विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 28 August 2025

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad Gadhi / Katrad Bhuikot Fort Katrad
अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा परीसरात भटकंती करताना आपल्याला अनेक नगरकोट व अपरीचीत गढी पहायला मिळतात. या गढी व कोट इतकी दुर्लक्षीत आहेत कि तेथे राहणाऱ्या स्थानिकांना देखील आपल्या पुर्वजांचा इतिहास माहीत नाही. कात्रड येथे दुर्लक्षीत असलेली गढी त्यापैकी एक. कात्रड हे गाव अहमदनगर पासुन ३० कि.मी.अंतरावर तर राहुरी या तालुक्याच्या ठिकाणाहुन २३ कि.मी.अंतरावर आहे. कात्रडच्या नगरवेशीतुन गावात होणारा आपला प्रवेश कधीकाळी कात्रड गाव नगरकोटाच्या आत वसले होते याची जाणीव करून देते. नगरकोटाचा अवशेष असलेला हा एकमेव दरवाजा आज शिल्लक असुन त्याचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. हा दरवाजा दोन मोठ्या बुरुजात बांधलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस असलेल्या एका देवडीत शेषशायी विष्णुची सुंदर मुर्ती आहे पण या मुर्तीची रंगरंगोटी केल्याने तिचे मुळ सौंदर्य लोपले आहे. दरवाजाच्या दुसऱ्या बाजुस असलेल्या देवडीत दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाची कमान कोसळल्याने त्यावर नव्याने छप्पर घातलेले आहे. या दरवाजाचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण केले आहे. या दरवाजा पासुन थोड्याच अंतरावर गावाच्या मागील बाजुस एका लहानशा उंचवट्यावर कात्रडची गढी आहे.

साभार
आभार पृथ्वीराज माने

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...