विनोद जाधव एक संग्राहक

Friday 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 64


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 64
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------9
लॉर्ड वुइल्यम बेंटिंक ह्यांनी राजकारणाच्या हेतूने ह्मणा, किंवा वस्तुस्थितीचे समक्ष ज्ञान करून घेण्याकरितां ह्मणा, ग्वाल्हेर येथे स्वतः येऊन, बायजाबाईसाहेब व जनकोजीराव ह्यांची भेट घेण्याचा निश्चय केला;व त्याप्रमाणे त्यांची स्वारी आपल्या पत्नीसहवर्तमान ग्वाल्हेर येथे ता. १८ डिसेंबर इ. स. १८३२ रोजी येऊन दाखल झाली. खुद्द गव्हरनर जनरलसाहेब ह्यांची स्वारी ग्वाल्हेर येथे येणार असे समजतांच बायजाबाईसाहेब ह्यांस फार संतोष झाला, व त्यांनी त्यांच्या स्वागताची उत्तम प्रकारची तयारी केली. बायजाबाईसाहेब ह्यांची व लॉर्ड उइल्यम, बेटिक ह्यांची जी भेट झाली, तिचे सुंदर वर्णन त्या वेळी हजर असलेल्या एका युरोपियन गृहस्थाने लिहिले आहे. तेच येथे सादर केले ह्मणजे ४. .. १० ११, १,१.१.१ १.२.३ १६L) । त्या प्रसंगाचा हुबेहूब देखावा नेत्रांपुढे येऊन, बायजाबाईसाहेबांचे ऐश्वर्य व संपत्ति ह्यांचीही कल्पना करितां येईल. हे वर्णन पुढे लिहिल्याप्रमाणे आहेः| ** बियाना, डिसेंबर २० इ. स. १८३२–गव्हरनर जनरलसाहेब ग्वाल्हरच्या महाराजांस परत भेट देण्यास गेले, त्या वेळी महाराणी बायजाबाई आणि महाराज जनकोजीराव शिंदे हे नामदारसाहेबांस भेटण्याकरितां धोलपुरापर्यंत आले होते. त्या वेळी त्यांचेबरोबर सर्व प्रकारचे सैन्य मिळून ३०,००० लोक होते. ह्या सैन्याचा तळ ग्वाल्हेरच्या सरहद्दीवर चंबळा नदीचे कांठीं पडला होता. आग्र्याच्या सरहद्दीवरील प्रांत, दोन किंवा तीन मैलपर्यंत, विपुल जलाने परिप्लुत झाल्यामुळे, आह्मांस त्या पलीकडे तळ देणे भाग पडले होते. मराठ्यांच्या लष्करापासून आमचा तळ लांब असल्यामुळे, व नामदार गव्हरनर जनरल ह्यांनी दुपारी तीन वाजतां कूच केल्यामुळे, मराठ्यांच्या लष्कराचा भव्य देखावा अवलोकन करण्यास मला संधि मिळाली नाहीं. ह्या समयीं मराठ्यांचे सैन्य नामदारसाहेबांच्या सन्मानार्थ लष्करी थाटाने जितकें सज्ज होते, तितकें क्वचितच दृष्टीस पडेल. ह्या लष्कराच्या तळापासून नदीच्या काठापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता, तो फारच अरुंद होता. नदीच्या तीरावरील उच्चप्रदेशावर पायदळ पलटणींचे लोक हातामध्ये तरवारी व तोड्यांच्या बंदुकी घेऊन दोन मैलपर्यंत एकसारखे उभे राहिले होते. त्यांच्याकडून नदीच्या बाजूस खाली उतरत आले आणि थोडे वळले, ह्मणजे नीलवर्ण व स्वच्छ अशा चंबळा नदीच्या तीरावर, फारच सुंदर देखावा दृष्टीस पडत असे. तेथे १५ हजार सैन्याची दुतर्फा रांग लागलेली असून त्यांच्या पिच्छाडीस घोडेस्वारांच्या तरवारी चमकत होत्या. हे सर्व लोक नामदारसाहेबांस सलामी देण्याकरितां अगदीं तत्पर झाले होते. हा देखावा
९३ फारच भव्य व अदृष्टपूर्व असा होता. रीतीप्रमाणे गव्हरनर जनरलसाहेबांच्या दुरबारचा समारंभ झाला. महाराज जनकोजीराव हे शृंगारलेल्या हत्तीवर सोन्याच्या अंबारीत बसून गव्हरनर जनरलसाहेबांस अर्ध्या रस्त्यावर सामोरे आले होते. उभयतांची मुलाखत होतांच बंदुकीची फेर झडली. नंतर परस्परांचे मुजरे होऊन नामदारसाहेब आपल्या हत्तीवरून शिंदे सरकारच्या हत्तीवर आले. नंतर उभयतांच्या स्वाच्या दरबारच्या भव्य तंबूमध्ये दाखल झाल्या. हा तंबू ह्या प्रसंगाकरितां उत्तमप्रकारे शृंगारलेला होता.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...