विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

छत्रपती शिवाजी महाराज - २२

 


छत्रपती शिवाजी महाराज - २२
----------------------------
अंतिम काळ - कर्नाटक मोहिमेच्या अंतिम काळामध्ये त्यांनी भरघोस यश मिळवले असले तरी त्यांना दिङमूढ करणारी लढाई बेळगावच्या अग्नीला संपर्क किल्ल्याला वेढा देऊन झाली. सावित्रीबाई या विधवा स्त्री किल्लेदाराने तो किल्ला 27 दिवस लढवला व नंतरच हार पत्करली!
नबाब बहलोल खानाचा 23 डिसेंबर 1677 रोजी मृत्यूनंतर जमशेद खानाने विजापूरचा किल्ला आणि सिकंदर आदिलशहाला राजांच्या ताब्यात देण्याचे मान्य केले व त्यापोटी सहा लाख पागोडांची मागणी केली.
सिद्धी मसुदा त्याच्या हेरांकडून हे समजतात त्याने आजारी पडून मृत्युमुखी पडल्याची आवई उठवली. त्यांने आपल्या फौजेचे दोन भाग केले आणि एक भाग अडोनीला ठेवून चार हजाराची फौज जमशेद खानाकडे पाठवून त्यांना सांगितले की आमच्या राजाचा मृत्यू झालेला असल्यामुळे आम्हाला चाकरीसाठी ठेवून घ्या. त्याने ही फौज आपल्या चाकरीसाठी किल्ल्यात ठेवून घेतली आणि दोनच दिवसांत २१ फेब्रुवारी सोळाशे 78 रोजी जमशेदला ताब्यात घेऊन किल्ल्याचे प्रवेशद्वार उघडले आणि जिवंत सिद्दीचे स्वागत केले! अशाप्रकारे विजापूर सिद्धी मसूद च्या ताब्यात गेले. शिवाजी राजे बेलवाडी हून तुर्गळ मार्गे विजापूरच्या मार्गावर कुच करीत असताना ही बातमी समजली आणि ते पन्हाळ्यावर परत आले.
शिवाजी राजे कर्नाटक मोहिमेवर असताना संभाजी राजे यांना गोव्यातील पोर्तुगीज मुलुख काबीज करण्यासाठी पाठवले. फोंडा किल्ला शिवाजी राजांच्या ताब्यात होताच; आता संभाजीराजे यांनी त्याच्या अखत्यारीतील 60 गावांची पोर्तुगीजांकडे मागणी केली. पोर्तुगीजांनी ती नाकारली म्हणून पोर्तुगीजांवर हल्ला चढवला. त्यात संभाजी राजे यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मराठे नोव्हेंबर 1677 मध्ये दमण कडे गेले.
गोवळकोंडाच्या लष्कराने दिलेरखान आणि बहलोल खान यांचा सोळाशे 77 मध्ये पराभव केला. त्याचा फायदा घेऊन अनाजी दत्तो यांनी कानडी मुलखात छापे टाकले व हुबळीची लूट केली. सन सोळाशे अष्टयाहत्तर च्या जानेवारीत मोरोपंतांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक व मुघल मुलखात इतरत्रही लूट केली.
शिवाजी राजांनी मध्य आणि पूर्व म्हैसूर मध्ये मिळवलेले मुलुख स्वराज्याला जोडून घेण्यासाठी विजापूरच्या दक्षिण भागावरील कोपळ आणि पन्हाळा यांच्या दरम्यान चा धारवाड आणि बेळगाव भाग जिंकून घेणे आवश्यक होते. 3 मार्च 1679 रोजी कोपळ किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. आता हारपनहळ्ळी, रायदुर्ग, चितळदुर्ग, विद्यानगर आणि बुंदी कोटा हा संपूर्ण प्रदेश शिवाजी राजांच्या अंमलाखाली आला.
शिवाजी राजांच्या फौज्यांनी 1678 च्या एप्रिल मध्ये पैठण लुटले. तसेच शिवनेरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. किल्लेदार राहुल अजीज खान याने मराठा फौजेला पराभूत केले आणि निरोप दिला की "मी किल्लेदार आहे तोपर्यंत तुम्हाला हा किल्ला कधीच जिंकता येणार नाही!" तर पकडलेल्या सैनिकांना त्याने भेटवस्तू देऊन सोडले!
