विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 12 August 2018

सरदार महार्णवर

थोरात कुळातील पराक्रमी पुरूषांनी त्यांच्या रणांगणावरील रणझुंझार वृत्तीमुळे महारणवीर अशी उपाधी प्राप्त केली.कालौघात महारणवर ते महार्णवर असा अपभ्रंश निर्माण झाला.पण आपल्या लढवय्या वृत्तीमुळे ते सदोदीत पराक्रमाच्या तेजाने चमकत राहिले.सन 1681 ते 1707 मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत संघर्षाचा काळ अनेक खडतर आव्हानांनी भरलेला.मराठ्यांचे स्वातंत्र व अस्मिताच धोक्यात आलेली.अशा बिकट प्रसंगी महाराष्ट्रेतील काही कर्त्या घराण्यातील मंडळींनी हे आव्हान पेलायचे ठरवले.संभाजीराजांच्या मृत्यूनंतर परिस्थीती आणखी गंभीर झालेली असताना छत्रपती राजाराम महाराजांनी तमिळनाडू राज्यातील जिंजीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला.व महाराष्ट्रातील अनेक पराक्रमी घराण्यांना स्वराज्य रक्षण्याचे आव्हान केले.त्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या आसमंतातील अनेक नामवंत पराक्रमी वीर जिंजी येथे महाराजांच्या भेटीला जमले.त्यात जुनेजाणते सरदार दहिगाव परगण्यातील(आजच्या माळसिरस तालुक्याचा भाग )मौजे मोरूची गावचे महार्णवर व सुळ पाटील हे ही या नामवंत वीरांमध्ये उपस्थित होते.महाराजांच्या आज्ञेने महार्णवर व सुळ पाटील यांनीही रूई ,पिंपरे थोपट्याचे ,राख ,सुपा इंदापूराकडील बीजवडी ,चिखली, कळसी,लामठी फलटण परगण्यातील खडकी इत्यादी गावांतील आपले भाऊबंद व पंचक्रोशीतील अनेक जातीजमातींच्या तरूण पोरांना एकत्रित करून आपल्या लष्कराची मोट बांधली.व कधी संताजी घोरपडेतर कधी धनाजी जाधव यांच्या दिमतीला राहत पराक्रम गाजविण्यास सुरूवात केली.या काळात महार्णवर व सुळ यांनीही अनेक पराक्रम गाजविले असणार पण इतिहासाला ते ज्ञात नाहीत.कारण या काळातील मराठ्यांकडील अनेक कागदपत्रे नष्ट झालेली आहेत.मात्र महार्णवरांच्या पराक्रमाचा सन्मान करताना राजाराम महाराजांनी राजेश्री सुभानजी महार्णवर यांस दिलेला " फत्तेहजंगबहाद्दर " हा किताब व बीड प्रांताचे नाडगौडकी म्हणजे प्रांत।पाटील हे वंशपरंपरेने दिलेले वतन तसेच मराठवाडूयातील अनेक गावांची व महालांची दिलेली जहागिर तर चकले पाटोदे तालुक्यातील तीन गावांचा वंशपरंपरेने दिलेला इनाम महार्णवर सरदारांनी स्वराज्यासाठी घेतलेले परिश्रम ,त्यांची मर्दुमकी ,केलेली पराकाष्टा इत्यादी गोष्टीच अधोरेखित करतात...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...