विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

#_______मराठेशाहीचा_उत्कर्ष_बिंदु_______


 #_______मराठेशाहीचा_उत्कर्ष_बिंदु_______

सातवाहन कुळातील राजा शालिवाहन हा महाराष्ट्राचा पहिला शककर्ता.
दुसरा शककर्ता म्हणजे अर्थात छत्रपती शिवराय.
त्यानुसार शालिवाहन शक 1 (इ.स. 78) आणि राज्याभिषेक शक 1 (इ.स. 1674) ही महाराष्ट्राच्या इतिहासा तील दोन महत्त्वाची वर्षे.
महाराष्ट्राच्या इतिहासा तील महत्त्वाचे तिसरे वर्ष कोणते असा प्रश्न कोणी विचारला तर ते निःसंशयपणे इ.स. 1792 असल्याचे उत्तर द्यायला हवे.
खुद्द शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्य्राच्या दरबारात गेले होते तेव्हा त्यांना पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे करून अवमानित करण्यात आले होते.अर्थात त्याचा वचपा त्यांनी लगेच काढलाच.
#राज पाठ सब त्यज के आये
#तुम्हरे बस अब ऐसी किज्यो
#महादो की होवे तुम्हरी जस
आता त्याच मोगल दरबारात शिवाजी महाराजांच्या राज्याचा प्रतिनिधी श्रीमंत महाराज महादजी शिंदे बादशहाजवळील आसनावर बसून हिंदुस्थानचा कारभार पाहत होते
दिल्लीच्या दरबारात फक्त बादशहाच तख्तावर बसायचा. बाकी सर्व मानकऱ्यांना उभे राहावे लागे, हे जाणकारांना ठाऊक आहेच.
शिवछत्रपतींच्याकाळी सुरू झालेले इतिहास चक्र पूर्ण फिरून श्रीमंत महाराज महादजी शिंदे यांच्या जवळ येऊन थांबले.
इतिहासाच्या नियतीचा न्याय पूर्ण झाला. हा महाराष्ट्राच्या इतिहासा तील उत्कर्ष बिंदूच होय......

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...