पैसा दारूगोळा तोफखाना व फौज सर्व देऊनही शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला अथवा लुटीतील काही हिस्सा न दिल्यामुळे चिडलेल्या कुटुंब शहाणे विजापूरकरांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी पंचवीस हजार घोडदळ आणि असंख्य पायदळ तयार केले. परंतु मुघल व मराठ्यांच्या कचाट्यात आणि अंतर्गत यादवीत वैतागलेल्या सिद्धी मसुदने शिवाजी राजांशी तह करण्याची तयारी दाखवून खलीता पाठवला की "आपण दोघांनी मिळून मुघलांना दख्खन मधून हाकलून लावलं पाहिजे."
या वाटाघाटींमुळे नोव्हेंबर 1677 च्या गुलबर्गा तहाचे उल्लंघन होत असल्याचे दिलेरखानाला समजताच तो संतप्त झाला आणि त्याने विजापूर वर आक्रमण करण्यासाठी कुच केले. त्यामुळे गोवळकोंडाच्या कुतुबशहाची योजना बारगळली.
शिवाजी राजांनाही आपल्या मागे आपल्या दोन युवराजांमध्ये तंटा होऊ नये म्हणून स्वराज्याची वाटणी करण्याचा विचार आला आणि त्यांनी दोन वारसांना स्वतंत्र करण्याचे ठरवले. संभाजी राजे अत्यंत तापट व मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे त्यांना प्रशासनाचे धडे घेण्यासाठी राव केशव भट्ट उपाध्याय यांच्याकडे संगमेश्वर येथे त्या मुलखाचा सुभेदार करून व पेशव्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास सोबत दिवाण म्हणून पाठवले.
कर्नाटक मोहिमेवरून परतल्यानंतर शिवाजी महाराजांनी एप्रिल 1678 मध्ये वारस आणि विभाजन हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला. पिळदारिषरीयष्टीचे पराक्रमी बुद्धिमान संभाजी राजे कर्नाटकचा मुलुख सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती होती. म्हणून त्यांच्या मानाने फारच लहान वयाच्या राजारामांना महाराष्ट्रातील मुलुख द्यायची शिवरायांची इच्छा होती. अर्थातच संभाजी राजे यांना हे आवडले नव्हते त्यामुळे ते नाराज होते. याचा फायदा दिलेरखानाने घेऊन संभाजी राजे यांना मुघल फौजेच्या साह्याने त्यांचे देशावरची व कोकणातील वंशपरंपरागत मुलुख जिंकून देण्याचे वचन दिले.
संभाजी राजांना पाली इथे पाठवले होते. 13 डिसेंबर 1678 रोजी येसूबाईंना पुरुषी वेशात घोड्यावर बसवून संभाजी राजे निसटले आणि दिलेरखानाला जाऊन मिळाले. संभाजी राजे यांचा खलिता मिळताच दिलेरखानाने बहादुरगडावरून इखलास खान आणि धैरीयत खान यांना 4000 फौज घेऊन संभाजी राजे यांच्या स्वागतासाठी सुपे येथे पाठवले. स्वतः दिलेरखान करकंब जवळ येऊन भेटला. ही बातमी बादशहाला पाठवून बादशहाकडून संभाजी राजांना सात हजारी मनसबदार केले आणि राजा ही उपाधी दिली. आता त्याने विजापूर काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली.
दिलेरखानाची कोण कोण लागताच सिद्दी मसुदने शिवाजीराजांकडे मदत मागितली. विजापूरच्या संरक्षणासाठी शिवाजी राजांनी सहा-सात हजारांचे घोडदळ पाठवले. परंतु या सैन्याला विजापूर हस्तगत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे धूर्त सिद्दी मसुदने मराठ्यांच्या फौजेला किल्ल्याच्या आत घेतले नाही. तरीही ते छुपेपणाने किल्ल्याच्या आत जात होते. मसुद किल्ल्यात येऊ देत नाही हे पाहताच मराठा सैन्याने आदिलशाही मुलखात लुटालूट आणि खंडणी वसुली सुरू केले. अली रझाला कापून काढले आणि सिद्धी याकूतला जखमी केले. परंतु दुर्दैवाने किल्ल्यावरील तोफेतून सुटलेल्या गोळ्या मुळे सेनापती मारला गेला आणि मराठा सैन्य परत पळून आले. आता सिद्दीने दिलेरखनाशी तह केला आणि मुघल फौजेला विजापुरात आमंत्रित करून वेंकटाद्री मुरारी या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या विरोधात फौज देऊन पाठवले.
