विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 20 September 2020

#स्वराज्यातील_गडकोटांचे_अभियंते ✍️हिरोजी इंदुलकर

 #स्वराज्यातील_गडकोटांचे_अभियंते ✍️
"थोरले महाराज ( छत्रपती शिवाजी महाराज ) पुंडावे करीत असेत समई....
चुलते आर्जाजी यादव व हिरोजी फर्जंन हे दोघे इमारतीचे हवालदार यांजजवळ अठरा हजार माणूस इमारतीचे.
येकाचे नऊ हजार व येकाचे नऊ हजार.
येकून अठरा हजार. "
....यादव दप्तरा ( सन १६९८ दरम्यान ) "बादशहाला ( औरंगजेब ) जगात काय कमी आहे."
"पण किल्ले जिंकून घेण्याचा काय विलक्षण लोभ त्याला आहे.
धोंड्याच्या त्या ढिगार्यांसाठी ( किल्ल्यांसाठी ) तो पहा कसा रानोमाळ भटकत आहे."
"बादशहाच्या डोक्यात किल्ले जिंकून घेण्याचे वेड शिरले आहे."
वरील उद् गार आहेत मोगल तोफखान्याचा हिशोब तपासनीस भीमसेन सक्सेना याचे जो औरंगजेबा बरोबर दक्षिण मोहिमेत हजर होता. औरंगजेबाला वेड लागले होतेच, ते वेड होते हिंदवी स्वराज्य बुडविण्याचे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभे केले आणि संभाजी महाराजांनी " आता हे हिन्दुराज्य जाहले "
असा जगाच्या पाठीवर एकमेव शिलालेख ( हडकोण-फोंडाजवळ गोवा ) कोरून ठेवला.
औरंगजेबाला हे कसे सहन होईल.
आणि हिंदुंचे राज्य उभे होते ते या गडकोटावर. राज्य संपवायचे तर हे गडकोट घेतले पाहिजेत.
स्वराज्याचे संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग हे औरंगजेबाने देखील जाणले होते.
शिवरायांनी म्हटले होतेच,
"दिल्लिंद्रासारखा ( औरंगजेब ) शत्रू उरावर आहे.
तो आला तरी नवे जुने तीनशेसाठ किल्ले हाजरीस आहेत.
एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशेसाठ वर्ष पाहिजेत.
"सह्याद्रीतील या गड-कोटांपुढे औरंगजेबाला हार मानावी लागली.
अखेर या ठिकाणीच औरंगाबाद ( संभाजीनगर ) येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यू बरोबर प्रचंड मोगल साम्राज्याच्या विनाशाला वेगाने सुरूवात झाली आणि थोड्याच वर्षांनी अटकेवर शेकडो वर्षा नंतर मराठ्यांनी भगवा झेंडा फडकला.
✍️
हो आणि याची सुरवात झाली ती आपल्या शिवछत्रपती यांच्या बलाढ्य आणि अभेद्य अशा बुलंद गडकोटांच्या देशातून🚩
✍️


हिरोजी इंदुलकर म्हणजे साधे-सुधे व्यक्ती नव्हते,
तर स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र, खगोलशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांचा खोल अभ्यास व ज्ञान असलेला महाराजांच्या पदरीचा
हा हिरा होता!
‘विद्या विनयेन शोभते’ या म्हणीचा खरा अर्थ हिरोजी इंदुलकरांनी जगून दाखवला.
● सेवेचे ठाई तत्पर हीरोजी इंदुलकर ●
स्वराज्याचे बांधकाम प्रमुख .
PC Credit :-
@swaraj_shreeniwas_wandre_01 .

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...