राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे :
ते आपल्या सैन्याच्या मोठ्या तुकडीसह शहाजी राजेंच्या सोबत स्वराज्याच्या सेवेत होते.
मुघल बादशहा शहाजहानने निजामशाही बुडवल्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीमध्ये गेले.
आपला पराक्रम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मलोजी
रणनवरे हे शहाजी महाराज यांचे विश्वासु आणि निकटचे सहकारी बनले.
म्हणून विजापुरास जाऊन त्यांच्या पातशाही मुलकाच्या सनदा आणण्याचे काम शहाजी महाराजांनी आपले प्रतिनिधी म्हणून सरदार मलोजी रणनवरे आणि पंत पेशवे यांना दिले.
आदिलशाहीत गेल्यानंतर मलोजी रणनवरे यांच्या कर्तबगारीवर खुश होऊन शहाजी राजे यांनी आपल्याला जहागीर म्हणून भेटलेला हुक्केरी रायबाग परगणा कारभार करण्यासाठी मलोजी रणनवरे यांच्या स्वाधीन केला.
तंजावर येथील बृहदिश्वराच्या मंदिरावरील जगातील सगळ्यात मोठा शिलालेख कोरला आहे त्यात शहाजी महाराजांना मदत करणाऱ्या ९६ कुळीच्या ९६ सरदारांची आडनावे लिहिली आहेत त्यात रणनवरे हे एक आडनाव सुद्धा आहे.
हुक्केरीच्या ठाण्यात आपल्या कबिल्यासोबत राहून कारभार करीत असताना त्यांनी राख तालुका पुरंदर येथील पाटीलकी खरेदी केली आणि आपले वडील तुकोजी रणनवरे यांना पाटीलकीवर पाठवून दिले असाही उल्लेख आहे.
माहिती साभार अतुल रणवरे
चित्र- सरदार मलोजी रणनवर काल्पनिक
No comments:
Post a Comment