पिलाजीराव सणस देशमुख
इतिहासाच्या पोटात लपलेले अनेक योद्धे आहेत ज्यांचा इतिहास जाज्वल्य तर असतो पण बर्याचदा माहित मात्र नसतो....
कधी कुणी तो जाणिवपुर्वक लपवुन ठेवतो तर कधी शोधणार्याची नजर कमी पडते...
असाच एक अपरिचित योद्धा
'पिलाजीराव सणस देशमुख'


वंदनगड,राजगड,तोरणा या गडांवर सणस मंडळी मेटकरी असत.





मुरारबाजींचा लढा सर्वज्ञात आहे. ते कामी आल्यानंतर फौजेची मनधारणी करुन पराक्रमाची शर्थ करणारे 'पिलाजीराव सणस देशमुख' मात्र जनसामान्यांना ज्ञात नाहीत.
'भल्याभल्यांनी' पुरंदरच्या लढाईचा इतिहास लिहीलाय पण पिलाजीरावांचा उल्लेख नगण्यच...(नाहीत जमा)
पिलाजीराव सणस यांची नोंद 'हशम मावळे सरदार असामी' या लेखात सभासदाने केली आहे.
पुढे छत्रपती संभाजीराज्यांच्या हत्येनंतर औरंगजेबानं तोरण्याला वेढा टाकला तेव्हा तोरणागडाचे मेटकरी सणस यांनी शिबंदी जमवुन जोरकस लढा दिला.
आजही तो भाग सणसांचे मेट(सणसवाडी) या नावानं ओळखला जातो.
गुणाजी सणस
बाजी सणस
येसजी सणस
अनाजी सणस
राजजी सणस
आदी सणस घराण्यातली मंडळी स्वराज्यासाठी लढली
या घराण्याचे वंशज
केंजळगड
वंदनगड
विंझर
तोरणागड
खोडद
आसरे
कारी
रेनावळे
कांबरे
सणसवाडी
देवपाल
संगमनेर
प्रतापगड
रायगड या भागात अद्यापही वास्तव्य करुन आहेत..
# इमान
# मराठा_रियासत
संदर्भ :-
1-सभासद बखर-र.वि.हेरवाडकर, पृष्ठ 120.
2-स्वराज्याचे शिलेदार-दामोदर मगदुम.
No comments:
Post a Comment