विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

■ महान लखोजीराजे जाधव :-


■ महान लखोजीराजे जाधव :-

आजच्या घडीला भारतातील उत्तरप्रदेश , बिहार , मध्यप्रदेश आणि
महाराष्ट्रातील काही भागात आजही , "मुलींचा गर्भातच
खून" , केला जात आहे . आजही आपल्या या समाजाला
मुलींचं तसेच महिलांचं महत्व समजलं नाही.

सन १५९८ , स्वराज्य
संकल्पक , राजमाता जिजाऊ जन्मदिन ; या दिवशी श्रीमान लखोजीराजे भोसले यांनी सिंदखेड येथे , एक
अविश्वसनिय इतिहास रचला , राजमाता जिजाऊ हे लखोजीराज्यांचे पाचवे अपत्य आहे , जिजाऊंच्या आधी
राजांना ४ मुलं झाली. परंतु त्या मुलांच्या जन्माचं लखोजीरावांना जेवढं कौतुक नव्हतं तेवढं जिजाऊंच्या
जन्माचं कौतुक होतं . लखोजीरावांनी मुलगी झाली या
आनंदात , सिंदखेडमध्ये हत्तीवरून , १०००० लोकांना
साखर वाटली ; हा एक अनोखा विक्रम आहे .

आणि

आज काय परिस्थिती आहे , आज मातेच्या गर्भातच तिच्या अपत्याच (मूलीचा) खून केला जात आहे .

।। धन्य ते लखोजीराजे ।। ।। धन्य त्या जिजाऊ ।।

■ राजमाता जिजाऊंचे काय आहे स्वराज्यासाठी योगदान :-
फाल्गुन वद्य तृतीया , जगातील
सर्वोत्कृष्ट राजा , ज्याच्या पराक्रमी इतिहासाने संपूर्ण जगाला वेड लावले , प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ,
शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला . शिवराय हे जिजाऊ-शहाजीराजे यांचे सहावे अपत्य आहे , प्रथम "संभाजीराजे" आणि मधले ४ अपत्य हे काही कारणामुळे मरण पावले. जेव्हा शिवप्रभूंचा जन्म झाला तेव्हा जिजाऊंचा मन कचरल; कारण जन्माला आलेलं हे अपत्य (शिवबा) हे सुद्धा जगतय कि नाही अशी चिंता होती . परंतु आवाहनाला घाबरतील त्या जिजाऊ कसल्या , शिवरायांना असं घडवल , कि ४०० वर्षे झाली तरी शिवप्रभूंचा संपूर्ण इतिहास , जगाला प्रेरणा देणारं आहे ; आज छत्रपती शिवरायांवर १७७ देशामध्ये अभ्यास होत आहे , जगातील महासत्ता असणाऱ्या देशाच्या(अमेरिका , रशिया , चीन तसेच जपान) युद्धशास्त्रमध्ये छत्रपती शिवराय आणि
जगस्य भूषणम धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांवर धडे आहेत .

राजमाता जिजाऊंनी राजांना
त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा गुण शिकवला , तो
गुण म्हणजे , "स्थितप्रज्ञ". जिजाऊ शिवप्रभूंना म्हणतात , राजे आयुष्यात समुद्रासारखं स्थितप्रज्ञ रहावं. समुद्र कसा
कितीही पाऊस पडला तरी स्थित राहतो तसेच कितीही
दुष्काळ पडला समुद्र स्थित राहतो ( याचा अर्थ असं कि ,
'राजे तुम्हावर कितीही संकटे आली तरी तुम्हाला खचून
न जाता स्थितप्रज्ञ रहा तसेच आयुष्यात तुम्हाला अनेक
विजय मिळतील तेव्हा विजयाच्या आनंदात हुरळून न जाता तुम्हांस स्थितप्रज्ञ रहा .

◆अफजलखान प्रसंगाआधी , दि.१३ जानेवारी १६५९ राजे राजगडावर अफजलखानाविरुद्ध रननीती बनवत
होते , तेव्हा राजमाता राजांस हुरूप देत आहेत . अफजलखानासारखा अतिपराक्रमी शत्रू , ज्याने जिंकण्यासाठी पराक्रमासोबत कपटालाच तेवढं
महत्व दिलं आहे तेव्हा राजमाता राजांचा मनाची
ताकद वाढवत आहेत आणि आजच्या परिस्थितीला
आपली आई आपला मुलानं वा मुलीनं नवीन धंदा
सुरू करायचा निर्णय घेतला तर त्याला सुद्धा प्रखर
विरोध करतात.

"जगस्य भूषणाम , राजमाता जिजाऊ".

■ एक विशेष मुद्दा वा वाक्य :-

" आज स्त्रिया , पुरुषांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत
कमी नाहीत " .

किंवा

" आज स्त्रिया सर्व स्तरावर पुरषांबरोबरीला , खांद्याला
खांदा लावून उभ्या आहेत " .

वरील दोन्ही वाक्ये वाचून आपल्याला वाट त , कि वा
आपण महिलांना सन्मान देत आहोत , पण असं नाही
आहे . अशी सन्मानाची वाक्ये बोलून आपण त्यांचा
खूप मोठा अपमान करत आहोत , ते कसं , आपण
सुरुवातीलाच त्यांची पुरुषांशी तुलना करतो , हीच
सर्वात मोठी चूक . चूक कशी , आपण त्यांची तुलना
करतो हाच महिलांसाठी मोठा कमीपणा .

◆ विशेष नोंद :- ३३ कोटी देवांमध्ये , शक्तीचे स्वरूप हे ,
" पार्वती देवीस " दिले गेले आहे . यानुसार
महिला या शक्तीचं रूप आहे .

■ आजच्या घडीला महिलांची अवस्था काय आहे :-

आज जर भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशाचं उदाहरण बघितलं , भारतात
महिलांवर अत्याचार , व्यभिचार तसेच बलात्कार होत आहेत . दिल्ली गॅंग रेप , कोपर्डी बलात्कार प्रकरण झाले आहेत . आज आपल्या देशात धर्मावरून वाद चालू आहेत परंतु बलात्कारासारख्या महत्वाच्या विषयावर कोणी बोलत नाही , बोलावयास तयार हि नाही . बलात्कारावर जर आळा घालवायचा असेल तर त्यावर एकच पद्धत , ती म्हणजे " शिवकालीन शिक्षा ".

आज सर्वच क्षेत्रात महिला उल्लेखनीय प्रगती करत आहेत , मग ते क्षेत्र शिक्षण , क्रीडा , राजनीती , सैन्यदल ,
वा आणि कुठलंही असो.

।। जय शिवराय ।। जय जिजाऊ।।

~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)

ई-मेल : rahulp1297@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 7741923346 .

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...