मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Saturday, 31 October 2020
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )
चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते. पन्हाळ्यावर त्रिंबक भास्करांबरोबर बंदोबस्तासाठी बाजी, फुलाजी थांबणार होते. तर दहा हजार शाही फौजेला तोंड द्यायला पाच हजार मराठी वाघ निघाले. गोदाजी जगताप, वाघोजी तुपे,हिरोजी इंगळे, भिमाजी वाघ, सिधोजी पवार, महाडिक, जाधव, पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल हे महाराजांचे साथीदार व अर्थातच सरनौबत नेतोजी होतेच. सोमेश्वराचे आशीर्वाद घेउन वेगाने सैन्य कोल्हापुरच्या दिशेने निघाले. थोड्या वेळात त्यांना आदिलशाही चाँदतार्याबरोबर असलेल्या फौजा दिसु लागल्या. फाझलला बहुधा शिवाजी ईतक्या लवकर आपल्या समोर असा उघड्या मैदानात येईल, याची अपेक्षा नसावी. पन्हाळ्यावर हल्ला करायची योजना तो तयार करत होताच, तो हि सगळी झुंड त्याच्यासमोर होती. धीर धरुन रुस्तमेजमान फौजेला तयार करु लागला.रुस्तम स्वतः मध्यभागी, रुस्तमच्या डाव्या अंगाला फाझलखान, उजव्या अंगाला मलिक ईतबार्,पिछाडीला अजिजखानचा मुलगा फतहखान, बाकी मुल्ला.बाजी घोरपडे, सर्जेराव घाटगे होतेच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10
क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...

-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
25 सप्टेंबर 1750 रोजी नानासाहेब पेशवे व राजाराम महाराज द्वितीय यांच्यात सांगोला करार झाला सांगोला करार :- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थाप...
-
साळुंकीचे पाखरू अथवा साळुंकीचे पंख कुलचिन्ह अर्थात देवक : राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे --------------------------- ---------------------...
No comments:
Post a Comment