विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

"मराठी भाषा दिन आणि महत्व"

"मराठी भाषा दिन आणि महत्व"

■ दैदीप्यमान इतिहास :- मराठी हि काय काल , पर्वा जन्माला आलेली भाषा नाही . मराठी भाषेस हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे . मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोली पासून झाला .

◆मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-

१.इसवी सनापूर्वी २०६ या वर्षी ब्राहनी लिपीत मराठी
भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत .

२."गाथा सप्तशती" हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला . त्यांचा अर्थ असा , कि हि भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे .

३.भांडारकर पुरातत्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८०
हस्तलिखिते मराठी भाषेचे पुरातत्व सिद्ध करणारी
आहे वैगेरे.

◆पुढे 'सातवाहन' या साम्राज्याच्या प्रशासनासाठी वापरली गेली . तिची 'यादव' काळात मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. अकराव्या शतकात मुकुंदराज यांनी ,'विवेकसिंधु व परमामृत ' हा महान ग्रंथ लिहिला . बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी , अमृतानुभव , चांगदेव पा. हरिपाठ असे मराठी भाषेस दर्जेदार साहित्य दिले . संत एकनाथांनी भारुडे , अभंग लिहीले . संत एकनाथ मराठी भाषेचे वर्णन असे करतात , कि " जर संस्कृत भाषा हि देवांची भाषा आहे , तर मराठी भाषा हि काय चोरांची भाषा आहे" . संत तुकारामांनी मराठीतून श्रेष्ठ काव्य दिले . रामदास स्वामींनी 'दासबोध' हा उत्कृष्ट ग्रंथ लिहिला.

आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये जवळ जवळ १० करोड पेक्षा जास्त लोकं मराठी भाषा बोलतात. प्रामुख्याने भारत ,
मॉरिशस , इस्रायल मराठी भाषा बोलली जाते .

■ मराठी भाषा दिन ? :-
श्री विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) , हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी , लेखक , नाटककार , कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले.कुसुमाग्रजांनी दिलेल्या विपुल साहित्याबद्दल , २७ फेब्रुवारी (त्यांचा जन्मदिवस) हा , "मराठी भाषा दिन" म्हणून साजरा केला जातो .

■ मराठी एक वैज्ञानिक भाषा :-
मराठी भाषा हि एक वैज्ञानिक भाषा आहे . तिच कोणतही अक्षर असं का आहे , त्यामागे हि काही कारण आहे . इतर भाषेंमध्ये हि गोष्ट दिसत नाही.

(१) क , ख , ग , घ , ड यांना कंठव्य म्हणतात . कारण उच्चार करताना ध्वनी कंठातून निघतो .
(२) च , छ , ज , झ , ञ यांना तालव्य म्हणतात . कारण यांचा उच्चार करताना जीभ टालूला लागते .
(३) त , थ , द , ध , न यांना दंतव्य म्हणतात . कारण
यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते .
(४) ट , ठ , ड , ढ , ण यांना मूर्धन्य म्हणतात . कारण
यांचा उच्चार जीभ मुरधीला लागते .
(५) प , फ , ब , भ , म यांना ओष्ठय म्हणतात . कारण
यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो .

'एवढी वैज्ञानिकता कुठल्याही भाषेत नसेल'.

मराठीस धोका आहे का ? :-
मराठी भाषेस धोका इंग्रज़ीपासून आहे असे , लोकं म्हणतात . परंतु ज्या भाषा संपुष्टात आल्या , त्यांना मोठ्या स्थानावरील भाषांनी गिलंकृत केलं . पण मराठीसाठी अवघड आहे कारण मराठी मुळातच एक मोठी भाषा आहे . त्यामुळे कुठल्याही भाषेकडून धोका आहे असं वाटत नाही. पण या मराठी भाषेची श्रीमंती , शैली आहे , ती कमी होत चाललेली आहे . त्याला वास्तवदर्शी कारण म्हणजे आपण आपल्या जीवनात अनेक मराठी शब्दांचा वापर कमी केला आहे , किंवा आपण शब्दसंख्या कमी करत चालली आहोत , असं व्हायला नको . आधुनिक पद्धतीतील शब्द आपण स्वीकारले तसेच आपण आपल्या परंपरेला अनुसुरून
मराठी शब्द वापरले पाहिजेत .

■ काही महत्वपूर्ण तथ्यं :-

१) मूळ मराठी भाषाही जास्त मोडी लिपीत लिहिली आहे .
सन १९५१ सालानंतर ती देवनागरीत जास्त लिहली
जाऊ लागली.
२) शिवकाळापूर्वी म्हणजेच सन १६३० पूर्वी मराठीतील ८०% शब्द हे पर्शियन होते , छत्रपती शिवाजी
महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सन १६७७ साली
हा वापर ३७% झाला होता.
३) मराठी भाषेतील ' ळ ' हा शब्द तामिळ भाषेतील आहे .
४) मराठी भाषेतील पहिली व्याकरण पुस्तिका एका इंग्रज अधिकारी , विल्यम कॅरे ह्यांनी सन १८०५ मध्ये तयार केली.
५) १० वर २५ शून्य दिले तर त्याला 'परार्ध' असे मराठी
भाषेत म्हणतात.
६)जगातील प्रमुख २२ भाषेमध्ये मराठीचा समावेश आहे .
७) महाराष्ट्राबाहेर १५ विद्यापीठांमध्ये मराठी भाषा
शिकविली जाते.



" मराठी भाषेचा आपणास अभिमान वाटतो ना , प्रतिक्रिया नक्की कळवा".

।। जय शिवराय।।

आपली भाषा आहे , आपणच तिला महत्व प्राप्त करून द्यायला हवं.

~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)

ई-मेल : rahulp1297@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 7741923346 .

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...