विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 11


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 11
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
 
बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत----------------------1
.  

 बायजाबाई शिंदे ह्यांच्या वडिलांचे नांव सखारामराव घाटगे सर्जेराव हे होते. महाराष्ट्राच्या इतिहासांत ह्या पुरुषाचे नांव  फार प्रसिद्ध आहे. सखारामराव घाटगे हे कोल्हापूर प्रांतांतील कागल गांवचे देशमुख होत. कागलची देशमुखी फार जुनी असून, ती प्रथम, विजापुरचा पहिला बादशाह युसफ आदिलशाह ह्याचे कारकीर्दीत घाटग्यांच्या घराण्यास बक्षीस मिळाली; औरंगजेब बादशाहाने विजापूर प्रांत काबीज केल्यानंतर, पुनः ती घाटग्यांस वंशपरंपरेनें इनाम करून दिली, अशी माहिती मिळते. घाटग्यांचे घराणे फार प्राचीन असून, त्यांचा मूळ पुरुष कामराज घाटगे हा ब्राह्मणी राज्यामध्ये उदय पावला. त्याच्या वंशजांची एक शाखा मलवडीस राहिली. तीझुंजारराव घाटगे ह्या किताबाने प्रसिद्ध आहे. दुसरी कागल येथे राहिली. ती कागलकर सर्जेराव घाटगे ह्या नांवाने प्रसिद्ध आहे. कागलकरांससर्जेराव' हा किताब विजापुरच्या बादशाहाकडून मिळाला, अशी माहिती उपलब्ध आहे. मि० ग्राहाम ह्यांनीं, घाटग्यांचे मूळपुरुष कागलचे "Representative men of the Bombay Presidency' ह्या पुस्तका मध्ये कागलचे वरिष्ठ शाखेचे जहागीरदार श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब ह्यांच्या घराण्याचा अल्पसा सचित्र वृत्तांत दिला आहे. त्यांत सर्जेरावहे पद विजापुरच्या बादशाहाकडून मिळाले असा स्पष्ट उल्लेख आहेः 
 «The title of Sarjerao was conferred by an Emperor of Bija

देशमुख भानजी घाटगे ह्यांस, शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोंसले ह्यांनी सर्जेराव' हा किताब दिला, असा उल्लेख केला आहे. भानजी घाटगे हे फार पराक्रमी रणशूर पुरुष होते. ह्यांनीं, शहाजीराजे भोंसले ह्यांच्या नौकरींत असतांना, निजामशाही सरदार दुधा सर्जेराव रजपूत. ह्याच्या सैन्याशी मोठ्या मर्दुमकीने युद्ध करून, त्याचा पराभव केला; त्याचा खासा घोडा सर्जा पाडाव करून आणिला. त्यावरून शहाजीराजे ह्यांनी सुप्रसन्न होऊन त्यांससजराव' असे बहुमानाचे पद अर्पण केले. ही माहिती जरी ग्राह्य मानिली, तरी शहाजीराजे ज्या अर्थी विजापुरच्या बादशाहाच्या पदरीं नौकरीस होते, त्या अर्थी विजापुरच्या बादशाहाकडूनच हे पद प्राप्त झाले असावे असे मानणे अधिक सयुक्तिक दिसते. असो. --
pur on one of the chief's ancestors who in fair fight defeated and slew Dudha Sarjerao, a Rajput leader sent by Aurangzib to over-throw the Bijapur dynasty. Bhanji, the Chief of Kagal's ancester as before stated, slew this adversary and wrested the Sarja, head-ornament or crest, from his turban and carried it to the King, who was so pleased with the exploit that he presented the crest to Bhanji, and gave him the title of darjerao."-
 
. मेजर ग्राहाम ह्यांच्या (Statistical Report on the Principality of Kolhapur” नामक उत्कृष्ट माहितीने भरलेल्या ग्रंथामध्यें जो उल्लेख आहे, तो येणप्रमाणेः 1] "Bhanjee Ghatgay, Deshmuk of Kagal, who was in to service of Shahajee, the father of Shivajee, the founder of Maratha empire, having encountered the forces of the Shahee Government, defeated Doodha Surjerao KaJI seized his horse and Surja ( the crest of the horse ) accordingly conferred on him the title of Suriérao.”-fuso * the crest of the horse ), Shahajee१९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...