विनोद जाधव एक संग्राहक

Friday 28 May 2021

माने घराण्याचा इतिहास भाग १

 माने घराण्याचा इतिहास


भाग १ 

माने यांचे मूळ म्हसवडच लागतंय रहिमतपूर आणि म्हसवड चे माने एकच म्हसवडचेच सगळी कडे जहागिरी देशमुखी मिळाल्यावर गेलेत सगळ्यांना सिद्धनाथ म्हसवड हेच कुलदैवत कोकण. मराठवाडा. कर्नाटक मध्ये हि तसेच तंजावर मध्ये हि तसेच धार मध्यप्रदेश मध्ये हि आहेत हि सगळी माने म्हसवडला कुलदैवत दर्शनाला येतात 30/35हजार कुटुंबे आहेत 

संताजी घोरपडे यांचेत व म्हसवडकर
माने यांचेत वैर निर्माण झाले होते
अमृत निंबाळकर हे माने यांचे मेहुणे
ते संताजी यांचे कडुन मारले गेले होते
नागोजी माने यांचा जमाव मोठा आहे त्यांना दुखऊ नये वगैरे मजकुराचे पत्र
छ.राजाराम महाराज यांचे आहे
महाराष्ट्रातील मराठ्या पैकी काही
घराणी उत्तरेतुन आली आहेत.त्याचेंत
जानवे घालतात दक्षिणेत देखिल मराठा
घराणी आहेत विषेशत: देशमुख मंडळी
तेजानवे घालत नाहित ते मुस्लीम काळापुर्वी गांवे वसाहती खाली आणित
त्यांचे मध्ये कुळींची नांवे नाहीत .
त्याचे कडील संपत्ती व इतर गोष्टीवरुन
त्यांची नांवे.निगडे ,हांडे,कोंडे,गाढवे,काकडे
काळे ,खुसपे इत्यादी आहेत.
जाधव,माने मोहिते वगैरेना असलेल्या देशमुख्या यवन काळच्या आहेत.
एका आख्यायीकेनुसार मानसिंह नावाचे
व्यक्ती ने माण परिसरात सत्ता स्थापन
केली व त्यावरुन माण नदी व माणदेश
ही नांवे आली
दुसरे मतानुसार माण हा खडक व मुरुम किंवा माती यापेक्षा वेगळा प्रकार आहे
या मध्ये सुरुंग उडत नाही. पण माण
मातीचा थर खूप कठिण असतो व
याचे पाठीवर पाणी असते.
महाराष्ट्रातील मराठा समाज
हा उत्तर दक्षिणेचा संयोग आहे.
म्हसवड भीम बहाद्दर सरकार भोस पूर्वी माने होते
भरपूर ठिकाण च्या मानें च कुलदैवत जोतिबा आहे. काशीळ , कसबा सांगाव.. भिमबहाद्दर माने सरकार क. सांगाव हे सासनकाठी क्र ६ चे मानकरी आहेत जोतिबाचे व वर्ग १ सरदार करविर दरबारातले..
माने नाव अनेक कुळात आहे , पण ज्यांचे देवक पंच पल्लव आहे ते अस्सल राव मराठा कुळी आहेत , हे राव माने कूळ प्रभू रामचंद्र ह्याचे बंधू लक्षुमन ह्यांचे वंशज आहेत , कोकणातील माजी मंत्री श्री रवींद्र माने ह्याच कुळातील आहेत , आणि फक्त ह्याच राव माने कुळाशी श्रृंगारपूर राव सुर्वे कुळाचे सगे सबंध आहेत
माने यांची लोक संख्या ज्या गावात जास्ती आहे तेथील मुख्य घराणे यांचे कडे 
१)म्हसवड माने२)रहिमतपूर माने ३)विसापुर व सावर्डे (सांगली) माने पाटील
४)शिरोळ(कोल्हापुर)भिमबहाधर माने पाटील,
व रूकडी (हातकंलगले) माने
५)वेळापुर (अकलुज) माने देशमुख,
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावात देखील माने आडनावाची 80% लोकसंख्या आहे. पण कोणालाही नवामागचा इतिहास माहीत नाही..
१)कोणतेही माने घराणे मूळचे म्हसवड येथील असते.
२) माने घराण्याची बखर होती व ती ग. ह. खरे यांनी नक्कललेली होती याचा उल्लेख बाळासाहेब माने यांच्या पुस्तकात आला आहे. परंतु राजवाड्यातील मान्यांनी ती ना प्रसिद्ध केली ना कुणा इतिहास अभ्यासकास दिली.
३) कोणत्याही इतिहास संशोधकांना म्हसवडच्या माने घराण्यातील निंबाळकरांनी आपल्या घराण्यातील एकही चिटोरा दाखवला नाही. म्हणून मान्यांचा इतिहास उपलब्ध नाही.
४) सध्याचे वंशज समजले जाणारे राजवाड्यातील माने हे तांदळवाडीचे निंबाळकर आहेत. त्यांना आपले ब्रिटिश कालावधीत केलेले दत्तक पत्र उघडकीस येईल म्हणून ते कुणालाही कागदपत्रे दाखवत नाहीत.
५) मान्यांचा इतिहास उपलब्ध आहे परंतु तो आंधळी मलवडी व खानापूर शाखेच्या घराण्याकडील उपलब्ध कागदपत्रावरून मराठा कुळाचा इतिहास ह्या पुस्तकात आहे.
६) श्रीयुत गोपाळ दाजीबा दळवी ह्या पुस्तकात लिहीतात म्हसवडच्या माने घराण्यास आम्ही अनेक वेळा विनंती केली परंतु त्यांचेकडून कागदपत्रे मिळाली नाहीत.
आम्ही जो इतिहास प्रसिद्ध करत आहोत तो दुसऱ्या शाखेनी पाठवलेल्या कागदपत्रांवरून. त्यांच्या मूळ शाखेचा मान ठेवून आम्ही हा इतिहास प्रसिद्ध करत आहोत.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे पण माने देशमुख घराणा आहे ते सर्व रहिमतपूरचे घराणा आहे
हिंमत बहाद्दर ही पदवी चव्हाण यांना
आहे.
शिरोळचे माने पाटील यांना
भिमबहाद्दर हा किताब आहे
कराड पासून दक्षिणेला माने गाव आहे, कुंभारगाव, मालदन येथेही माने आहेत
कोल्हापुरात कोडोली पन्हाळा तालुक्यात आहे तेथेही माने आहेत
सांगलीत शिराळा तालुक्यात कोकरुड गावातही माने आहेत


3 comments:

  1. Bhimbahaddur Mane he fakt
    Kasaba sangao, Mangur ani udgaon ya tinach gavamadhye ahet..

    Baki kothe Bhimnahaddar Mane cha vansh nahi,
    Tase purave documents nahit.

    ReplyDelete
  2. आमचं देवक गरुड पक्षी/पंख आहे . देवका वरून तरी आमचं मूळ आडनाव माने असावे अस वाटत पण आमचं कुलदेवी राशीन ची यमाई आहे आणि कुलदैवत जेजुरी खंडोबा आहे .
    आमचं आडनाव सरोदे आहे .
    गाव-सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे ।
    माहिती मिळाल्यास कळवावे
    9422903007
    sarodeamar@gmail.com

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...