विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २६

 

भाग २६
पुढे इसवीसन1753 मध्ये कर्नाटकची स्वारी झाली. होळीहुन्नूर किल्ल्यावर मोर्चे लावुन किल्ला सर केला गेला व नंतर धारवड किल्ला हस्तगत केला. (तारीख 13 मे 1753 ) यास स्वारीतही यशवंतराव पवार होते. तारीख 8/5/ 1753 रोजी यशवंतरावांचा मुक्काम मलप्रभा नदीवर होता. (कवठेकर राजोपाध्ये दप्तर ले. 20)
इसवीसन 1754 मध्ये रघुनाथराव दादांबरोबर हिंदुस्तानच्या स्वारीवर यशवंतराव पवार गेले होते.( भाऊसाहेबांची बखर पृष्ठ 4) त्यांनी कुंभेरीच्या वेढ्यात चांगली मदत केली.
या स्वारीत यशवंतराव पवार यांचे धाकटे बंधू रायाजी पवार हे ही होते .रायाजी पवारांचा मुक्काम इसवीसन 1754 च्या जून महिन्यात हस्तिनापुर येथे होता.( श्री भागीरथीसोरम येथील तीश्रोंउपाध्याय वे.रामकृष्ण बिन बेनीराम भट यांना लिहून लिहून दिलेल लेख तारीख 28/6/1754 ) यावेळेस रघुनाथराव दादासाहेब ही दिल्लीत होते. (पे.श.पृ.130 ) स्वारीत विजयी होऊन सर्व मंडळींसह इसवीसन 1755 ऑगस्ट महिन्यात रघुनाथराव परत आले. (राजवाडे खंड 6 पृष्ठ 122 )
यशवंतराव पवार व रायाची पवारांची सरदारी आरंभी एकत्र होती. पण पुढे उभयंतात परस्परांनी आपले मध्यस्थ देऊन मौजे कलसाडा प्रगणे, धार येथे दौलतीची, घराची व फौजेमुळे झालेल्या खर्चाची वाटणी इसवीसन 1744 च्या ऑक्टोबरात करून घेतली. ( धार दरबार दप्तर अप्रकाशित) या नंतर रायाजी पवार यांना निराळा सरदारकीचा अधिकार इसवीसन 1750 मध्ये मिळाला असला पाहिजे ; कारण त्यांच्या शीक्त सवंत 1806 वर्ष प्रमोद दिले आहे . असा सालाचा उल्लेख इसवीसन 1745 मधील रायाजी पवार यांच्या लेखावरील शिक्क्यात नाही.साधनांच्या अभावी रायाजी पवारांच्या इसवीसन सतराशे पन्नास पूर्वीच्या व नंतरच्या कामगिरी विषयी अधिक लिहिता येत नाही. खरे शास्त्री यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहात इसवीसन 1761 नंतर रायाजी पवार मोहिमांवर असल्याचे तीन-चार दाखले आढळले आहेत.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...