" मृत्युंजय संभाजी "
[ गाथा छत्रपतींच्या बलिदानाची ]
|| पूर्वार्ध ||
आदिलशाही , कुतुबशाही चा शेवट झाला , इतक्या जुन्या दोन पातशाह्या ,मोगलांनी मात्र एक एक वर्षात संपविल्या , आणि त्याने आपला संपूर्ण मोर्चा , हिंदवी स्वराज्याच्या दिशेने वळविला , एकदा पूर्ण पराभव पत्करूनदेखील , अखिल हिंदुस्तानावर एकछत्री अंमल बसवायचा त्याचा खाब पुन्हा प्रज्वलित झाला होता ; परंतु जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज आहेत तोपर्यंत , एक विजय , एक किल्ला सोडा , एक सह्याद्रीचा दगड सुद्धा जिंकू शकत नव्हता , हे वास्तव होते . आणि मोगली फौज पूर्णपणे मराठ्यांविरुद्ध लढण्यास असमर्थ होती ....
[■] औरंगजेबाची कपटनीती : -
औरंगजेब पुरता ओळखून होता , की शंभुराजांना रणांगणात हरवणे हे नामुनकीन आहे , त्यामुळे त्याने त्याचं फितुरीचं अस्त्र बाहेर काढायचं ठरवलं , ह्या अस्त्रानेच त्याने कित्येक युद्ध जिंकली , आदिलशाही व कुतुबशाही ह्या पातशाह्या नष्ट केल्या , आणि इतक्या वर्षांच्या रणसंग्रामात त्याने हे पुरते जाणले होते , की बरेचसे मराठे फुटीर आहेत , वतनासाठी , धनासाठी . स्वार्थीवृत्तीपुढे यांस काहीही दिसत नाही , त्यामुळे लढून जिंकता नाही , आता फोडून जिंकायचं , असा त्याचा नवा पण प्रभावी मनसुभा होता . पण तो हेही जाणून होता , कदाचित शंभूराजे ह्यावर देखील मात करतील ....
■ सन १६८७ च्या वाईट घटना : -
१६८७ हे वर्ष मराठ्यांसाठी खूप हृदयद्रावक होते , ह्या वर्षी वाई येथे , सरनौबत हंबीरराव [ हंसाजीराव ] , तोफेचा गोळा लागून , धारातीर्थी पडले , तसेच ह्याच काळात हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेरप्रमुख , बहिर्जी नाईक सुद्धा मरण पावले , छत्रपती संभाजी महाराजांना हे दोन खूप मोठे धक्के होते ; परंतु अशा प्रीतिकुल परिस्थितीत शिवपुत्र शंभूराजे डगमगले नाहीत , त्याही वेळी त्यांनी योग्य निर्णय घेतले आणि पुन्हा त्याजागी योग्य व्यक्तींची निवड केली , हा बरोबर हंबीरराव आणि बहिर्जी नाईक हे दोन्ही खूप मोठे वीर होते , पण राजांनी पात्र असलेल्या वीरांची त्याजागी नियुक्ती केली , औरंगजेबाला वाटले होते , आता काहीना काही फरक पडेल , पण असे काही झाले नाही , उलटच झाले मराठे मोठ्या फरकाने मोगलांशी जिंकू लागले . औरंगजेब तर पूर्ण हतबल झाला होता , आणि त्याची फौज , सरदार दिल्ली जाण्यासाठी आतुर झाली होती ....
[■] सन १६८८ च्या घटना : -
औरंगजेबाने नवा डाव आखला , त्याने रणनीती बदलली , त्याने हिंदवी स्वराज्यावर आता तीन बाजूंनी आक्रमण करण्याचे ठरविले .
● शहजादा आज्जम - चाकण मार्गे कोकणात
उतरणार होता .
● शहाबुद्दीन खान - राजगड आणि तेथील
प्रदेश .
● शेख निजाम - पन्हाळा आणि कोल्हापूर
[ मुकर्रबखान ] भाग .
