नरवीर सुभेदार जयाप्पा शिंदे
हें क्षात्रधर्मांस उचित कांय
आतां मजलां काही होत नाही
तुम्हीं शत्रूचा परांभव करांवा
- नरवीर जयाप्पा शिंदे.
रणमैदानात मुकाबला करता न येणार्या बिजेसिंगाने जयाप्पाचा काटा काढण्यासाठी वकीलांबरोबर आलेल्या मारेकर्यांमार्फत जयाप्पांचा खून करण्याची गुप्त कपटी योजना आखली. राणोजी शिंदे यांचे जेष्ठ सुपुत्र नरवीर जयाप्पा शिंदे यांवर बिजेसिंगाने मारेकरी घातले. तीघा मारेकर्यांनी जयाप्पांच्या उदरात कट्यार खुपसली. जयाप्पा खाली कोसळले. आरडाओरडा ऐकून दत्ताजी शिंदे शामियान्यात आले. जेष्ठ बंधू रक्ताच्या थारोळ्यात अंतिम श्वास घेताना पाहून दत्ताजींचा धीर सुटला. ते शोक करू लागले. अशाही परिस्थितीत नरवीर जयाप्पांनी दत्ताजीस युध्दास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस जयाप्पांनी या ही अवस्थेत मराठा रक्त उसळवणारे खालील वक्तव्य केले..
वैरी युध्दासी आला आणि तूं रडतोंस
हें क्षात्रधर्मांस उचित कांय
आतां मजलां काही होत नाही
तुम्हीं शत्रूचा परांभव करांवा
या भयंकर चेतावण्याने प्रतिशोधाने पेटलेल्या दत्ताजींनी बिजेसिंगाच्या सैन्याचा सडकून पराभव केला. युध्द उरकल्यावर दत्ताजी परत जयाप्पांजवळ आले. परंतु वीरश्री जयाप्पांस अखेरचे वंदन करून मुक झाली होती. आणखी एक मराठ्याने स्वराज्याच्या यज्ञात पावन होऊन मोक्षमार्गाकडे प्रस्थान केले होते.
शिंदे घराणे म्हणजे मराठा साम्राज्याचा एक मजबूत आधारस्तंभ. लाख संकटे आली तरी छातीचा कोट करून मराठा साम्राज्याच्या भोवती उभी राहणारी अभेद्य तटबंदीच.. मराठा राज्यासाठी शिंदे घराण्याच्या योगदानाचे मोजमाप करणे हे केवळ अशक्य आहे.
शतशः नमन
संदर्भ -
आलिजाबहाद्दर माधवराव शिंदे यांचा संग्रह.
शिंदेशाहीची साधने.
बिकानेर दप्तर
अप्रकाशित खाजगी कागदपत्र संग्रह.

No comments:
Post a Comment