विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 April 2021

खंडेराव दाभाडे यांची नेमणूक छत्रपती महाराजांनी १८ कारखान्यांवर देखील केल्या असल्याच्या नोंदी

 

पोस्टसांभार : - सरदार सत्यशीलराजे दाभाडे
(राजेसाहेब - तळेगांव दाभाडे)
"श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे" यांची हिंदवी स्वराज्याच्या "सरसेनापती" पदावर नेमणूक '११ जानेवारी १७१७' ला "श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (सातारा)" यांनी वंशपरंपरेने केली.
त्या आधी

खंडेराव दाभाडे यांची नेमणूक छत्रपती महाराजांनी १८ कारखान्यांवर देखील केल्या असल्याच्या नोंदी सापडतात....
हेच ते 'सरदार खंडेराव दाभाडे' यांच्या देखरेखीखाली असलेले '१८ कारखाने' 👇🏻
हत्तींची व्यवस्था ठेवण्याची स्वतंत्र इमारत.
उंटांची व्यवस्था ठेवण्याची स्वतंत्र इमारत.
तोफगाडे, बैलगाड्या, मालवाहतूकीच्या गाड्या यांच्या निर्माता, देखभाल या जागी होत.
कुस्त्यांचा हौद, व्यायामाची जागा.
धान्याची कोठारे.
प्राणी, पक्षी यांचे संग्रहालय.
स्वयंपाकघर, शिजवलेले पदार्थ ठेवण्याची जागा.
नगारे वाजवण्याची जागा.
वाल्यांच्या बसण्याची, औषधे बनवायची व ठेवायची जागा.
पाणी साठवण्याच्या टाक्या, हौद, तलाव यांची देखरेख व व्यवस्था.
लाकूड व गवत साठवण्याची जागा.
दागिने तयार व दुरूस्त करण्याची जागा.
करमणूक गृह.
जोखमीचे जड-जवाहीर दाग-दागिने आदि वस्तू ठेवण्याची जागा.
शामियान्यांची कापडे, राहुट्या, तंबू, ते उभी करण्यासाठी लागणारी हत्यारे, दोर्या, जाजमे, आदि सर्व सामान ठेवण्याची व डागडुजी करण्याची जागा.
भांडी, वेगवेगळ्या वस्तू, किरकोळ सामान ठेवण्याची जागा.
तोफा ओतण्याची, दुरूस्ती व देखभाल करण्याची जागा.
कागदपत्रे व्यवस्थित बांधून ठेवण्याची जागा.
- सरदार सत्यशीलराजे दाभाडे
(राजेसाहेब - तळेगांव दाभाडे)

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...