त्यास दुर्गराज राजधानीवर , हल्ला करण्याची तीव्र इच्छा होती ; परंतु दस्तुरखुद्द छत्रपती संभाजी महाराज , रायगडावर असल्याकारणास्तव , कितीही नामचीन सेनापती , सैन्यबळ , शस्त्रसाठा , असलाबारुद पाठविला तरीही पराजितच होणार हे शतप्रतिशत त्यास शाश्वती होती .
◆ छत्रपती संभाजी महाराजांची रणनीती : -
राजांनी आखणी अतिशय उत्तमरित्या आखली होती : -
● पेशवे निळोपंत - राजमाचीवर आज्जमच्या
तोंडावर मोर्चे बांधुन होते.
● वीर कलश - मलकापूर , पन्हाळा ,
कोल्हापूर भागात होते .
● सरनौबत म्हालोजी घोरपडे सर्वच भागांवर
बारीक लक्ष ठेवून होते .
● हरजीराजे महाडिक - जिंजी प्रांत .
● तसेच कोकण स्वतः छत्रपती संभाजी महा -
- राज सांभाळायला होते .
● आरमार देखील जागृत होते .
अशी दोन्ही पक्षांची रणनीती होती , मार्च १६८८ ला औरंगजेब विजापूर मधेच होता , आणि राजे रायगडी होते . शंभूराजे नेहमीप्रमाणे एक पाऊल पुढे होते .
[■] कवी कलश - शिर्के वाद : -
राजांच्या आदेशानुसार , कवीराज मलकापूरला आले , तेथील रयतेच्या समस्या सोडविल्या , पन्हाळ्यावर येजा करीत होते , तेव्हाच हरभा देसाई आणि शिर्के यांच्यात फार मोठी वादावादी झाली ( मुळात शिर्के - देसाई ह्यांमध्ये जुने वाद होते , दोन्ही पक्षांची चुकी होती ) , पण त्यावेळेस कविराज ह्यांनी ह्याप्रकरणाचा निकाल लावण्याचं ठरविलं , पण शिर्के न्यायनिवाड्याला यावयास तयार नव्हते , पुढे कविराज स्वतः शृंगारपूर ( शिरक्यांचे मूळ गाव ) ला गेले , शब्दाला शब्द लागला आणि वादाचे रूपांतर लढाईत झाले ; परंतु छंदोगामात्य कवी कलश ह्यांनी माघार घेतली , आणि तडख ते खेळणा [ विशालगड ] दुर्गात गेले , मधल्या काळात शिरक्यांनी स्वराज्याची पागा जाळली होती . कविराजांनी घडलेला सर्व प्रकार शंभुराजांस कळविला .
[◆] शंभूराजे आणि येसूबाई संभाषण : -
महाराजांना कविराजांचा खलिता मिळाला , खलिता वाचताना राजांस अपरिमित दुःख झाले , वेदनाही झाल्या . राजे , सदरेवरून राजमहालाच्या दिशेने गेले , महालात महाराणी येसूबाईसाहेब होत्या , राजे महालात जाऊन आसनावर बसले ; राजांचं मन कचरलय हे येसूबाईसाहेबांनी पुरते ओळखले , आणि त्या म्हणाल्या , " काय झालंय आमच्या स्वामींच्या मुखावर नाराजी का दिसते , राग नाही पण नाराजी आहे , स्वामी नक्की काय झालं ? " , त्यावर राजे म्हणाले , काही नाही राणीसाहेब , काही नाही , राजे स्पष्टपणे बोलावं , आम्हाला एवढ कळलंय की कवीराजांचा खलिता आला आहे . राजे म्हणतात , राणीसाहेब स्वराज्याला पुन्हा फितुरीचं ग्रहण लागलंय , एवढे दिवस सरदार , मंत्री फितूर होत होते , पण आता आपले आप्तजनचं त्या औरंगजेबाच्या लालबारीत जायला लागलेत , का तर वतनासाठी ? , येसू कधी यांना स्वर्गापेक्षा उत्तम अशा हिंदवी स्वराज्याचे महत्व समजेल . राजांचे बोलणं ऐकून येसूबाईंना सर्व काही समजले , राजे गणोजीदादासाहेब ना ....राजे म्हटले , होय येसू , खरं सांगू येसू आम्हांस अजिबात विश्वासाचं बसत नाही , गणोजीराव
असे वागू शकतात [ उपलब्द नोंदीवरून साधारणतः १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर १६८८ साली , मोगलांस मिळाले , कान्होजी शिर्के याआधीच मोगलांस मिळाला होता ] .
