विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 January 2025

*पानिपत…*

 


*पानिपत…*

पानिपत….जे नाव नुसत ऐकल कित्येक मराठ्यांच्या काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच…सव्वा लाख बांगडी फुटली अस वर्णन ज्याच केल जाते…मराठय़ांसाठी एक आख्यायिका बनलेल्या अश्या ह्या मराठय़ांच्या आणि एकूणच सबंध भारताच्या इतिहासावर सखोल परिणाम करणारे पानिपत !
🚩🚩 *१४जानेवारी१७६१* -
*पानिपतचा भयंकर संग्राम ... !*
गोष्ट आहे, बुधवार, १४ जानेवारी १७६१ च्या क्रूर दिवसाची. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, " *कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,*
*तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती* !!"
घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. "हर हर महादेव" आणि "अल्ला हो आकबर" चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले.
गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताइतखान *यशवंतराव पवारांनी* फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली. या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर - अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे. पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद असाच आहे. कारण, या नंतर वायव्य सीमा कायमची सुरक्षित झाली. अफगाणी आक्रमक परत दिल्ली पाहू शकले नाहित... १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतावर परकीय आक्रमकंशी लढताना हिन्दुस्थान च्या अखंडते साठी १ लाख मराठे धारातिर्थी पडले. आपण आज च्या दिवशी त्याना अभिवादन करूया !! एक महत्वाची गोष्ट मात्र इथे नमूद करावीशी वाटतेय , ती अशी की १४ जानेवारी १७६१ ल मात्र मकर संक्रांत नव्हती ! त्यावर्षी मकर संक्रांत होती १० जानेवारी ला ! त्यामुळे पानिपत ची लढाई आणि मकर संक्रांतीचा म्हणजेच आजच्याच दिवसाचे जे काही चुकीचे मेसेज येतात ते टाळावेत ! पानिपत ची लढाई ही अपमान नसून मराठा अस्मितेची अभिमानास्पद गोष्ट होती ! ज्याला त्या लाखभर मराठ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून हिंदुस्थान च्या रक्षणार्थ प्राणार्पण केले !!
*पानिपतात मराठे ज्या त्वेषाने लढले ज्यापद्धतीने लढले त्याचा उल्लेख करताना पानिपत जिंकलेल्या अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीने सुद्धा लिहून ठेवले आहे की "मराठ्यांनी पानिपतच्या युद्धभुमिवर मजबूत छावणी कायम केली होती युद्धाच्या दिवशी मराठ्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन:पुन्हा हल्लेचढवले होते. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तुम आणि इस्फिंदर* *(अफगाणांच्या काव्यातील कृष्णार्जून) सारखे वीर मौजूद असते तर मराठ्यांचा पराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालून चावली असती !* मराठ्यांसारखी अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्यच!"
पानिपतच्या या घनघोर युद्धात जगातील बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी असलेला अब्दाली हा मराठ्यांचा शत्रु होता त्याच्या विरोधात मराठे वीर त्वेषाने लढले तर काही पानिपतच्या मातीत मिसळून गेले आजही पानिपतची माती त्यांची साक्ष देते.

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...