दिलेरखानाने भोपळगडाकडे कोच केले. शिवाजी राजांनी हा किल्ला रसद व मालाच्या साठवणुकीसाठी बांधला होता. दोन एप्रिल 1679 रोजी नऊ वाजता भूपाळगडावरील हल्ला सुरू झाला आणि दुपारपर्यंत मुघलांनी गड ताब्यात घेतला. दोन्ही बाजूच्या सैन्याची प्रचंड कापाकापी झाली. मुघलांना भरपूर अन्नधान्य व इतर साहित्य मिळाले. शेजार मूलखांमधून आश्रयाला आलेल्या लोकांना गुलाम म्हणून नेले आणि शिबंदीतील वाचलेल्या 700 जणांचे एक एक हात तोडून सोडून दिले.
शिवाजी राजांनी किल्लेदाराच्या मदतीसाठी 16000 च घोडदळ पाठवलं होतं परंतु ते खूप उशिरा आले. नंतर त्यांनी इराझ खान आणि बाळाजीराव परांडाच्या वेढ्यातील लष्करांकडून रसद आणि इतर माल घेऊन येत होते त्या फौजेवर हल्ला चढवला. परंतु मदतीसाठी पाठवलेल्या इखलास खान याने खेड्याच्या तटबंदीत आश्रय घेऊन मराठ्यांचा हल्ला परतवून लावला आणि 1000 मराठ्यांना कापून काढले.
करकंब जवळ इराज खान सापडला आणि मराठ्यांनी त्याच्याकडचे अन्नधान्य व सामान लुटले.
यादरम्यान औरंगजेबाने येथील जनतेवर लावला होता. त्यालाही शिवाजी महाराजांनी (दरबारी नील प्रभुने लिहिलेले) विनम्र पणे पत्र पाठविले . सम्राट अकबर वगैरे बादशहांचे दाखले देऊन त्यांनी केलेल्या वैश्विक ऐक्याच्या कार्याचे गुणगौरव करून प्रखर विरोध केला. त्या पत्रावरून शिवाजी राजाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.
ऑगस्ट 1679 मध्ये दिलेरखानाने विजापूर वर स्वारी केली. सिद्धी मसुदने शिवाजी महाराजांना मदतीसाठी खलिता पाठवला आणि शिवाजीराजांनी विजापूरचे संरक्षण करण्यासाठी दहा हजार चे घोडदळ व दोन हजार बैलांच्या पाठीवर लादलेली रसद पाठवली.
७ ऑक्टोबर रोजी दिलेरखानाने विजापूरला जवळपास वेढले होते. दहा हजार घोडदळ व पायदळ घेऊन शिवाजी राजे ३० ऑक्टोबर रोजी सेलगुरला पोहोचले. ४ नोव्हेंबर रोजी राजांनी आपल्या फौजेच्या दोन तुकड्या करून दहा हजार घोडदळासह आनंद रावांना मुघल मुघलांवर धाडी घालण्यासाठी सांगोल्याकडे पाठवले आणि आपण मुसळा अल्मला मार्गाने कुच केले.
मराठ्यांचे सैन्य मदतीला येत असल्याचे पाहून दिलेरखानाने मसुद बरोबर तह करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसला. त्यामुळे त्याने 14 नोव्हेंबरला वेढा उठवून विजापूरकरांचा मुलुख लुटून उद्ध्वस्त करत मिरज पन्हाळा जिंकून घेण्यासाठी निघाला.
संभाजी राजे निसटले-
तिकोटा होनवाड तेलसंग मुलुख उध्वस्त करून दिलेरखान अथणी गावात पोहोचला. निष्पाप लोकांवर महिलांचे अत्याचार पाहून संभाजी राजे व्यथित झाले होते आणि मुघलांचा सेनापती व त्यांचे मतभेद झाले. अथणी बाजारपेठ लुटून गाव जाळून टाकले आणि तेथील हिंदु रहिवाशांची विक्री करण्याचे दिलेरखान्याने ठरवले. संभाजी राजे यांनी त्याला हरकत घेतली परंतु दिलेरखानाने जुमानले नाही. 21 नोव्हेंबर रोजी अथणी सोडून दिलेरखान ऐनापुर येथे गेला. त्याला रस्त्यातच समजले की संभाजी राजे निसटून विजापूरला गेले होते. 20 नोव्हेंबर रोजी रात्री येसूबाईंनी पुरुषी वेश धारण करून संभाजी राजे सोबत दहा घोडेस्वार घेऊन महिलांच्या शिबिरातून निसटले आणि विजापुरी पोहोचले. आता दिलेरखान ही विजापूरला आला आणि त्याने शहराच्या सुभेदाराला लाच देऊन संभाजी राजेंना आपल्या ताब्यात द्यायला लावावे असा निरोप दिला. संभाजी राजांना याचा सुगावा लागताच शिवाजीराजांनी त्यांच्या सुटकेसाठी पाठवलेल्या घोडदळासोबत ते चार डिसेंबर रोजी पन्हाळ्यावर पोहोचले.
