विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 August 2020

#दिल्लीवर #मराठा #झेंडा

 


#दिल्लीवर
#मराठा #झेंडा
२६ ऑगस्ट इ.स. १७८७ गुलाम कादर दिल्लीत आला तो जाबेताखानाचा मुलगा आणि नजीबखान रोहील्याचा नातु होता बादशाहाने त्याची बक्षी- उल ममालिक या जागेवर नेमणूक केली आणि अमीर- उलउमरा , रोशन- उद्दौला, बहादूर अशा मानाच्या पदव्या दिल्या...
अतिरिक्त मद्यपानामुळे गुलाम कादरचे डोळे तारवटुन लालभडक झाले होते स्वतःच्या शरीरावर त्याचा ताबा नव्हता बादशाह घाबरून गेला होता वाॅलतर रेनहार्दची विधवा बेगम समरू दिल्लीतच होती तिच्याकडे सैन्य होते तिचे गुलाम कादरशी पटत नव्हते....
गुलाम अंतर्वेदीत गेला त्याचे इतरांशी वाद वाढत गेले तो खुनशी होत गेला ७ ऑक्टोबरला त्याने यमुने पलीकडून दिल्लीच्या किलल्यावर तोफा डागल्या एकुण बारा गोळे किल्ल्यात आले बादशाहाने महादजी शिंदे यांना पत्र लिहिले पण नझीरमंजूर अलीने ते रद्द केले....
त्यामुळे शिंदयांचा प्रतिनिधी अंबाजी इंगळे परत फिरला मराठा फौजा आता चंबळच्या आसपास होत्या मराठयांच्या ताब्यातील बरीच ठाणी लालसोटच्या लढाई नंतर अनेकांनी बळकावली होती पण महादजींच्या सैन्याने इस्माईलबेग आणि गुलाम कादर यांचा मोठा पराभव आग्र्याला केला....
नझीर आणि गुलाम परत दिल्लीला आले बादशाहाने महादजींना मदतीला बोलावले तोवर एक दिवस अचानक गुलाम कादरने दिल्लीत हैदोस घालण्यास सुरुवात केली त्याने बादशाह शाहआलम चे डोळे काढून त्याला अदबखान्यात घातले....
अजाण अर्भके आणि असाहय्य स्त्रीया यांना उपाशी ठेवण्यात आले, त्यांना अन्ना ,पाण्या वाचून तडफडावे लागले ,बायकांचे झाडे घेतले गेले, संपत्तीसाठी किल्ला खणण्यात आला, बायकांना उन्हात ऊभे केले आणि मारले कित्येक नोकर, चाकर मारता, मारता मेले...
किल्ल्या बाहेरील श्रीमंतांच्या हवेल्या उलटया पालट्या केल्या सावकार धरून पैसे काढून घेतले राजघराण्यातील देखण्या बायकांची रोहिल्यांच्या वासनाकांडात आहूती पडली सलग दोन महिने गुलाम कादराचे पिसाट थैमान दिल्लीत सुरू होते....
या काळात गुलाम कादराने मुघल घराण्यातील व्यक्तींना अनंत यातना दिल्या, क्लेश भोगावयास लावले, मानखंडणा केली राजघराण्यातील अश्राप कोवळी बालके, म्हाताऱ्या बायका अंतःपुरातील दासी - बटकी, खोजे लहान दुकानांचे मालक गरीब नोकर
यांना ज्या काही यमयातना भोगावयास लागल्या त्या सर्व लिहावयाच्या तर मोठे प्रकरण होईल मराठयां विरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी सैन्य उभे करण्यास बादशाहाने भरपूर पैसा दयावा म्हणून गुलामाने त्याच्यावर मोठा दबाव आणला गुलाम मराठयांचा मोठा द्वेष्टा होता....
दिल्लीत त्याने जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी,रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले...
एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते.....
गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता....
महादजींनी लिहिले आहे "पुढे घोसगड, सहारनपुर येथे जाऊन दोन्ही जागा लवाजामा व घोसगडात त्याची आई आहे त्यास हस्तगत करणे म्हणून लिहून पाठवले फौजा गेल्या आहेत दोन्ही स्थळे हस्तगत करतील आम्हा कडील लोकांस हिंन्दुस्थानचे स्वारी समागमे आठ - नऊ वर्षे जाहली इतःपर लोक राहणार नाहीत.....
या मागेच गवगवा करोन जावेसे केले होते परंतु रोहील्याने हरामखोरी केली त्याचे पारिपत्य करण्या करिता ज्याने जो गावखेडे अगर महाल मागितला तो देऊन लोकास दिल्लीला रवाना केले त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून गुलाम हस्तगत केला..
महादजींनी २३ डिसेंबर इ.स.१७८८ रोजी नाना फडणिसांना कळवले " गुलाम कादर याने बादशाहाशी बेकैद आणखी हरामखोरी केली त्याचा नतीजा त्यास तसाच देऊन जीवंत धरून पारिपत्य करावे या करिता फौजेने पैक्याने व मेहनतीने जितके प्रयत्न होते तितके केले....
त्याचे सार्थक श्रीमंतांचे प्रतापे होऊन मार्गशीर्ष वद्य ( १९ डिसेंबर ) गुलाम यास जिवंत धरला"
गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या...
गुलामाची आई पंजाबात पळू पाहत होती तिला पकडण्यास रायाजी आणि अलीबहादुर गेले घोसगड मराठा फौजांनी जिंकला आणि तोफा डागून जमीनदोस्त केला गुलामा कडून जिनसांच्या यादया करून घेण्यात आल्या लुट जप्त करण्यात आली....
गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली....
"मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता....
गुलामाचा कारस्थानी मित्र नझीर मंजुरअली याला ही मारण्यात आले दिल्लीच्या बादशाहाचे डोळे गुलाम कादराने काढले होते त्याची परतफेड म्हणून गुलामाचे डोळेही काढण्यात आले....
खैरूद्दीने लिहिले आहे " गुलामाचे मुंडके नसलेले धड पाय वर आणि मानेकडील भाग खाली अशा भयानक अवस्थेत झाडावरून खाली लोंबकळतआहे काळया अंधारासारखे एक श्वान त्या झाडाखाली ठाण मांडून बसले होते गुलाम कादरच्या धडाकडे नजर लावून
बसलेल्या त्या श्वानाच्या काळयाशार डोळया भोवती पांढरीफेक वर्तुळे होती आणि ते श्वान धडाच्या मानेतुन ठिबकणारे रक्ताचे थेंब चाटत होते दगड मारून हाकलून देण्याचा प्रयत्न करून ही ते श्वान पुन्हाः पुन्हा आपल्या त्या भयंकर मेजवानी खाली येतच राहीले....
त्यानंतर दोन दिवसांनी ते मस्तकहीन धड व ते कधीही दिसले नाहीत....
अत्याचारांचा आनंद फार काळ टिकत नाही गुलाम कादराने जे दिल्लीत केले ते हाल त्याच्या वाट्याला आले मराठयांनी यावेळी अतुल पराक्रम करून अन्यायाचा, अत्याचाराचा,अविवेकाचा नायनाट करून दिल्लीत आपले बस्तान परत बसवले....
मराठा झेंडा दिल्लीवर फडफडू लागला मराठा पराक्रमाचे डिंडीम सप्त सागरापार गेले....
संदर्भ - झंझावात...

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...