विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 42


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 42
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------8
यशवंतरावभाऊ जिवबा दादा बक्षी
हे जावद प्रांताचे व मेवाडांतील इतर जिल्ह्यांचे सुभेदार होते. ह्या प्रांतांचा सर्व वसूल पूर्वी त्यांच्याकडे सोपविला असून, त्यांत त्यांनी आपल्या हाताखालील सैन्याचा खर्च भागवावा, असा ठराव ( होता. यशवंतरावभाऊ हे दौलतराव शिंद्यांचे प्रख्यात सेनापति जिवबा दादा बक्षी ह्यांचे चिरंजीव होत. ह्यांचे बंधु नारायणराव ह्यांस सजरीव घाटग्यांनी इ. स. १८०० मध्ये तोफेच्या तोंडी देऊन निर्दयपणाने मारिलें होते. यशवंतरावभाऊ हे शिंद्यांच्या दरबारांतील पुढारी सरदारांपैकी एक असून दौलतरावांच्या कारकीर्दीत ह्यांची फार भरभराट असे. ह्यांनी पेंढारी लोकांस इ. स. १८१७-१८ मध्ये साहाय्य केल्यामुळे व त्यांचे रक्षण केल्यामुळे ह्यांची व बंगालच्या सैन्याचे अधिकारी मेजर जनरल ब्रौन ह्यांची लढाई होऊन ह्यांच्या सैन्याचा फार नाश झाला होता. पुढे इंग्रज सरकारचा व दौलतरावांचा तह होऊन मेवाड प्रांत ग्वाल्हेर संस्थानांतून गेल्यानंतर यशवंतरावभाऊ हे ग्वाल्हेरीस येऊन राहिले. ह्यांची स्वतःची जहागीर ४०,००० हजारांची असून ती बायजाबाईसाहेबांनी त्यांच्याकडे चालविली. ह्यांस शिंदे सरकारच्या दरबारांत फार मान असून हे त्या वेळच्या मुत्सद्दी मंडळींतील एक अग्रणी होते.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...