विनोद जाधव एक संग्राहक

Friday 27 January 2023

मिर्झाराजे जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे फळ

 

मिर्झाराजे जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे फळ

लेखन ::श्री नागेश सावंत

  • मिर्झाराजे जयसिंग याचा मृत्यू ( २८ ऑगस्ट १६६७ )
इराणचा शहा मरण पावल्यामुळे औरंगजेबाला यापुढे ( इराणच्या मोहिमेकरता ) राजा जयसिंगाच्या साह्याची आवश्यकता वाटत न्हवती त्याला असा संशय आला होता कि , शिवाजीच्या पळून जाण्यात राजा जयसिंगाचा हात असावा . त्याने जयसिंगाला दरबारात परत येण्याचा हुकुम केला. जयसिंग हा आग्र्याच्या वाटेवर असताना औरंगजेबाने त्याच्यावर विषप्रयोग करविला. त्यामुळे जयसिंग हा बऱ्हाणपूर येथे मरण पावला. जयसिंगाच्या एकनिष्ठ सेवेचे हे फळ त्याला मिळाले.
जयसिंगाच्या मृत्यूची बातमी मोगल दरबारात पोहचली. औरंगजेबाने उघडपणे जाहीर केले कि त्या मोठ्या सरदाराच्या मृत्यूने आपल्याला आनंद झाला आहे. बातमी घेऊन येणाऱ्याला तो म्हणाला “ त्या जयसिंगाचा मृत्यू ही माझ्या अतिशय आनंदाची बाब होय “
( संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची )
  • मिर्झाराजे जयसिंग याच्या नातवाचा मृत्यू ( १० एप्रिल १६८२ )
रामसिंहाचा पुत्र कृष्णसिंह म.जयसिंग मिर्झाराजेचा नातू , औरंगजेबाच्या फौजेत नोकरीवर होता. तो आपल्या पुत्रास अकबरासह आपल्या विरुद्ध होवून सहाय्य करतो अशा संशयाने त्यास म. कृष्णसिंहास परिंड्या जवळ औरंगजेबाने ठार केले.
( संदर्भ :- संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र. ६८ )
  • मिर्झाराजे जयसिंग याच्या मुलाचा मृत्यू ( एप्रिल १६८८)
मिर्झाराजे जयसिंग याच्या मृत्युनंतर आसामच्या मोहिमेवर रामसिंगाची नेमणूक ६ जानेवारी १६६८ ला झाली. संण १६७५-७६ च्या सुमारास रामसिंग बंगालमधून परत आला आणि बादशहाच्या चाकरीत असताना काबुलमध्ये १६८७-८८ मध्ये मरण पावला.
( संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची )
रामसिंग याने स्वतःच्या वडिलांचा व मुलाचा मृत्यू स्वतःच्या उघड्या डोळ्याने बघितला तरीदेखील शेवटपर्यंत मोगलांची औरंगजेबाची चाकरी करत राहिला. एक दुर्दैवी शेवट
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- असे होते मोगल :- निकोलाव मनुची
संभाजीकालीन पत्रसारसंग्रह पत्र क्र. ६८

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...