विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 April 2020

मोघलांच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईंनी लिहलेले हे धक्कादायक पत्र

मोघलांच्या कैदेत असताना महाराणी येसूबाईंनी लिहलेले हे धक्कादायक पत्र


मित्रांनो आजचा लेख खूप दुःखदायक आणि खळबळजनक आहे. महाराणी येसूबाईनी लिहलेले अस्सल पत्र आजच्या लेखामध्ये तुम्ही वाचणार आहात. १६८९ मध्ये रायगडचा रायगडचा दुःखद पाडाव झाल्यानंतर महाराणी येसूबाई, शाहूराजे हे मोघलांच्या कैदेत गेल्या होत्या.
अहमदनगरच्या छावणीत असताना येसूबाईसाहेबांना बरोबरच्या सर्वांचा खर्च भागविणे कठीण
पडू लागले.
पापी औरंगजेबास या गोष्टी सांगणे व उदरनिर्वाहासाठी पैसे मागणे हे त्यांना पसंत पडले नसावे म्हणून त्यांनी
चिंचवडचे देव यांचेकडे पैशाची मागणी केली.
त्या पत्रात त्या लिहितात, वैशाख शुद्ध सप्तमी गुरुवार
(११ मोहरम सन म्हणजे २४ एप्रिल, १७०५) (सन ४५ म्हणजे औरंगजेबास जुलुस ४९)
॥ श्रीशंकर ॥
राजश्री श्री देव स्वामीचे सेवेसी
॥श्रीमत् परमपूज्य तपोनिधि मुक्तिदायक सकलगुणालंकरण देव वरदमूर्तिपरायण राजमान्य
राजश्री
आज्ञाधारक सेवेसी मानश्री येसुबाई दोनी करकमल जोडून चरणावरी मस्तक ठेऊन
साष्टांग नमस्कार विनंती,
उपरी येथील क्षेम तागाईत वैशाख शुध सप्तमी गुरुवार
जाणऊन मकाम अहमदनगरी दर्गात स्वामीच्या आशिर्वादेकरून यथास्थित असे स्वकीय कुशललेखन-आज्ञा केली पाहिजे.
विशेष बहुत दिवस जाले. स्वामीनी आशिर्वादपत्र
पाठवून बालकाचा परामर्श केला नाही. याकरिता वित्तास स्वस्थता होत नाही. ते देव जाणे. तरी स्वामींनी येणारा मनुश्याबरोबरी प्रतिक्षणी आशीर्वादपत्र पाठवीत गेले पाहिजे.
विशेष आमचें वर्तमान तरी स्वामीपासी सत्यच लेखन केले पाहिजे. चिरजीव दाजी तो पृथ्वीपतीसमागमें गेले. आम्हांस सार्वभोमाची आज्ञा झाली की, अहमदनगरास जावे.
आज्ञाप्रमाणे आम्हांस अहमदनगरास घेऊन आले.
तेथें आलियावरी आजी पांच मास जाले. परंतु खर्चाची बहुत तंगचाई जाली. काय निमित्य तरी सार्वभोम दूर गेले. आमचा तनखा जो दिल्हा तेथे तामांनी व हरिभक्तांनी व काही काळाने करून प्रतिकूल जाली.यामुळे द्रव्य येणे राहिले.
येथे अहमदनगरी साहुकारांचे पांच सात सहस्र ब्रम्हस्व जाल.आतां कोण्ही देत नाही. मागिल्याच पैकियास तगादे लाविले आहेत. त्यामुळे बहुत कष्टी होतो.
तो दुखसागर स्वामीस काय म्हणऊन ल्याहावा? स्वामीच्या सेवेसी ‘रायाजी जाधव’ पाठविला असे. तरी महाराज कैलासवासी स्वामी गेल्यातगाईत आपणांवरी हा कसला
काल प्राप्त जाला. इंगळास वोळंबे लागले. बरे होणार भविष्य त्यास यल काय आहे?
आता एक स्वामीच क्लेशपरिहार करितील. इतरांच्याने काही होणे नाही. तरी सारांश गोष्टी की, ब्रम्हस्वापासून मुक्त केलियाने बहुत कीर्ति स्वामीची आहे आणि पाऊसपाणी जालियावरी स्वामी ज्यापासन देवितील त्यास प्रविष्ट करून.
परंतु हा समय आम्हांवरी कठीण पडला आहे. आपले कोणी येथे प्रतिपक्षी नाही ऐसा प्रसंग प्राप्त जाला आहे. याचे निवारण करणार स्वामी आहेत. माझी उपेक्षा केली न पाहिजे.
वरकड चिरंजिवाकडील सामराज व आमचें वर्तमान रायाजी मुखांतरी चरणांपाशी विनंती करितां शृत होईल, तें।
सत्यच मानणे. विशेष ल्याहावें तरी आपण अज्ञान, मूढ असे. लिहिता येत नाही. अथवा ज्ञान हि नाही त्याहीवरी आपणांजवळी कोण्ही शाहाणा कारकून नाही. अवाक्षराची क्षमा केली पाहिजे.
कृपा आशीर्वाद निरंतर करीत गेले पाहिजे.
कृपा असों दीजे. जाणिजे मो।
सेवेसी सेवक बसवंतानें चरणांवरी मस्तक ठेऊन सा दंडवत विनंती उपरी लि परिसिजे.
मी सेवक असे.
आशीर्वाद पावीत जाणे. जाणिजे हे विनंती.
रा छ. ११ माहे मोहरम, सन ४९ हे विज्ञापना.
मराठेशाहीच्या एका अभिषिक्त महाराणीस कर्जबाजारी व्हावे लागावे. ‘आम्हांवरी कठीण।
प्रसंग पडला आहे’, हे वाचल्यावर मन सुन्न होऊन जाते.” त्याचे हे पत्र वाचून देव स्वामींनी त्यांना मदत केली की नाही हे इतिहासालाच माहिती!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेने काढलेले हे हलाखीचे दिवस मनाचा छेद करून जातात. किती हा त्याग! फक्त स्वराज्यासाठी! शिवविचारासाठी!
या थोर व्यक्तींचे योगदान विसरून चालणार नाही.ही परिस्थिती घडून गेलेली आहे.ही बदलता येणार नाही.परंतु शिवछत्रपतींनीं हाथी घेतलेले कार्य पुढे नेने आपले नक्कीच कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...