विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 October 2021

छत्रपती थोरले शाहू कालखंड

 


छत्रपती थोरले शाहू कालखंड

मराठेशाही साम्राज्यतील हेर खात्यातील (जासूद) पवार नाईक घराणे⛳⛳
तळटीपा :-आमच्या अभ्यास नंतर पवार व नाईक पवार घराण्यातील
१)दर्याजी नाईक पवार
२)येसाजी पवार
३)मल्हारजी पवार
असे उल्लेख असलेल्या कागदपत्रे तून आढळून आले आहेत
या पवार घराण्यातील मल्हारजी पवार यास छत्रपती थोरले शाहू महाराजांनी नाईक हे किताब दिले आहे संदर्भ उपलब्ध आहेत
पत्र. क्र १७ पान. ८०२
दि. ३०-९-१७१२
रोजकीर्द
सु।। . सलास
दि. मजमू छ ९रमजान
कि सनद इनाम नीळकंठ बलाल यास राजश्री आबुराऊ याकडे जमावाचे बेगमी तुम्हाकडून रू ५०००देविले ते पाविले नाहीत हली या पैकी हुजरून त्याकडे देन्हे १६०० तो ऐवज हुजूर पाठवणे. या कामास बालोजी कापसा व गुणाजी सिंदा नि दर्याजी ना पवार यासी मसाला रू
१०बालाजी कापसा
१०गुणाजी सिंदा
-----
२०
--------------------------
पत्र क्र ४९
१३-११-१७३१
पा छ २३जमादिलोवल
श्रीभवानी प्रसन्न
विनाति उपरि. राजश्री येसवंतराव दाभाडे सेनापति यास व उमाबाई दाभाडी यास दर्शनास हुजूर येणे म्हणोन खास दस्तके देऊन जासूद जेथे दर्याजी नाईक पाठविले यास मसाला रुपये
२५ केदारजी पवार
२५ नरसोजी नलवडा
२५ बुबाजी पावला
२५ जोत्याजी कदम
--------
१००
येकूण सभर रुपये रास सेनापतिकडे आकारुन देविले पाहिजेत. उमाबाई याचे पत्र विल भरून देणे हे +विनंती
(दस्तक -हुकूम, हुकुमवजा पत्र,
रास -संख्या
वली भरून -स्वत मजकूर भरून
जासूद -हेर )
--------------------------------
पत्र. क्र. ३)
दि. ७-१०-१७३०
श्री
श्रीमंत माहाराज राजश्री पंत आपा स्वामीचे सेवेसी.
सेवक केसो सहदेव साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल तागायत छ रबिलाखर जाणून स्वामीचे कृपेकरून येथास्थित असे. विशेष :- राजश्री सरखेली कडील कापड व पैका व बराबर लोक ३०व येसाजी पवार जासूद रोजगुदस्ता कसबे पुणियास हजीर जाले. यैवजाची रवानगी राजश्री सरखेलीचा पत्रावरून विदित होईल. राजश्री पंतप्रधान स्वामीचा मुकाम जेजुरीस आले म्हणून लिहिले होते. दुर्गोजी भोईटे आले त्याणी सांगितले जे, राजश्री छत्रपती स्वामी व सौभाग्यवती मातुश्री विरूबाई व राजश्री पंतप्रधान स्वामी घाटाखाले उतरले नाही
.परभारें कूच करुन मजल दरमजल तुलजापुरास गेले व आंगारियाकडील तीस माणूस बराबर आहे. अडिसेरी मागतात. राजश्री सरखेलीने अडिसेरी पुणियापोवेतो दिलही. आता कुलाबियापावेतो अडिसें पाहिजे यैसे म्हणतात .तरी यैवजाची व अडिसेरीची आज्ञा करावया स्वामी समर्थ आहेत. वरकड वर्तमान जासूद जबानी सांगतां विदित होईल. सेवेस श्रुत होय हे विनंती.
-------------------------
