विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 August 2022

थोरले बाजीराव पेशव्यांची 1728 पालखेडची लढाई

 




थोरले बाजीराव पेशव्यांची 1728 पालखेडची लढाई
postsaambhar ::
एका लढाई साठी बाजीराव यांनी 2273 किलोमीटर काही दिवसात घोड्यावरून भ्रमंती केली ते फक्त स्वराज्याच्या शत्रूला नामोहरम करायला.
हे सर्व सौरभ वैशंपायन यांनी खालील प्रमाणे मांडले आहे.
पालखेड ची लढाई निझाम विरुद्ध होती.मराठ्यांच्या 27 वर्ष युद्धानंतर म्हणाजे 1680 ते 1707 नंतर औरंगझेब च मृत्यू झाला. आणि मुभकंचे विघटन चालू झाले. अवघं, बंगाल आणि भागानगर यांच्या सुभेदाराने वेगळी सत्ता चे स्वप्न पडू लागले. हैद्राबाद उर्फ भागानगर निझाम यात बलिष्ठ होता पण त्याच्या समोर कसलेला योद्धा होता तो म्हणजे पहिला बाजीराव
छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदू पद पादशाही चे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेला बाजीराव हेच पराभूत न झालेला महाराष्ट्रीय योद्धा आहेत.
20 वर्षात छोट्या मोठ्या ४१ लढाया केल्या आणि एक मध्ये पण पराभव नाही.निझाम ला ४ वेळा हरवणाऱ्या आणि पालखेड ची निझाम बरोबर युद्ध जे जगातील सर्वात ५0 श्रेष्ठ युद्ध मध्ये गणना केली जाते.ही गणना दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवून देणाऱ्या मोंतेगोमेरी यांनी केली.
Bernard Law Montgomery या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - "#The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility".
१७२८ मध्ये बाजीराव आणि निजामाचे सैन्य पल्खेडच्या लढाई मध्ये एकमेकांसमोर आले. निजाम पराभूत झाला आणि त्याला करार करून स्वत:ची कातडी वाचवावी लागली. या करारानुसार मराठ्यांनी दक्षिनेणेमधून कर वसूल करण्याचा हक्क मिळवला.
जगप्रसिद्ध पालखेडचा युद्धाचा मार्ग(लाल रंगाचा बाजीराव आणि हिरव्या रंगाचा निझामचा.
साल १७२८ निदान भारताच्या इतिहासात तरी एक चमत्कारिक वर्ष म्हणावे लागेल. वर्षाच्या सुरुवातीला निजाम तर वर्षाआखेर बहादूर बंधूंचा पराभव झाला. पालखेड ला निजाम तर आमझेरा येथे गिरिधर आणि दयाबहादूर नामोहरम झाले.
१७२४ मध्ये साखरखेड येथे लढाईत पहिल्या बाजीराव यांनी निजामाला मदत केलेली. आणी तयात निजामाचा विजय झाला. त्या मध्ये खुश होऊन निजामाने शाहू महाराजांना एक पत्र लिहिले तो सुलताजी निंबाळकर यांना ' तहव्वूर दस्तगह ' तर पिलाजी जाधवरावांना ' जलदत इंतिबाह ' .
बाजीरावांना ' शहामतपनाह ' म्हणतो. काही वर्षात परिस्थिती बदलली. कारण पहिला बाजीराव इतके साधीसुधी असामी नाही याची निझाम ल कल्पना आली मुघल अनेक शुभे स्वतंत्र झाले आणि निजामाला त्याचेच वेध लागले. निजामाने स्वतःला भावनगर येथे स्वतंत्र शासक घोषित केले. बाळाजी बाजीराव यांनी चौथाई मिलावली पण वसुली मध्ये अडचण होती त्यामुळे निजाम च उदय मराठ्यांना त्रासदायक ठरला. कोल्हापूर गादी मध्ये संभाजीमहाराज(दुसरे) आले. ताराबाई आणि शिवाजी महाराज दुसरे यांना पन्हाळा इथे कैद केले. संभाजी महाराज यांना शाहू महाराजांवर सुरुवातीपासूनच राग होता. त्यामुळे निजामा ल आयते कोलीत मिळाले. त्याने संभाजी महाराजांना हात मिलावळे आणि साताऱ्याची गादी आमिष दाखवले. या वेळेस बाजीराव हे उत्तरेकडे मोहीमेवर होते. इ.स. १७२७ च्या सुरुवातीला निजाम औरंगबादेस जात आहे असे दाखवून अचानक बीड ला गेला आणि इतर सरदार जुन्नर च्या दिशेने पाठवले.
बाजीरावांनी नाशिक ते साताऱ्यापर्यंतची जबाबदारी चिमाजी आप्पांवर सोपवली आणि स्वतः उत्तरेची बाजू सांभाळली. १७२७ च्या ऑगस्ट महिन्यात ऐवजखान हा नाशिकजवळ होता , सिन्नरजवळ तुकोजी पवारांनी त्याचा पराभव केला. पण तिकडे
सन १७२७ च्या आखेर निजाम पुण्यात शिरला. आणि त्याने पुण्यात जो धुमाकूळ घातला . निजाम संभाजी महाराज बरोबर पुणे भागात राहिला. पुढे तळेगाव शिक्रापूर जाऊन जिंकून घातले.