राजांचे बोलणं ऐकून ,येसूबाईसाहेब म्हणाल्या , राजे आता तूम्ही आमचा विचार न करता , स्वराज्यात फितुरी ला जो काही कायदा आहे , तो अंमलात आना , आणि राजे आपणच जावे , इतर कोणालाही न पाठवावे ; कदाचित आमच्यामुळे इतर आसामी ला कचरून जाईल , आपणच योग्य तो न्याय करावा . राजे म्हणाले , " जी राणीसाहेब " .... आणि राजे महालातून पुन्हा सदरेकडे गेले .
राजांनी कविराजांना खलिता धाडला की , आम्ही येतोय , त्यावर कविराजांनी राजांस सांगितले की खेळणागडी न येता पन्हाळ्यावर यावे ....
[■] राजे आणि कविराज भेट : -
राजे रायगडावरून ,२ हजार हुजुराती आणि ३ हजाराची इतर फौज घेऊन पन्हाळाला निघाले . पन्हाळ्यावर न्याया - धीश प्रल्हादपंत रावजी मुख्यप्रवेशद्वारापाशी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वागतार्ह आले .काही वेळाच्या अवधीतच कवी कलश आले , कविराजांनी राजांना घडलेला सर्व प्रकार तपशीलवार सांगितला , आणि पन्हाळ्यावरील कारस्थान सांगितलं , प्रल्हादपंत आणि काही कारकुनांनी मिळून पन्हाळा मोगलांस देण्याचे कबूल केलं , तसेच प्रल्हादपंत शिर्के यांस सहायय करत होते . राजांनी तात्काळ पंतांना व साहाय्यक करकुनांस सदरेवर येण्याचे आदेश दिले , लगोलग पंत आले , राजांनी विचारलं पंत नक्की हा प्रकार तरी काय आहे , प्रथम काही बोलले नाहीत परंतु पुढे चौकशी दरम्यान सर्व स्पष्ट झाले . राजांनी सर्व गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा दिली . अजून एक फितुरीचं प्रकरण आणि विशेष म्हणजे , स्वराज्याचे न्यायाधीशांनीच फितुरी केली , यासारखं दुसरं दुर्दैव कोणतं .... पण स्वराज्यपुढे सर्व व्यर्थ , पुढे सर्व फितुरांस बेड्या घालून कैद केलं .
नंतर राजे आणि कविराज यांमध्ये सखोल चर्चा झाली , व विशाळगडाकडे जाण्याचे ठरले . पुढे दुसऱ्या दिवशी , तांबडं फुटताच छत्रपतींचा घोडा , विशाळगडाच्या रोखाणे निघाला , वेग ही शंभूराजांची खरी ताकद होती . राजे विशालगडी आले , गडाची राजांनी स्वतः पहाणी केली , जिथे दुरुस्ती होती , तिथे करण्याचे आदेश दिला , धान्य कोठारात धान्य अति प्रमाणात साठविण्याच हुकूम दिला , दुर्गाची योग्य घडी बसविली ....
[■] मोगलांचा वेढा : -
पुढे राजे पुन्हा पन्हाळ्याला आले , काही दक्षिण भागातील महत्वपूर्ण बैठका होत्या . त्यावेळी कलश मलकापूर वैगेरे भागात योग्य व्यवस्था लावीत होते . आणि ह्यावेळेपर्यंत पन्हाळ्याला वेढा पडला होता . सुमारे २५ हजार फौजेनिशी शेखनिजाम हैद्राबादी उर्फ मुकर्रबखान हा दुर्ग जिंकण्याच्या इच्छेने आला , मुळात ते शक्य नव्हते , ही दुसरी बाब . पन्हाळ्यावर मुबलक फौज , आणि शूर किल्लेदार आणि सरदार होते . विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज , पन्हाळ्यावर आहेत , हे मुकर्रबखानास माहीत नव्हते , हेच छत्रपतींच्या गुप्ततेच रहस्य होते .

No comments:
Post a Comment