विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 51


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 51
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------17
रावजी त्रिंबक ह्यांचा नामनिर्देश सर जॉन मालकम ह्यांच्या इतिहासांत आला असून, हे गृहस्थ ग्वाल्हेर दरबारांत पुढे फार प्रसिद्धीस७४ आले. ह्यांच्या मदतीने बायजाबाईसाहेबांनी राज्यांत अनेक सुधारणा - केल्या व प्रजेस फार सुख दिले. बाईसाहेबांच्या कारकीर्दीचे अस्सल कागदपत्र अद्यापि उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांच्या राज्यकारभा राची सविस्तर हकीकत देता येत नाहीं. तथापि जी त्रोटक माहिती १) मिळाली आहे, तेवढ्यावरून बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीत ग्वाल्हेर संस्थानांत ज्या सुधारणा झाल्या, त्यांचा संक्षिप्त उल्लेख करण्यास हरकत नाहीं. | बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीत देशामध्ये बरीच शांतता झाली. त्या वेळची देशस्थिति सांप्रतच्या देशस्थितीहून फार भिन्न होती. त्या वेळी प्रत्यक्ष रणभूमीवर अनेक पराक्रम गाजविलेलें व युद्धाकरिता आणि लुटीकरितां सदैव उत्सुक असलेले सैन्य फार होते. त्यास आपल्या ताब्यात ठेवून त्याच्याकडून प्रांताचा बंदोबस्त करविणे व परचक्रापासून आणि चोरलुटारूंपासून प्रजेचे रक्षण करणे ही दोन्हीं कामें युक्तीने करावयास पाहिजे होती. ती बाईसाहेबांनीं, जनकोजीराव ह्यांचा विरुद्ध पक्ष उत्पन्न होईपर्यंत, चांगल्या रीतीने केलीं, महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावले, त्या वेळी ब्रिटिश कांटिंजंट व किल्यांवरचे सैन्य खेरीजकरून, १४,००० पायदळ, १०,००० घोडेस्वार, आणि २५० तोफा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याचा बंदोबस्त करणे फार कठीण काम होते. बाईसाहेबांनी हे सैन्य चांगल्या स्थितीत ठेवून व त्याचे निरनिराळे कंपू करून, त्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमिले. कर्नल स्लीमन ह्यांनी इ. स. १८३३ मध्ये-ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या अखेरीस, शिंद्यांच्या फौजचे २५ कंपू असून, त्यांपैकी ३ कर्नल आलेक्झांडर, ६ आपाजी खंडेराव, ११ कर्नल जेकब, आणि ५ कर्नल फिलोज ह्यांच्या ताब्यामध्ये होते, असे लिहिले आहे. । बाईसाहेबांनी सैन्याची व्यवस्था करून आपल्या राज्यांतील पेंढारी व ठग लोक ह्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...