वरील तिन्ही पत्राशी पवार घराणे तील जासूद अथवा हेर खात्यात काम करत असलेल्या वीर सरदारांची उल्लेख आहे म्हणून टाकले आहे पत्र. क्र. १) एखाद्या मसलत बद्दलची पत्र जर छत्रपती कडून स्वराज्यातील सरदार कमाविसदार, शिलेदार, वतनदार, मिराशीदार, कारभारी सरदार यांनी आले तर प्रत्यक्ष त्या जासूद अथवा हेरकडे पत्रात उल्लेख केला आहे तेवढंच रक्कम स्वामी छत्रपती कडे देणे बंधनकारक होते हो सर्वश्रुत आहे जो हेर खात्यात काम करत असलेल्या लोकांना रोजमुरा साठी वापरले जात असे म्हणजे ज्या पद्धतीने आजकाल एखाद्या विशिष्ट वास्तु अथवा पत्र आणुन दिल्याबद्दल आपण खर्च म्हणून काही रक्कम येणाऱ्या असामीकडे देत त्या पध्दतीने तत्कालीन कालखंडात जासूद अथवा हेर खात्यात आलेल्या लोकांकडून वरील रक्कम देण्याची पध्दत असावे असे वाटते त्यात दर्याजी नाईक पवार यांची उल्लेख आहे जो जासूद आहे त उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात अनेक कागदपत्रांवरून दिसुन येते तसेच दर्याजी नाईक पवार यांनी अनेकदा वेतने व सनदा देण्यात आले आहेत याबद्दल संदर्भ आमच्या कडे आहे त याबद्दल शंका नसावे
२)पत्र. क्र २मध्य राजश्री येसवंतराव दाभाडे व मातोश्री उमाबाई दाभाडे यास छत्रपती थोरले शाहू महाराजांनी पत्र घेऊन येणार्या दर्याजी नाईक यास मसाला रू व दर्शनासाठी येणे म्हणून सागितले आहे जो पत्र क्र. १मध्य दर्याजी ना पवार आहेत त्याची उल्लेख दर्याजी नाईक म्हणून या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे तसेच तत्कालीन कालखंडात उल्लेख केलेल्या संदर्भ तपासून दर्याजी नाईक पवार यांच्या उल्लेख असलेल्या संदर्भ तपासून खात्री करून घेतली आहे याबद्दल संदर्भ आमच्या कडे आहेत काही शंका असल्यास फोन करावेत
३)पत्र क्र. ३मध्य येसाजी पवार जासूद असे उल्लेख आले आहे जो इतर आणखीन पत्रात संदर्भ सह उपलब्ध आहे आमच्या कडे जो छत्रपती थोरले छत्रपती शाहू महाराजांनी कुलदैवत जुजेरी हुन पंतप्रधान बाजीराव पेशवे वीरूबाई सह तुळजापूर येथे आई भवानी च्या दर्शनासाठी गेल्या चा नोंदी सापडते व छत्रपती च्या पदरीत असलेल्या जासूद येसाजी पवार यांची उल्लेख आढळते
तसेच विरूबाईसाहेब यांची उल्लेख सौभाग्यवती मातुश्री विरूबाई असे उल्लेख आले आहे याबद्दल व छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबत तुळजापूर येथे आई भवानी मातेच्या दर्शनासाठी गेल्या यांबद्दल उल्लेख आहे हो विशेष
मराठ्यांच्या इतिहासातील जासूद व हेर खात्यातील सरदार व काम करणाऱ्या लोकांचा उला कमी आढळते तसेच या हेर खात्यात कोण कोण होते याबद्दल माहिती कमी सापडते व या हेर अथवा जासूद खात्यात कोणकोणत्या घराण्यातील मडंळी होते तो समाजासमोर आले पाहिजे म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून या पोस्टकडे बघावे व याबद्दलही काही माहिती व मार्गदर्शन असेल तर फोन करून करावेत हो विनंती आहे
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...