विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 16 May 2021

निमसाखर मधील सरदार रणवरे यांचा थोरला वाडा




 निमसाखर मधील सरदार रणवरे यांचा थोरला वाडा

निमसाखर तालुका इंदापुर हे गाव नीरा नदीकाठी वसलेलं गाव आहे ऐतिहासिक असलेले गाव या गावात दोन राजवाडे आहेत. तसेच रणवरे घराण्यातील सरदारांची एक समाधी आहे यातील पहिला वाडा म्हणजे राजवाडा किंवा थोरला वाडा असे या वाड्याला नाव आहे. तो एक भुईकोट किल्ला आहे. गावामध्ये मधोमध असलेला हा भव्य वाडा सध्या पडीक अवस्थेत शेवटची घटका मोजतो आहे. कारण याकडे कोणाचे लक्ष नाही गावात या वाड्याचे वंशज राहतात या वाड्याचे मूळ मालक इंदोर या ठिकाणी राहतात त्यामुळे हा वाडा पडीक अवस्थेत आहे
सध्या या वाड्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. वाड्यात प्रवेश करण्यासाठी असणारे प्रवेशद्वार आणि त्याचे असणारे बुरुज आणि वाड्याची काही तटबंदी शिल्लक आहे.
या वाड्याचे बांधकाम अपूर्ण आहे
कारण पूर्वीचे या वाड्याचे मालक हे वाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणायला गेले ते परत आलेच नाहीत. कारण ही रसद घेऊन येत असताना त्याचा मध्येच घात झाला असावा असे त्यांचे वंशज सांगतात आपण कधी या ठिकाणी आलात तर नक्की वाड्याला भेट द्या.
साभार अमित भगत

No comments:

Post a Comment

संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले

  संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले --------...