विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 29 May 2021

#भोसले #कुळाचा #आनंदमय #क्षण #किल्ले #शिवनेरी




 #भोसले #कुळाचा #आनंदमय #क्षण

लेखनमाहिती :: Goutam Suman Tukaram Davakhar
ही उत्तम अशी चित्ररूप कलाकृति सर्व इतिहास प्रेमी अभ्यासक यांस शिवनेरी किल्ल्यावरील आनंदमय कौटुंबिक क्षण आपणास अनुभवन्यास दर्शविते. भोसले कुळातील हा सर्वोच्च आनंदमय हर्षउल्हासित सोहळा.
हे उत्तम साकारालेले चित्ररूपी कलाकृति
शिवनेरी किल्ल्यावरील 1630 सालातील समकालीन ईतिहासाकडे आपनास प्रवासास नेते व
याची देही l
याची डोळा ll
आपणास १६३० साला मध्ये घेवून जातो. आपण सर्वानी ही अनमोल कलाकृति चित्ररूपी साकरणार्या चित्रकाराचे अत्यंत विनम्रतेने ऋणी असलेच पाहिजे.
यात प्रामुख्याने
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोंसले
राजमाता जिजाऊ मासाहेब
युवराज संभाजीराजे( शिवरायांचे थोरले बंधू, )
बाल शिवबा
साकारकेल्या प्रतिमा दिसत आहे.
दर्याखानाचा पाडाव केल्यानंतर शहाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर आले. आपल्या पुत्राचे मुखावलोकन करण्यास अत्यंत आतुरता निर्माण झाली होती.
शिवनेरीवर पोचताच शहाजीराजानी बाळ राजाना आपल्या मांडीवर घेतले. ते एकटक बाळराजांकडे पहात राहीले. त्याना बाळ राजांचे फार कुतुहल वाटले. " रानीसाहेब पहातायना बाळराजे कसे हात हलवताहेत. किती तेजस्वी आहेत आमचे
बाळराजे ! शहाजीराजे जसे बोलत होते , तसे बाऴराजांच्या चेहरर्यावर विलक्षण असे हास्य उमटत होते. शहाजीराजानी मोठ्या प्रेमाने बालराजाना आपल्या हदयाशी धरले. केवढ़े हे प्रेम ! एक राजा आपल्या पुत्राचे मूके घेत होता, त्याच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. या आनंदा प्रित्यर्थ शहाजीराजानी आपल्या हर्षभरित अंतकरणाने गायी , सोने , हत्ती, घोड़े, रत्न यांचे दान दिले. त्यानी इतके दान दिले, की त्यानंतर या भागात याचक लोकापैकी कोणालाही किती तरी काळ पर्यंत दुसर्या कोनाकड़े याचना करण्याची गरज राहीली नाही.
शहाजीराजीराजांच्या दरबारातील
समकालीन कवि लेखक परमानंद याने अत्यंत सूरेख वर्णन केले आहे.
" नित्य पराक्रम गाजवनारा तो शहाजीराजा, संभाजीचा धाकटा भाऊ जो कमलनेत्र शिवाजी त्याचे आनंदाने मुखावलोकन करता झाला ll ९४ ll
त्या समयी त्या राजाने आंनदित होवुन गाई, मोहरा , हत्ती, घोड़े, आणि रत्ने ही इतकी वाटली की लगेच सर्व याचक लोकाना दुसर्या कोनाकडे तोंड वेंगाडन्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकता राहिली नाही ll ९५ ll
जय जिजाऊ

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...