विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

## जगताप घराणे ##

 


## जगताप घराणे ##
"हरजी दादाजी जगताप "हे जगताप घराण्याचे मूळ पुरुष असून ते उत्तरेतून भरतपूर मधून दक्षिणेकडे आले असावेत . राजपूत असलेल्या या घराण्याचे मूळ नाव तुवर असे होते . जगताप घराण्याचे वंश आणि" तुवर" या घराण्याचा वंश एक असून गोत्र अत्रि .
गादी भरतपूर ,निशाण ढवळे, देवक उंबर आहे . राजा "अंगनपाळ" याने इ. स. ७३६ मध्ये दिल्ली स्थापन केली 'विग्रहराज्या" याने अंगनंपाळ याचा पराभव केला व दिल्ली काबीज केली
.ग्वाल्हेर ,भरतपूर इतरत्र हा राजवंश पांगला असावा असे वाटते" मान सिंग" (१४८६-१५१७)हा नावाजलेला राजा ग्वाल्हेर जवळील प्रांतात होऊन गेला . हरजी राजे फलटणजवळील झणझणे येथे सन १३३० मध्ये पाटीलकी करत असल्याचा पुरावा कागदोपत्री मिळाला आहे .
. याच शतकात म्हणजे सन १३३० मध्ये हरजी जगताप कऱ्हे काठावरील सरडी या गावी आले .येथे महादजी येसाजी कुटे पाटीलकी करीत होता. हरजी बरोबर एक व्यक्तीही आला होता तो' चौरे "घराण्याचा मूळ मुरुष होता त्याची समाधी सासवड येथील वटेश्वर मंदिराच्या पाठीमागे आहे
. हरजीनी कुटे कडून पाटीलकी खरेदी केली .तशेच' दाणे पिंपळगाव" (टाकमाईचे देवस्थान) येथील पाटीलकी मिळवली.
अशा रीतीने वरखेड ,सरडी , सदत,संवत्सर, दाणे पिंपळगाव, सनवडी या सहा वाद्य एकत्र करून त्यांनी सासवड वसवले . हरजी जगताप सिद्धेश्वर जवळच राहत होते . ते मयत झाल्यावर त्यांचे थडगे सर्व्हे ४९९ येथे बोरीच्या पटात बांधण्यात आले.
. . हरजी याना दोन मुले होती . हेमंत व नेमत तेही कर्ते मनुष्य निघाले असे दिसून येते . काही कागद पत्रातून असे दिसून येते." राजे मजकूर (हरजी राजे )यांचे पुत्र हेमंत नेमत जमीसदार कर्ते माणूस निघाले. त्यांचा मनसुबा गावची वस्ती वाढवावी सत्यावरून रुद्राजी,राघोजी,व काळोजी घराणे सध्याचे (वडसकर)वतनदार सहा गावचे रुद्राजी कर्ता भाऊपणा करून घेतला .करणे वडाखेलकर गुरव घराणे निम्मे पाटीलकी वडाखेलची आपल्यापाशी गहाण ठेऊन सदोसजी शिवाजी पटल्यास १०५ दिले व पाटीलकी अनुभवत होते. सहा गावचे साधन करून घेतले शिवार साधनात आणला .
" हेमंत यास मुलबाळ ना झाल्याने त्याचा वंश वाढला नाही . नेमत यास नरस पाटील व कान्हू पाटील हे वारसदार पुत्र झाले यादोघांनी शके १३२२ म्हणजेच सन १४०० मध्ये जमिनीचे नामकरण करून सासवड केलेले पाटीलकी करू लागले .
नरस पाटील पुन्हा आपल्या जुन्या गावी "झणझणे सासवड" या फलटण जवळील गावात निघून गेला. कान्हू पाटील याचे पुत्र माऊजी व रामजी पाटील हे होत . सन १४९६मध्ये सासवड गाव मौजे होता तो कसबा झाला .
कान्हू पाटलाचे रामजी पाटील यास बिदर च्या बादशहाने १२ गावची देशमुखी शिक्का करून दिला. त्यात पुणे गावची ४ गावे ,शिरवळ गावची ४ गावे ,सुपे गावची ४ गावे होती. मौजी नाईक जगताप यास खळद बेलसर,दिवे.मोढवे,राखुर्डी बांबूर्डी कारखेक कोरळी ,कोडीत बुद्रुक या ९ गावाची देशमुख राहिले. माऊजी पाटलांच्या फिरंगोजी या मुलास शंकराजी व मालजी असे दोन पुत्र होते