चिमाजी आप्पांनी शाहू महाराजांना सुखरूप पुरंदर किल्ल्यावर नेले , आणि स्वतः तेथेच थांबले. निजामाने रामनगरच्या शिसोदिया या रजपूत घराण्यातील मुलीचे संभाजी महाराजांसोबत लग्न लावून दिले. यानंतर निजाम ने सुपे घेतले.
या सुमारास बाजीराव पुण्याच्या दिशेने येत आहे , अशा बातम्या आल्या. त्यामुळे निजाम पेडगाव दौंड मार्गाने अहमदनगरला गेला. आपला वेग वाढावा आणि बाजीराव पुण्याकडे यायच्या आत आपण निसटावे या विचाराने त्याने आपला तोफखाना अहमदनगरला ठेवला , आणि ऐतिहासिक चूक केली. बाजीराव याना पाहिजे तेच होत होते. दि. २२ फेब्रुवारी १७२८ रोजी तो पुण्याहून औरंगाबादच्या मार्गाने निघाला. बाजीरावांना त्यांच्या हेरखात्यामुळे निजामाच्या सर्व बातम्या मिळत होत्या. गनिमी काव्याचा वापर करून बाजीरावांनी निजामाचा मुलुख उध्वस्त करण्यास सुरुवात केली .आताच्या मराठवाड्यातील जालना आणि सिंदखेड हे निजामाचे मुलुख बेचिराख केले गेले. ऐवजखान चालून आला तेव्हा बाजीरावांनी बुऱ्हाणपूर लुटण्याची आवई उठवली. हे ऐकून निजाम खुप चिडला. दि. ६ नोव्हेंबर १७२७ रोजी जालन्याजवळ ऐवजखान-बाजीराव यांची लढाई झाली. यानंतर बाजीराव थेट गुजरातच्या रोखाने गेले. यानंतर तापी उतरून बाजीराव जानेवारी १७२८ च्या आरंभी गुजरातेत भडोचला पोहोचले. यानंतर सुरतेवर जात आहे असे दाखवून सरबुलंदखानास सुद्धा फसवले .
बुऱ्हाणपूरवर बाजीराव चालून जाणार ही बातमी मुळे निजामाला आपला मुक्काम हलवला भाग पाडले. उत्तरेतून निजामाला मिळणारी मदत तोडून त्याला पुणे सोडण्यास आणि उत्तरेत येण्यास भाग पाडण्याचा बाजीरावांचा डाव सफल होत होता. निझाम बुऱ्हाणपूर च्या दिशेने निघाला. पण अजिंठाच्या डोंगररांगेतून अचानक खाली आलेल्या बाजीरावांच्या फौजांनी त्याला हैराण केले. औरंगाबादच्या पश्चिमेस सात कोसांवर असलेल्या पालखेड येथे निजामाचा तळ पडला , आणि दि. २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मराठी फौजांनी चारही बाजूंनी पालखेडला येऊन निजामाला वेढा घातला. नगरला निजामाचा तोफखाना होता , पण त्याची भिती आता मराठ्यांना नव्हती. निजामाचे सैन्य सकाळी उठले आणि सकाळीच एक मोठा धक्का त्यांना बसला , काय ? , तर त्यांच्या सैन्याला चारही बाजूंनी मराठ्यांनी वेढले होते. निजाम आता पुरता फसला होता. निजामाचे अन्न , पाणी मराठ्यांनी तोडले होते. एका समकालीन पत्रात एक वाक्य आहे ते असे की " तुरुकताजखान नसता तर श्रीमंतांनी निजामाची विश्रांत केली असती ". निजाम आता पुरता हैराण झाला होता. अखेर दि. ०६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे १७ कलमी तहावर निजामाने बिनशर्त कबूल अशी स्वाक्षरी केली. बाजीराव पेशवे बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मोठा विजय होता. या विजयाने शाहू महाराजांचे आसन कायमचे स्थिर झाले. सुमारे ५९ वर्षांचा मुरब्बी निजाम आणि २८ वर्षांचे तरुण बाजीराव , तरीही रावांनी निजामाला धुळ चारली. यात चिमाजी अप्पांची भूमिका फार महत्त्वाची होती. कारण निजामाच्या मागे अप्पांचे सैन्य होते.
या युद्धाने बाजीरावांची किर्ती सर्वदूर पसरली. शाहू महाराजांनी कोल्हापूरकर संभाजी महाराजांना समज देऊन पुन्हा एकदा ' वारणेच्या तहाची ' आठवण करुन दिली.
संदर्भ : -
१) सौरभ वैशंपायन लेख
२)The Era Of Bajirao - Uday Kulkarni
३)पेशवाई - Kaustubh Kasture
४) इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग - ०१
नकाशा -
चिमाजीआप्पांच्या आमझेरा मोहिमेचा नकाशा.
नकाशा संदर्भ - पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे
नकाशा साभार - पेशवाई - कौस्तुभ कस्तुरे
( राफ्टर पब्लिकेशन )

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...