विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 June 2021

*महाराष्ट्रातील कदम घराणे*


 *महाराष्ट्रातील कदम घराणे*

पोस्तसांभार :: कदम जहागीरदार प्रतिष्ठान
महाराष्ट्र तील *कदम आडनावाची अनेक घराणी आहेत. त्याचे मूळ स्थान गोवे(गोवा)व हनगळ तेथील कदंबाशी जोडता येते.सातवाहनाच्या राज्यानंतर कदंबाचे राज्य दक्षिणेत होते. परतू बदामीच्या चालुक्यानी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. वनवासीत कदंब सर प्राचीन होते.त्यांची सत्ता काही काळ दक्षिण कोकणात ही असलेचे दिसून येतो. *कदमबांडे हे सरदार विजापुर च्या आदिलशाहीत सरदार होते. तेथून ते ताराबाईसाहेब च्या कारकिर्दीत महाराष्ट्रात आले ते प्राचीन महाराष्ट्र तील कदंब कुलातील होत.तर *गिरवीकर कदम मालाजीराजे भोसलें च्या कालखंडात वेरूळच्या भोसले गढीत *फलटणकर निंबाळकर यांच्या सोबत नेहमी येत .
माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांनी *गिरवी चे नाव पुन्हा महाराष्ट्रात दुम दुमवले. कदमांच्या पूर्वजांच्या घरात *बाल संभाजी राजेयेऊन गेल्याचे उल्लेख आढळतात. तेव्हा त्यांना लक्ष भोजन घातले होते.
विरोध पक्ष नेते *मा रामदास कदमयांच घराणे ही मूळचे गिरवी चे
*गिरवीतील कदम सरदाराची घुमटाकार समाधी*
*गिरवी च्या या शूर सरदाराचा इतिहास काळा आड लपलेला आहे.
इतिहास काळात कदमांनी खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे.पण याचे संशोधन होणे बाकी आहे.
गिरवी त आजही या शूर सरदाराची समाधी अत्यंत सुंदर अशा घुमटा मध्ये सुस्थितीत आहे. *गावातील संभाजी ब्रिगेड च्या युवकांनी लपलेला अथवा खोड लेला या सरदाराचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जर कोणा इतिहास संशोधक ,वाचक यांच्याकडे या समाधी बद्दल काही माहिती पुरावे असतील तर आम्हाला संपर्क करावा ही विनंती
*कुलदैवत तुळजा भवानी*
तुळजाभवानी ही कदम कुटुंबाची कुलदेवता आहे.तुळजा भवानी मातेवर कदम कुटुंबाची विशेष श्रद्धा. वर्षांतून एकदा गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ही तुळजापूर ला जाऊन देवीची पूजा प्रत्येक वर्षी करीत असते. गिरवी जवळील डोंगरावर भवानी मातेचे मंदीर आहे. कदम कुटुंबा च्या श्रद्धेखातर प्रसन्न होऊन तुळजापूर ची भवानी माता गावाजवळील डोंगरावर विराजमान झाली आहे .अशी आख्यायिका सांगितली जाते. श्रावण महिन्यात इथे देवीचा मोठा उत्सव असतो.
तसेच गेली 15 वर्षे गिरवी ते तुळजापूर अशी पायी वारी सुंदर अश्या रथासोबत देवीची पालखी ठेवून केली जात आहे
आता
* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोज भाऊ शिंदे*
*लेख व *माहिती संकलन संतोष झिपरे ,संतोष कदम(गुरुजी)व अजिंक्य कदम.9423967515,8600210909

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...