सरदार शिदोजीराव थोरात यांनी स्वामी सेवेबद्दल छत्रपती थोरले शाहू महाराजांनी दिलेले देश चौगुलाकी वतन तील १८गाव


श्री १७४०-४१
वैशाख शुद्ध तृतीया गुरवासरे
शिदोजी बिन शिवाजी बिन ह्यसाजी थोरात देश चौगुला तर्फ वाळवे प्रांत वाळवे प्रांत पन्हाळा यांस दिल्हे वतनपत्र ऐसे जे, तुझी किल्ले सातारियाचे मुक्कामी हुजूर स्वामी सन्निध येऊन विनंती केली की, आपणास काही वतन करुन देऊन वंशपरंपरेने चालविलें पाहिजे म्हणून. त्यावरून मनास आणितां तुझी कदीम स्वामी च्या राज्यांतील एकनिष्ठपणे सेवा करीत आहां. तुमचें चालवणे अगत्य जाणोन. स्वामी तुझावरी कृपाळू होऊन तालुके मजकुरचे देश चौगुलकीचे वतन नूतन अजरामहामत करून दिले. देहे बितपशील.
१कसबा वाळवे
१मौज उरूण देखील इसलामपूर
१मौजे गोटखिंडी
१मौजे येलूर
१मौजे शिरगाव
१मौजे पुणदी
१मौजेदेवरंडे
१मौजे पळूस
१मौजेथापडे
१मौजे कामेरी
१मौजे बाहे
१ मौजे कुंडल
१मौजे येडें
१मौजे खेड
१मौजे नागांव
१मौजे
१मौजे नागठाणे
१मौजे मौजे भादुरवाडी
ऐकूण १८
येणेंप्रमाणें देहे अठरा तर्फ मजकूर देश चौगुलकीचे वतन तुम्हास व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने दिल्हे असे.
या वतनास हक्क लाजिमा रयते निसबतीने करून दिल्हा जसे बितपशील:__
१गांवगनास नक्त आकार होईल त्यास दर सनदे निसबत रूपया १|
१गांवगन्ना दर चाहुरी जमीन बिघा १|प्रमाणे घ्यावी कलम.
१दसरियाचें बकरें १दर गंवास घ्यावें कलम
१दरगांवास चांभारापासोन १जोडा घ्यावा कलम
१राबता महार १.
१फांटयांच्या मोळया सणास गांनगन्ना घ्याव्या कलम एकूणच६
१बाजारात गल्ला फरोक्त न होईल त्यास फसकी घ्यावी कलम.
१पितरांस लोणी व शाकभाजी गांवगन्ना घ्यावी कलम.
१तेलियाचे घाणियास दररोज तेल नवटांक घ्यावे कलम
१तांबोळियाचे दर दुकानास दररोज पानें सुमारें २५प्रमाणे घ्यावी कलम
१बाजाराचे दिवशी माळवें शेव घ्यावी कलम
१वाणियाचे दुकानास सुपारी तंबाखू घ्यावी कलम. एकूण ६
२८४
एकूण कलमे बारा हक्क करार करून देऊन तुम्हांस हें आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुझी तर्फ मजकूरचे देश चौगुलकीच्या वतनाची सेवा दंडकप्रमाणे याचे होतें घेत जाणें. हक्क लाजिमा सदरहूप्रमाणे व पान मान तश्रीफ यास व याचें पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तालीक लिहुन घेऊन हे अस्सल पत्र भोग्वटियाबद्दल याजवळी परतोन देणे
याविषयी पत्रे ५
मा श्री रणजित दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य)
मा श्री संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य)
No comments:
Post a Comment