विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 16 April 2020

"कात्रजचा घाट दाखवणे" #

"कात्रजचा घाट दाखवणे" #
"एखाद्याला कात्रजचा घाट दाखवला" असे आपण अनेकदा ऐकतो ! या म्हणीचा सरळ अर्थ असा की एखाद्याला फसवून अथवा खोटे बोलून आपल्याला हव आहे तसे घडवून आणने. पण गम्मत अशी की या म्हणीचा उगमाचा शोध आपल्याला थेट शिवकाळात घेऊन जातो. #trek_from_home मध्ये आज आपण ही म्हण नेमकी कोठून आली ते पाहू !
घडले असे की, औरंगजेबाने स्वराज्यावर चालून जाण्याची मोहीम त्याचा मामा अबू तालिब म्हणजेच शाहीस्तेखानाला सोपवली. " सिवाजी तो चूहा है, खाविंद मै ऐसे पकडके लाऊंगा सिवाजी को..!" असे म्हणत शाहिस्तेखान दिल्लीवरून अनेक हत्ती, घोडे आणि लाखाची फौजफाटा घेऊन स्वराज्यावर चालून आला. स्वराज्यातील एक एक प्रदेश जिंकत तो पुणे येथील लाल महालात थांबला ! याच लाल महालात महाराजांचे बालपण गेलेल होते. शिवरायांनी येथेच खानाचा काटा काढायचे ठरवले.
६ एप्रिल १६६३ च्या रात्री बनावट लग्नाच्या वारातीच्या सहाय्याने शिवराय आणि मोजके मावळे लाल महालात शिरले आणि हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. पळण्याचा प्रयत्न करत असलेल्या शहिस्तेखानचा महाराजांनी बरोब्बर मागोवा घेतला. खान थोडक्यात बचावला पण महाराजांनी केलेल्या हल्ल्यात तो आपली तीन बोट गमावून बसला.
पण ऐव्हना खानाचे बाकी सैनिक सावध झालेले. शिवराय आणि मावळे मात्र स्वत:च "शिवा आया... भागो.. भागो.. " ओरडत महालातून बाहेर पडले.
महालातून बाहेर पडल्यावर शिवरायांनी सिंहगडाकडे धाव घेतली. खानाच्या फौजेने पाठलाग सुरु केला. अगदी मोजक्या मावळ्यांनीशी खानच्या सैन्याशी समाना करणे अशक्य होते. पण महाराजांनी नेहमीप्रमाणे गनिमी काव्याचा अवलंब केला. जवळच असलेल्या बैलांच्या कळपातील बैलांच्या शिंगाना मशाली बांधालया संगितल्या. आणि हा कळप कात्रज घाटाच्या दिशेने सोडून दिला. संपूर्ण कळप जळत्या मशाली घेऊन कात्रजच्या दिशेने धावू लागल. खानाचे सैन्या मागोमाग येतच होते. एव्हढ्या रात्री एव्हढ्या मशाली इतक्या वेगाने कुच करत आहेत म्हणजे नक्किच हे मावळे असणार याची त्यांना खात्री पटली आणि ते बैलांच्या मागोमाग कात्रज घाटाकडे वळाले. येथे महाराज मात्र वेगळयाच दिशेने सिंहगडाकडे सुखरुप पोहोचले.
आपल्या गनिमी काव्यामुळे महाराजांनी खानाच्या सैन्याला "कात्रजचा घाट" दाखवून चांगलेच फसवलेले आणि याच प्रसगांला अनुसरुन "कात्रजचा घाट दाखवणे" ही म्हण उदयास आली...

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...