विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २३

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २३
पुढे 1741 च्या डिसेंबर महिन्यात पेशवे बाळाजी बाजीराव सातार्यावरून आल्यावर हिंदुस्थानात स्वारीस जाण्यास निघाले.(पे.श.पृ. 87) बरोबर पवार, शिंदे, होळकर होते.( थोरले शाहू महाराज चरित्र पृष्ठ 82) यावेळी रघुजी भोसले ही हिंदुस्थानच्या स्वारी वर गेले होते. पेशवे ,पवार, शिंदे व होळकर या सरदारांसह खानदेश ,नेमाड मधून माळव्यात उतरल्यावर त्यांनी प्रथमता गढा मंडळाकडे कूच केले; व तेथील ठाणी मार्च-एप्रिल महिन्यात काबीज केली. पुढे थेट अलाहाबादे पर्यंत चालून जाण्याचा बेत होता, परंतु मध्यंतरी रघुजी भोसल्यांचे चिथावणीवरून दमाजी गायकवाड व बाबूजी नाईक यांनी माळव्यावर स्वारी केली ; तेव्हा अगोदर माळव्याकडील बंदोबस्त करणे भाग झाले. माळव्यातील बंदोबस्त पाहून विशेष लढायचा प्रसंग न आणता गायकवाडांनीही मागे पाय घेतला. बाजीरावाच्या मृत्युनंतर धारेवर पुन्हा बादशाही कब्जा झाल्यामुळे मराठ्यांनी स्वारी करून पुन्हा धार काबीज केले,हे वर आलेच आहे; शिवाय या वेळी गायकवाडांच्या स्वारी मुळे ही माळव्यात आणखी गडबड झाली ; तेव्हा बाळाजी बाजीराव यांनी 1742 च्या पावसाळ्यात माळव्यात छावणीत करून त्यावेळी यशवंतराव पवारांना पुन्हा आपल्या तर्फे धार येथे कायम केले ; व गुजरात मधुन गायकवाड पुन्हा माळव्यात येऊ नये असा बंदोबस्त केला.(मध्य.वि. 2 पृ.43)
पुढे इसवीसन 1742-43 मध्ये नानासाहेब पेशवे यांनी आपल्या सरदारांना मार्फत माळवा ,बुंदेलखंड व बंगाल पार्यंतच्या प्रदेशात जिकडेतिकडे धुमाकूळ उडवून दिली. यावेळी नानासाहेबां बरोबर जे सरदार होते त्यात राणोजी शिंदे,मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव हेच प्रमुख होते.( शा.मं.बखर पृष्ठ 78) या सरदारांचा एकंदर बादशाही मुलखात मराठ्यांचे चौथाई हक्क मिळविण्यासाठी पुन्हा जोराचा प्रयत्न असुन त्यांत प्रतिस्पर्धी रघुजी भोसले यांच्या प्रयत्नांना आळा घालण्याचाही हेतू होता. शेवटी उद्दिष्ट हेतू प्रमाणे भोसले यांचाही पराभव झाला त्यानंतर महंमदशहाने माळव्याच्या सुभेदाराची सनद पेशव्यांना देऊ केली .त्यावेळी सनदेंतील शर्तींबद्दल यशवंतराव पवार , राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर व पिलाजी जाधव या चौघे सरदारांनी एक जामीनकतबा म्हणजे जामीनदारीबद्दल कबुलायत तारीख 21 एप्रिल 1743 रोजी लिहून दिली आहे.( मालकम पेज 78, मध्य वि.पृ 55) यावरून वर दिलेल्या सर्व आधारांवरुन या एकंदर कारस्थानात यशवंतराव पवार यांचे आरंभापासून कसा सहभाग होता व त्यावेळी मराठा मंडळात, दिल्लीचा बादशहा व दुसऱ्या राजपूत राज्यात यशवंतरावांचे केवढे महत्त्व होते व योग्यता मानली जात होती हे चांगलेच लक्षात येते.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...