विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

दौलतीचे कर्ज भाग -2

 

दौलतीचे कर्ज भाग -2



  नानासाहेब पेशव्यांनी  मराठेशाहीची आर्थिक परिस्थिती  सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला दिसतो. त्यासाठी सर्व प्रथम उत्पन्नाचे साधने व एकूण येणारा खर्च याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. मराठेशाहीच्या उत्पनांची प्रमुख  साधन  म्हणजे  उत्तर व दक्षिण भागातून  वारंवार  वसूल करण्यात येणाऱ्या चौथाई   सरदेशमुखी व खंडण्या हा भाग होता. त्याशिवाय  राज्यातील व्यापाराला व महसूलव्यवस्था  या होत्या. कारण कोणतीही मोहिम काढायची तर आधि पैसा लागत असे. तो पैसा आधि कर्जाऊ घेतले जात होते. त्यानंतर त्या कर्जाची  वसूली करणे एवढे सोपे नव्हते. तरी यात नानासाहेब  पेशव्यांनी चांगली  सुधारणा केली. उत्तरेत व दक्षिणेत वारंवार मोहिमा काढून चोथाई व सरदेशमुखी वसूल केल्या. तसेच महसूलव्यवस्थेत सुधारणा केल्या निरनिराळ्या  व्यापारउदीमाला उत्तेजन  दिले त्यांत भरभराट  केली. अनेक शहरे आणि  पेठा वसवून त्या़त महसूलव्यवस्था चोख केली.  तरी सुध्दा चौथाई व सरदेशमुखी वसूल करताना उत्तर -दक्षिणेचे अनेक  राजेरजवाडे वेळेवर पैसा देत नव्हते. त्यामुळे थकबाकी वाढत असे. तर दुसरीकडे युद्ध मोहिमेचा खर्च करावाच लागत होता. निजाम ,हैदर व पुढे टिपूशी अनेकदा युद्ध झाले. त्यांत वेळोवेळी  मराठ्यांनी विजय  मिळवला ही मात्र तहात ठरलेली रक्कम  पूर्णपणे  मिळत नव्हती. वेगवेगळ्या  ठिकाणी  तळ उभारणे व तेथील वसूली वेळेवर करणे यासाठी ग्वाल्हेरला शिंदे , इंदौरला होळकर व इतर सरदारही स्थायिक झाले होते. मात्र तरी पैशाची चोख वसूली हा प्रश्न अवघड जागेचे दुखणे होते. पुन्हा  स्थानिक  भारतीयांना दुखवणे म्हणजे  नादिरशहा , अब्दाली , ब्रिटिश  व इतर सत्ताधीशांना फूट पाडणे सोपे जात होते. त्यामुळे वसूली करताना जास्त सक्ती करता येत नव्हती. तसेच पेशव्यांनी  कर वसूल करताना सर्वसामान्यांवर अन्याय होणार याचा वेळोवेळी विचार केलेला दिसतो. दुसरीकडे  निजाम , टिपू व ब्रिटिश  यांची आर्थिक परिस्थिती  चांगली  होती. त्यांचे कारण ते सर्वसामान्य लोकांचा विचार न करता सक्तीने कर वसूली करत असे. तसेच त्यांचे राज्यविस्तार या मर्यादित  होता. तर दुसरीकडे  उत्तरेतील अटकपासून दक्षिणेत कर्नाटकपर्यत मोठा विस्तार मराठी राज्याचा होता. आणि  हा डोलारा सांभाळण्यासाठी पैसा मोठ्याप्रमाणात लागत असे.तरी या अवघड  आर्थिक  परिस्थितीतही नानासाहेब पेशव्यांनी दौलतीचे कर्ज मोठ्याप्रमाणात फेडले. 


--- प्रशांत कुलकर्णी  मनमाड


संदर्भ -

 पेशवे घराण्याचा इतिहास  - प्रमोद ओक

 मराठ्यांचा इतिहास खंड -2


No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...