इकडे शिवाजी राजांनी मराठ्यांच्या सैन्याच्या दोन तुकड्या करून मुघलांचा प्रदेश जाळून लुटण्याचा सपाटा लावला होता. नोव्हेंबरच्या मध्यावर ते जालना येथे आले आणि मिटालट सुरू केली. परंतु जालना येथील व्यापारी पैसा अडका घेऊन जान मोहम्मद फकीर यांच्या मठात आश्रयाला गेले होते. (कारण शिवाजी महाराज अशा ठिकाणी जात नव्हते.) शिवाजी महाराजांच्या सैन्याला हे समजतच ते मठात शिरले व लुटालुट केली. त्या फकिराने त्यांना ड्युटी पासून परावर्तन केले परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे फकीराने शिवाजी राजांना शाप दिला असे सांगितले जाते.
चार दिवस जालना लुटून भरपूर सोने-चांदी जडजवाहीर व किमती सामान घेऊन मराठा सैन्य जालना येथून माघारी फिरले. मुघल अधिकारी रणमस्तखान याने या सैन्याच्या पिछाडीवर हल्ला केला. सिद्धोजी निंबाळकर यांनी त्याला थोपवले. तोपर्यंत औरंगाबाद येथून केसरी सिंग आणि सरदारखान या सेनापतींची मोठी फौज आली. त्या फौजेचा तळ शिवाजी महाराजांपासून सहा मैलावरच होता. केसरी सिंगाने राजांना निघून जाण्याची इशारत दिल्यामुळे बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राजे आणि त्यांची मराठा फौज तिथून निसटली. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजी राजे पट्टागडावर पोहोचले तेव्हा त्यांना बरीचशी लूट गमवावी लागली होती. शिवाय त्यांचे 4000 घोडेस्वार मारले गेले आणि हंबीरराव जखमी झाले होते. थकलेल्या फौजेने काही दिवस विश्रांती घेऊन डिसेंबर मध्ये राजे रायगडावर गेले.
कोकणात मराठ्यांची नव्या दमाची बारा हजार फौज होती. त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी राजापुरात जाळपोळ केली आणि तिथून ते बुऱ्हानपुराकडे निघाले व बेत बदलून मलकापूर कडे कुच केले. तर मराठ्यांच्या एका तुकडीने नोव्हेंबर अखेर धरणगाव चोपडा आणि इतर गावे लुटून तिथे जाळपोळ केली.
डिसेंबर अखेरीस शिवाजी राजे रायगडावरून संभाजी राजे यांना भेटण्यासाठी पन्हाळ्याला आले व संभाजी राजेंची चर्चा केली. महाराजांबरोबरच यावेळी इतरही अनेकांनी संभाजी राजांची चर्चा केल्या. छत्रपतींनी संभाजी राजेंना खजिना व इतर अनेक तपशील दाखवले आणि संभाजी राजेंना कसोटीवर उतरण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवरायांचा अंत-
संभाजी राजे यांची भेट घेऊन शिवाजी राजे रायगडावर परतले तरी त्यांची शरीर प्रकृती खालावत चाललेली होती. भरीस भर राणी वर्षात आणि मंत्रिमंडळात कारस्थाने आणि प्रतिकारस्थाने सुरू होती. 23 मार्च 1680 रोजी राजांना ताप आला आणि रक्ताचे जुलाब होऊ लागले. सर्व उपचार होऊनही राजांच्या प्रकृतीत आराम पडत नव्हता; उलट राजे खंगत चालले होते. आता राजेंनी सरदारांना आणि अधिकाऱ्यांना काही अधिकार दिले. चैत्र पौर्णिमे दिवशी दिनांक 4 एप्रिल 1680 रविवारी शिवाजी राजे यांची प्राणज्योत मालवली.
(राजांच्या निधनानंतर राज्यांवर विष प्रयोग झाल्याची कुजबूज सुरू झाली आणि संशय सोयराबाईंवर घेतला जात होता. तथापि याआधीही राज्यांवर सातारा येथे विष प्रयोग झाला होता. त्यामुळे या वेळीही विष प्रयोगात झाला असावा आणि तो सोयराबाईंनी नाही तर अष्टप्रधानांपैकी अनेकांनी राबवला असावा व खापर सोयराबाईंच्या माथ्यावर फोडले असावे असे माझे वैयक्तिक मत आहे.)
दिलीप गायकवाड.
२१-०४-२०२४.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...