विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 9 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २०


 #मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग २०
माळव्याची वाटणी झाल्यापासून माळवा प्रांतातील सर्व व्यवस्था शिंदे,होळकर,पवार यांच्याकडे सोपवली गेली असल्याने ई.सन1 735 मध्ये ही सरदार मंडळी मुख्यतः माळव्याच्या व्यवस्थेत व माळव्या पुढील उत्तरेकडच्या मुलाखात विरुद्ध पक्षाशी झगडून सुभ्याच्या व चौथाईच्या सनदा मिळविण्याच्या कामात गुंतली होती. व त्यासाठी इसवीसन 1735 च्या पावसाळ्यानंतर या सरदारांनी एक मोठी जोराची उचल केली. बादशाही मूलखास व त्यांच्या ताब्यातील संस्थानिकांना त्रासवुन सोडण्याचे इराद्याने त्यांनी मेवाड, मारवड व अजमेरचा सुभा या प्रांतात स्वार्या करण्यास सुरुवात केली. इसवीसन 1735 च्या नोव्हेंबरात माळव्यात बाजीराव येऊन पोहोचल्यानंतर या स्वार्यांना अधिकच जोर आला. जयसिंगाने बादशहास पूर्वीच निक्षून सांगितले होते की माळव्याचा सूभ्यावर बाजीरावाची नेमणूक झाल्यावाचून मराठ्यांच्या स्वार्यांचा सालोसाल चा त्रास चुकणार नाही. यासंबंधीची वाटाघाट दिल्ली दरबारात कैक महिने चालू होती. यादगारखान काश्मिरी काही करारमदार करून पेशव्यास पेशव्यांच्या वकिलास घेऊन दिल्लीस गेला होता.( राजवाडे खंड अकरा ले. वीस ) शेवटी बादशहाणे जयसिंगाची सूचना मान्य करून सनंदा यादगारखाना बरोबर देऊन त्यास नजाबतअलीखान व कृपाराम यासह पाठवले तारीख 16 जुलै 1736 रोजी जयसिंग व बाजीराव यांची भेट धोलपुर येथे झाली. या प्रसंगी बाजीरावाबरोबर त्यांचे मुख्य सेनानी व सल्लागार राणोजी शिंदे ,मल्हारराव होळकर व यशवंतराव पवार हे होते. जयसिंग कडून सलोख्याचे बोलणे सुरू होऊन बाजीरावास माळव्याची नायब सुभेदारी दिल्याचे जाहीर करण्यात आले ; परंतु सनदा दिल्या नाहीत. होईल तितके बोला चालीवर काम भागवून सनदा देऊ नये अशी वजिराची यादगारखानास ताकीद होती. यामुळे सनदा दिल्या नाहीत .बाजीरावास ही बातमी अगोदरच कळलेली होती तेव्हा बाजीरावानेही आपल्या मागण्या वाढून अधिक चढाईचे बोलणे सुरू केले यामुळे याप्रसंगी तडजोड झाली नाही; तेव्हा पुढील मनसुबे करण्या करिता आपल्या सरदारांसह ऑगस्टच्या सुमारास बाजीराव दक्षिणेत निघून आले .(म.री.मध्य विभाग 1 पृ.357)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...