विनोद जाधव एक संग्राहक

Friday 25 September 2020

इतिहासात 96 कुळी मराठा

 इतिहासात 96 कुळी मराठा

 महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, मानांक, यादव हे सर्व क्षत्रीय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रीय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं.याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे. त्याच कुळांना 96 कुळे म्हणतात, अशी माहिती प्रा. रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या 'मराठा 96 कुले' या पुस्तकात आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंशांच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.

 

अकराव्या शतकापासून 96 कुळे ही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते, व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं," असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात.

संजय सोनवणी यांचे मत

96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. "96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे," असं सोनवणी सांगतात.

सातवाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं. आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला 'रठ्ठ' असं म्हटलं जायचं. या प्रांताच्या प्रमुखाला 'महारठ्ठ' म्हणत. आताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं. महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला,"

महारठ्ठ हे पद पूर्वी वंशपरंपरागत नव्हतं, पण कालांतराने ते पद वंशपरांपरागत झालं. अनेक वर्षं केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्नं जुळली. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं. कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले. तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला, असं आपण म्हणू शकतो,"

डॉक्टर भांडारकर यांचे मत

एकटा क्षत्रिय दहा हजार योद्धाबरोबर लढु शकतो त्या रणधुरंधरास मरहट्ट -महारथी असे म्हणतात, असे इतिहास तज्ज्ञ डॉ भांडारकर ह्यांनी सांगितले आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे कि संस्कृत शब्द 'महाराष्ट्र'या वरून मरहट्ट, महारथी, मराठा हा शब्द उदयास आला असावा. या विषयी आणखी माहिती देतांना ते म्हणतात कि ख्रिस्त सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. याचा उल्लेख कात्यायनात आढळतो. तसेच ख्रिस्तपूर्व आढळणाऱ्या तिसऱ्या शतकातील अधिक राजाच्या शिलालेखातही याचा संदर्भ बघायला मिळतो.

डॉक्टर तुषार देखमुख

96 कुळी मराठामधील काळमुख कुळ - काळमुख कुळ हे 96 कुळातील एक कुळ असुन याच कुळातुनकाळे,काकडे,सुर्वे,शितोळे,गायकवाड,क्षीरसागर व घाटगे ही उपकुळ निघुन 96 कुळातील मुख्य कुळे म्हणुन गणली आहेत.

या काळमुख समुहाचा उल्लेख महाभारतातील पुस्तक 2रे व प्रकरण 30 यात उल्लेख आढळतो. दक्षिण भारतातील दंडक भागातील जे निशद राज्यातील निशदांच्या समुहास काळमुख असे संबोधले आहे. धर्मराज युधिष्ठिराच्या राजसुय यज्ञाच्या पाठिँब्यासाठी सहदेवाने दक्षिणेतील दंडकांचा { महाराष्ट्र} पराभव करुन दक्षिणेतील निशदाना देखिल आपल्या अधिकाराखाली आणले आणी याच दक्षिण निशदांचा उल्लेख काळमुख म्हणुन केलेला आढळतो.

निशदांचा रामायणात देखिल उल्लेख आढळतो.निशद राजा गुहा हा प्रभु रामचंद्राचा खुप जवळचा मित्र असुन त्याने रामचंद्र व सिता याना गंगा नदी पार करण्यासाठी मदत केल्याचे उल्लेख वाल्मिकी रामायणात मिळतात.

काही यादव-जाधव यांचे गोत्र कौँडिण्य आढळते आणी विदर्भात कौँडिण्यपुर नावाचे गावदेखिल आहे. यावरुन हेच लक्षात येतेकी प्राचिनकाळी निषद राजांचे व महाराष्ट्रातील यादव राजघराण्यासोबत विवाह संबंध आढळतात तसेच ते आजही निषद काळमुख कुळांचे इतर मराठा क्षत्रियांशी आहेत हेच दिसुन येते.या लेखामध्ये राष्ट्रिक,पैठणीक अशी नावे आढळतात, जी हल्लीच्या मराठ्यांचे पूर्वज होते. अशोक राजाच्या कुंडे येथील शिलालेखात महाभोजाचा उल्लेख आहे. याप्रमाणे पतंजलीच्या १००० वर्षे आधी उत्तर-दक्षिण भागात दळणवळण चालू होते व महाराष्ट्रात राष्ट्रिक, महाराष्ट्रिक व भोज लोकांची राज्ये होती.

यापुढे मराठाच्या उल्लेखाबद्दल बोलायचे झाले तर हरिवंशात नाग उपनावाच्या क्षत्रिय राजकन्येपासून झालेल्या यदु च्या ४ पुत्रांनी सह्यांद्रीपासून थेट कन्याकुमारीपर्यंत ४ राज्ये स्थापिली असा उल्लेख सापडतो. आणि मराठांच्या जागेच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर विदर्भ देशाचे भोज राजे सोमवंशी असून ते यदुकुळातून आले असल्याचा इतिहास आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...