छत्रपती शिवाजी, संभाजींनाही / छत्रपती शिवाजी, संभाजींनाही जिंकता आला नव्हता जंजिरा, वाचा कसे झाले प्रयत्न
post by श्रीकृष्ण नरेंद्र अंकुश
'शिवबा'ने शर्थ केली |'शंभू'ने प्राण लावला ||
या मुघलांमुळे, सिद्ध्या |तुझा, 'जंजिरा' अजिंक्य राहिला ||
किल्ले जंजिरा हा एक अभेद्य आणि अंजिक्य किल्ला आहे. जो आजवर कुणालाही जिंकेणे शक्य झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही. संभाजी महाराजांनी तर किल्ल्यापर्यंत रस्ता तयार करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश आले नाही.
बुऱ्हा खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष. जंजिऱ्याचे सिद्धी मुळचे अबिसीनियाचे शूर आणि काटक होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला. अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न अयशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवणे शक्य झाले नाही. १६१७ ते १९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे 1947 पर्यंत त्याच्याच पिढ्या येथे राज्य करत होत्या. देश स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याला शह देण्यासाठी जंजिऱ्यानजीकच पाच सहा कि.मी. एवढ्या अंतरावर पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधला होता. जंजीऱयाच्या बुरूजावरून आपण तो पाहू शकतो. मात्र तरीही मुरुडजंजिरा जिंकणे राजांना शक्य होऊ शकले नाही. सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. हाच तो पद्मदुर्ग...कोकणावर वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर, किल्ले जंजिरा स्वराज्यात येणे आवश्यक. हे शिवरायांनी जानले होते. म्हणून शिवरायांनी 1659 मध्ये शामराजपंत यांना जंजिरा मोहिमेवर पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. त्यानंतर 1659 मध्ये निळोजीपंत, ,मायाजी भाटकर, आणि रघुनाथराव मुजुमदार यांना जंजिरा मोहिमेवर पाठवले. सिद्धीची कोंडी झाली. मात्र तरीही प्रयत्न अयस्वी झाला. मग तिसऱ्यांदा शिवरायांनी व्यंकोजी दत्तो यांना मेहिमेवर पाठवले. सिद्दीचे हबशी लष्करही दत्तोंवर चाल करून आले. मराठ्यांनी साधारणपणे तीनशे हबशी कापले. हा मोठा पराक्रम होता. यानंतर सिद्दीने सला करायचे ठरवले, मात्र शिवरायांनी सला केला नाही.जंजिरा घेण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी १६८२ मध्ये मोहीम आखली पण त्याचवेळी औरंगजेब स्वराज्यावर स्वारी करून आला त्यामुळे ती मोहीम अर्धवट सोडून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी परत फिरावे लागले. परिणामी त्यांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न अपुरेच राहीला.जंजिरा संस्थानचा शेवटचा मालक म्हणजे सिद्धी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.जर एखाद्या बलाढ्य शत्रुचा हाल्ला झाला आणि तो पेलणे शक्य नसेल तर, शत्रृच्या तावडीतून निसटता यावे यासाठी, किल्ल्यातून राजापुरीपर्यंत एक भुयारी मार्गही काढण्यात आला होता. हा मार्ग आज बंद आहे.हा किल्ला समुद्रात असल्याने आणि त्याच्यावर अनेकांची नजर असल्याने, कितीही बाका प्रसंग आला तीरी किल्यावर अधिक काळ सूरक्षित राहता यावे यासाठी, तेथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यामुळेच हा किल्ला अधिक काळ झुंजवीणे सिद्ध्यांना शक्य झाले.जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो.किल्ल्याच्या भिंतीवर एका वाघाचे चित्र कोरलेले आहे. या वाघाच्या चारही पायांमध्ये हात्ती आहेत आणि त्याने शेपटीत एक हत्ती गुंढाळलेला आहे. या चित्रातून कदाचित सिद्दीला सांगायचे असेल कुणी हत्ती असेल तर मीही वाघ आहे.या किल्ल्याचे विषश म्हणजे किल्ल्याच्या चारही बाजूंना खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. असे आसले तरी या किल्ल्यावर एक गोड्या पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पीण्यासाठी अणि दैनंदीन वापरासाठीही वापरत.किल्ल्याचा दुसरा दरवाजा समुद्राच्या बाजूने उघडतो ज्याला दर्या दरवाजा असं नाव आहे.जंजिऱयाचे सिद्धी हे आफ्रीकेतील अतिशय क्रुर हबशी. इंग्रजांच्या काळात हे सुरूवातीला वझीर आणि नंतर नवाब म्हणून ओळखले जात. त्यांना ११ तोफांच्या सलामीचाही मान होता असे म्हटले जाते.













No comments:
Post a Comment