे नाव जयश्रीबाई. हे विचारे म्हणजे जावळीचे हनुमंतराव मोरे होत. हे हणमंतराव मोरे चंद्रराव मोरेंच्या पदरी दिवाण व भाऊ म्हणुन होते. त्यांना मारल्याशिवाय जावळीचे शल्य सुटणार नव्हते हे महाराजांना कळून चुकले होते. त्यांची एक सुंदर कन्या उपवर होती. रघुनाथराव बल्लाळांकडून सोईरीकीचे बोलणे केले व लग्न झाल्या झाल्या कट्यारीचे वार करुन विचारेंना ठार मारीले.
५. सकवारबाई
महाराजांचा पाचवा विवाह कृष्णाजी गायकवाड यांच्या कन्या सकवारबाई यांच्याशी इ.स. १६५७ रोजी झाला. कृष्णाजी किल्ले राजगडाच्या ‘दिवाण इ आम’ द्वार बंकी होते.
६. काशीबाई
महाराजांचा सहावा विवाह एप्रिल 1657 रोजी झाला. काशिबाई या संताजी जाधव यांच्या कन्या होय. हे संताजी जाधव म्हणजे ,जिजामातांचे बंधु अचलोजींचे द्वीतीय पुत्र शंभुसिंह उर्फ संताजी.
७. गुणवंताबाई
शिवरायांचा सातवा विवाह एप्रिल १६५७ रोजी शिवाजी इंगळे यांची कन्या गुणवंताबाई यांच्याशी झाला.
८. सोयराबाई
शिवरायांचा हा आठवा व शेवटचा विवाह १६५८ साली संभाजी मोहिते(होय तेच ते संभाजी मोहिते) यांची कन्या सोयराबाई यांच्याशी कर्नाटकात झाला.
सोयराबाई या शेवटच्या राणी मग त्या महाराजांच्या पट्टराणी कश्या?
तर सोयराबाई या सर्वात लहान पण लवकर पुत्रवती झाल्यामुळे सईबाईनंतर त्यांना महाराजांच्या पट्टराणी म्हणून मान मिळाला.
महाराजांचे या विवाहासमयी वय होते २८ वर्षे तर सोयराबाईसाहेबांचे वय होते ८ वर्षे होते. म्हणूनच महाराजांच्या वयाच्या ४०व्या वर्षी राजाराम महाराज झाले.
संदर्भ -
शिवभारत
जेधे शकावली
सभासद बखर
चित्रगुप्त बखर
९१ कलमी बखर
शिवदिगविजय बखर
मल्हार रामराव चिटणीस बखर
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे.
धन्यवाद.
आशा करतो तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असेल.

No comments:

Post a Comment

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...