विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 May 2021

#सातारा_भुईंज येथील #लखोजी जाधवराव यांचे जेष्ठ पुत्र दत्ताजी जाधवराव यांची एक शाखा

 Ulhas Jadhavrao| ऐतिहासिक वाडे व गढी |







#सातारा_भुईंज
येथील #लखोजी जाधवराव यांचे जेष्ठ पुत्र दत्ताजी जाधवराव यांची एक शाखा आहे खंडोजी जाधवराव यांचे भुईंज मध्ये पाच वाडे चावडी यांची ऐतिहासिक #गढी_वाडे_व_समाधी.आहेत
◆ राजे लखुजी दुसरे/लखमोजी =यांची वंशजशाखा भुईंज सातारा येथे असुन ही शाखा शेवटपर्यंत मराठा स्वराज्यात राहिली.छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्यकाळात या शाखेने उल्लेखीनीय कामगिरी केली. लखमोजी उर्फ लखुजी दुसरे यांचे पुत्र खंडोजी जाधवराव हे छत्रपती शिवाजी तिसरे (छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई राणीसाहब यांचे पुत्र) यांच्या कार्यकाळात म्हणजे इ सन १७०२-०५ या काळात सिंहगडचे किल्लेदार होते तसेच पानीपत मध्ये ही या शाखेचे मोठे योगदान आहे
चंदन वंदन ची लढाई असो या शाखेचा उल्लेख आढळतो ही शाखा सतराव्या शतकामध्ये येथे आलेली असून या शाखेकडे छत्रपती शाहू महाराज यांच्या एक निष्ठ व मर्जीतील आणि छत्रपती च्या अजोळ ची असल्याने एक वेगळी मर्जी व विश्वास होता त्या मुळे त्या विश्वाला या शाखेने कधीही तडा जाऊन दिला नाही या शाखेच्या इतिहास खूप मोठा आहे भुईंज मध्ये या शाखेचे पाच वाडे असून त्या काळी चावडी ही भरायची तसेच हत्ती खाना सनिक तळ सती शिळा रायाजी जाधवराव यांची विशाल समाधी तसेच जाधवराव यांचे पाच वाडे आज ही येथे आहेत 1956 साली या घराण्याची हजारो एकर जमीन कुळामध्ये गेली नंतर या घराण्याने पाटील की ही सोडून दिली आज येथील वंशज जाॅब,व्यवसाय तसेच शेतीही करतात काही तालुक्याच्या ठिकाणी तर काही गावीच राहतात.
अशाप्रकारे जाधवराव घराण्याची राजे दत्ताजीराव जाधवराव यांची थोरली शाखा देखिल मराठा स्वराज्याच्या कार्यास वाहुन घेतलेली शाखा होय
यांच्या वंशजशाखा = १) जवळखेड,२) उमरद देशमूख (रुसुमचे) ता सिंदखेडराजा, ३) करवंड ता चिखली जी बुलढाणा, ४) करणखेड ता चिखली जि-बुलढाणा, ५) वडाळी ता कन्नड , जि औरंगाबाद, ६) सारवडी जि जालना व ७) भुईंज (सातारा
सौरिक नाते संबंध
राजेभोसले ,बाजी मोहिते ,राजेशिर्के, राजेगुजर ,राजेमहाडिक, राजेसुर्वे राजेनिंबाळकर,नाईक शिंदे देशमुख पिसाळ देशमुख मानेराव,देशमुख हे या शाखेचे नातेवाईक आहे .
ज्यांना दफ्तर बघायचे असेल व इतिहास समजुन घ्यायचा आहे अशा इतिहास प्रेमींना विनंती आहे लाॅकडाऊन संपल्यावर निश्चित यावे💐🙏🚩

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...