मालजीस अनाजी , गोदाजी ,राहुजी असे तीन मुलगे होते यापैकी गोदाजी जगताप हे शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार होते त्यांच्याकडे १०००० फौजेची मनसबदारी होती .
गोदाजी जगताप यांचे सक्खे पुतणे राहुजी आणि खंडोजी हेही चुलत्या प्रमाणे १०००० फौजेची मनसबदारी असलेले सरदार होते पेशवाई मध्ये चमकलेले दिसतात .
माऊजी जगताप आणि रामजी नाईक जगताप यांच्या कालखंडात" एकनाथ "महाराजांचे परमशिष्य" नारायण गोसावी" हेसोपान महाराजांची सेवा करीत होते . त्यांना अलंकापुरीस मौजी बंधनासाठी मदत करावी म्हणून तळेगाव (ढमढेरे )येथील खंडोजी आणि रामजी पाटील याना पत्रातून लिहिले कि " स्थल विचारता तुमच्या सारखे नाईक सोडून कोणास न्ह्यावे .एकतरी कुलवंत जगताप राव तुमचा नामोस जैसा आमचा तसाच आहे . दुसरे आम्हाहुन तुम्ही सोपानदेवांची भक्तराज आहेत आणि महद पुण्यधिकारी आहात आप्त जाणवून तुम्हास हि विनंती लिहिले असे तीस रुपयांची भरती पाहिजे विनंती उदास न केली पाहिजे "
या पत्रावरून जगताप घराणे हे प्रमुख नामवंत घराणे हे प्रमुख नामवंत घराणे असे म्हणता येईल . बेलसरच्या लढाईत सासवडच्या पश्चिमेस असलेल्या पंढरीच्या ओढ्यात मुसलमानांशी लढताना धारातीर्थी पडलेले" सरदार नंदाजी जगताप हे नरस पाटील यांच्या वंशातील होते .
पहिल्या महायुद्धात पराक्रम करून जंगी इनाम मिळवणारे" नारायणराव सोपानराव जगताप ,"सुभेदार मेजर आसि . लेफ्ट ." गुलाबराव लक्ष्मणराव जगताप "सासवड नगरपालिकेचे भूतपूर्व नगराध्यक्ष" भाऊशेठ जगताप ",माधवराव पंढरीनाथ जगताप या कर्तबगार व्यक्ती"सरदार नंदाजी जगताप' यांचे वंशज होते .
कान्हू पाटीलदेशमुख यांचे वंशज "राधाकृष्ण खंडेराव जगताप देशमुख " "शंकरराव भगवंतराव देशमुख" (सुभेदार मेजर ) "सुभानराव देशमुख इत्यादी त्यांचे वंशज होते
".सरदार गोदाजी जगताप" यांचे वंशज "नानासाहेब नारायणराव जगताप होते." शंकरराव पांडुरंगजी जगताप" हे सरदार" खंडोजी जगताप "यांचे वंशज होते .
" सीताराम पाटील" हे" सरदार खंडोजींचे" सक्खे बंधू" आप्पाजी "यांच्या वंशातील होते
"भिकोबा नारायणराव जगता"प हे "शंकराजी यांचा मुलगा मानाजी" यांच्या वंशातील होते.
सासवड मधील सर्वात जुने घराणे म्हणून जगताप घराण्याचा उल्लेख करावा लागेल." जगताप" यांचे शिवकाळातील व पेशवाईतील क्षात्रतेज आजच्या पिढीला व सासवडच्या भूमीला निश्चितच भूषणावह आहे .यात कोणाचेही दुमत नसावे . या घराण्याने स्वराज्याच्या सुरवातीपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक शूरांची आहुती दिलेली आहे . पुढील पिढीला त्यांचा उज्वल इतिहास नक्कीच प्रेरणादायी ,स्फुर्तीदायी आहे .
साभार - डाॅ . उदयकुमार जगताप

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...