पानिपत युद्धाविषयी अभ्यासकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. सदाशिवराव भाऊंच्या अहंकारी स्वभावामुळे पराभव पत्करावा लागला. भाऊंचे निकटवर्ती बळवंतराव मेहेंदळे या अविचारी सरदाराला मराठा दौलतीतील शिंदे-होळकरांचे वर्चस्व मान्य नव्हते. या मेहेंदळ्यांच्या सल्ल्याला भाऊंनी वेळोवेळी अवास्तव महत्त्व दिले. शिंदे-होळकरांच्या मनात त्यामुळे अढी निर्माण झाली. सूरजमल जाटासारख्या मित्राचा आधार भाऊंनी गमावला. मेहेंदळ्यांऐवजी भाऊंनी त्याचा सल्ला ऐकला असता तर कदाचित पराभव पाहावा लागला नसता. अवघ्या चार-पाच दिवसात दिल्ली भाऊंनी सर केली. तेव्हा तिथे कोणीही बादशहा नव्हता. शाह आलम या चौदा वर्षांच्या बादशहाच्या मुलाला भाऊंनी तख्तावर बसवले. यावेळी दिल्लीची वजिरी गाजुदी खानाकडे सोपवावी, असा आग्रह सूरजमलने भाऊंकडे धरला. शिंदे-होळकरांचे मतही तेच होते. मात्र, मेहेंदळेंनी भाऊंना नारोशंकरांना ही वजिरी देण्यास भाग पाडले. अशा काही नकारात्मक नोंदी असल्या तरी उत्तरेतली मोहीम फत्ते व्हावी, यासाठी भाऊंनी अहोरात्र उपसलेले कष्ट आणि नेटाने चालवलेले काम याचे महत्त्व कमी होत नाही. वस्तुत: पानिपतावरही मराठ्यांची आधी सरशी होत होती पण नंतर स्थिती बदलली. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांना इथे पठारावर गोलाईचे युद्ध लढावे लागले. त्यात विनाकारण जड तोफा वापरल्याचा आरोपही भाऊंवर केला जातो. युद्धात निसर्गही मराठी फौजांना नडला. दक्षिणायनामुळे सूर्याची किरणे थेट डोळ्यावर पडणे, तोफांच्या भडिमाराचा दुर्गंधीयुक्त वारा मराठ्यांच्या दिशेने वहाणे, अशा गोष्टींमुळे रणभूमीवर प्रत्यक्ष काळही मराठ्यांची परीक्षा पाहात होता.
कारणे काहीही असोत, पराभव झाला हे खरे. मात्र, पेशव्यांना त्या काळात हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा मनात बाळगावीशी वाटली, याचा सार्थ अभिमान मराठीजनांना का वाटू नये? यश अपयश कोणाच्या हाती नसते. पराभव झाला म्हणजे सारे संपले, असा निष्कर्ष काढणेही चुकीचेच. दुदेर्वाने पानिपत म्हणजे लाजिरवाणा पराभव, असा पर्यायी शब्द अथवा वाक्प्रचार महाराष्ट्रात रूढ झाला आहे. मराठा दौलतीसाठी युद्धभूमीवर पराक्रम गाजवून स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्यांच्या हौतात्म्याचे ऐतिहासिक महत्त्व नाकारणे, हा शुद्ध करंटेपणा नव्हे तर काय?
इतिहासाच्या तपशीलांविषयी आस्था नसलेल्यांची ही विकृत मानसिकता म्हणावी लागेल. महाराष्ट्राबाहेरच्या उर्वरित भारताला तुच्छ लेखणाऱ्याच्या संकुचित मनोवृत्तीचेही ते बोलके प्रतीक आहे. दिल्ली महाराष्ट्राला अपमानास्पद वागणूक देते, मराठी जनांविषयी हिंदी भाषिक राज्यांना आस्था नाही, अशी कोल्हेकुई महाराष्ट्रात सतत ऐकू येते

No comments:
Post a Comment