विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर राज्य)..

 

५ एप्रिल १८६३..

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर राज्य)..
 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

अहिल्यानगर मध्ये दिल्ली गेटच्या पुढे आल्यावर अहिल्यानगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यु आर्टस् कॉमर्स ऑड सायन्स कॉलेज समोर रस्त्याच्या पुर्व बाजुस हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांचे स्मारक आहे. स्मारक सुंदर आहे त्या मध्ये पुर्णाकृती छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची मुर्ती समाधी स्थळ आणि वाचनालय आहे..
छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला. महाराज उंच्चपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते. २३ ऑक्टोंबर १८७१ रोजी विजयादशमीच्या (दसरा) शुभ मुहूर्ताला त्यांचा दत्तक विधी संपन्न झाला. राज्यभिषेक करुन चौथे शिवाजी महाराज कोल्हापुर राज्यांचे छत्रपती झाले. महाराजांना घोडेस्वारी, शस्त्र-शास्त्र व राज्य कारभारत विशेष रुची होती त्यांचे मराठी, हिंदी, ईंग्रजी, मोडी(लिपी) भाषेवर प्रभुत्व होते ब्रिटीशाकडुन होणारे जुलुम छत्रपतींनी पाहीले होते त्याबाबत महाराजांकडे माहीती येत होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत व त्यांच्या पुण्याईने हे राज्य मिळाले आहे. रयतेच्या कल्याणाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे या भुमिकेतुन सतत कार्यरत राहीले..
इ.स.१८७६ साली भारतात फार मोठा दुष्काळ पडला होता. छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी कोल्हापुर संस्थानात दुष्काळ निवारन यंत्रणा राबवली दुष्काळावर मात केली. छत्रपतींची ही कामगीरी पाहुण जानेवारी १८७७ मध्ये ब्रिटिश साम्राज्याची महाराणी व्हिक्टोरीया हिने छत्रपतीना 'नाईट कमांडर ऑफ दि स्टार ऑफ इंडीया' हा किताब दिला पण पुढे काही दिवसांनी छत्रपतींनी हा सन्मान नाकारला. पुढे इ.स.१८७८ साली श्रीमंत वाघोजीराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह संपन्न झाला. छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापुर संस्थानात खुप मोलाचे कार्य केले रंकाळा तलाव निर्मीती कार्यास सुरवात पुल उभारणी, रस्ते, नवीन राजवाडा, शासकीय इमारती, कचेऱ्या, टाऊन हॉल आदी वास्तुची उभारणी याच काळात झाली तेच आता कोल्हापुर शहराचे वैभव आहे..
१९१४ रोजी, श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डींग हाऊस अहिल्यानगर या नावानी वस्तीगृह सुरु झाले. त्यातुनच पुढे जानेवारी १९१८ रोजी अहिल्यानगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली..
: मिनीनाथ रावसाहेब गेरंगे पाटील.
――――――――――

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...