शिरुर तालुक्यात राजगुरुनगरपासून ३० किमी अंतरावर
*'मलठण'* या गावात सरदार पवारांचा एक भव्य वाडा आपले काही अवशेष घेऊन उभा
आहे. वाड्याचा भव्य दरवाजा त्याला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या तटबंदीच्या
भिंती व बुरुज आजमितीस व्यसस्थित पाहावयास मिळतात. बांधकाम घडीव दगड व
वीटकामातील आहे. दरवाजावर पडिक अवस्थेत नगारखाना आपले अस्तित्व दाखवतो. आत
समोर अतिशय सुंदर अशा घडणीचे जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी
प्रवेशद्वाराच्या खुणा दिसतात. घडीव दगडांच्या भिंती, खांबांचे तळखडे आहेत.
इमारतींच्या भिंतींचे अवशेष चारही
बाजूंस दिसतात. डाव्या बाजूस तटबंदीलगत एक इमारत सुस्थितीत असून ती
परवानगीने ती पाहता येते. आत तळघर, बारव, गच्चीत प्रशस्त खोलीसारखे दालन
आहे.
बाहेरचा दिवाणखाना रेखीव खांब व कमानीयुक्त असून
त्याचे जुने सरदारीपण स्वरुप दाखवून देतो. दिवाणखान्याच्या बाजूस देवघर
असून दिवाणखान्यात कारंजेदेखील आहे.
छत्रपती शिवाजी
महाराजांपासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या , *धार* येथून आलेल्या पवार
मंडळींनी राजाराममहाराजांच्या कारकिर्दीत पराक्रम केला आणि *'विश्वासराव'*
हे पद प्राप्त केले. त्यांचे याच *मलठण* गावात दोन वाडे असून *कवठे
यमाई,* व *आमदाबाद (शिरुर)* येथे भव्य वाडे आहेत.
साभार सौरभ कुलकर्णी
*फोटो - सरदार पवार वाडा,* *मलठण. शिरुर*
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 23 June 2020
सरदार पवार
सरदार पवार
Subscribe to:
Post Comments (Atom)
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
महत्वकांक्षी महाराणी बाकाबाई ( डोंगरक्वीन ) श्रीमंत महाराणी बाकाबाई भोसले (१७७४-१८५८) या दुसरे राजे रघुजी भोसले यांच्या चौथ्या आणि आवडत्या...
No comments:
Post a Comment